10 11 2019 रविवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:38:33

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक 10 नोव्हेंबर 2019 , रविवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - त्रयोदशी ( 16.33 नंतर चतुर्दशी )
★ वार - रविवार
★ नक्षत्र - रेवती ( 17.18 नंतर अश्विनी )
★ योग - वज्र ( 10.40 नंतर सिद्धि )
★ करण - तैतील ( 16.33 नंतर गरज )
★ चंद्र रास - मीन ( 17.18 नंतर मेष )
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 16.35 ते 18.00
★ यमघंट काल - 12.20 ते 13.45

★ आज वैकुंठ चतुर्दशीचा उपवास , आवळीचे झाडाखाली मध्यरात्री विष्णुपूजन , आज श्री आदित्यह्रदय स्तोत्र किंवा कोणतेही सूर्य स्तोत्र म्हणावे व ( रं रवये नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज सूर्याला लाल फुल घेऊन अर्घ्य द्यावे किंवा निदान पूर्व दिशेकडे तोंड करून ते लाल फुल घेऊन सूर्याचे 12 वेळा स्मरण करून फुल तुळशीला वाहणे , सूर्याला मनुका (किसमिस) टाकून केलेल्या लापशी - गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.. आज सकाळी आंघोळच्या पाण्यात चंदन / केशर टाकून स्नान करावे.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला गुळ, गहू दान करावे.. आज घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आज म्हणण्यासाठी सूर्यस्तोत्र ---
http://www.shyamjoshi.org/surya-ashtak-stotra

★ आज सकाळी / संध्याकाळी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊंन देवीची ओटी भरणे.. जमल्यास एखाद्या सुहासिनीची सुद्धा ओटी भरणे..

★ आज लाल / नारिंगी / केशरी / भगवा रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 09.30 ते 10.55
★ अमृत मुहूर्त -- 10.55 ते 12.20 तसेच 19.35 ते 21.10
★ शुभ मुहूर्त -- 13.45 ते 15.10 तसेच 18.00 ते 19.35

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

◆ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवतु ★

Search

Search here.