श्री धन्वंतरी आरती

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-11-02 16:23:48
 श्री धन्वंतरी आरती  कमलनयन श्यामवर्ण पितांबर साजे | मनमोहन वस्त्राने आदिदेव विलसे | शंखचक्र जलौका अमृतघट हाती | चतुर्भुजानी अवघ्या दु:खाला पळवी|| जय देव जय देव धन्वंतरी देवा | सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || १ || देवांनी दैत्यांनी मंथन ते केले | त्यातुन अमृत कलशा घेवुनिया आले | भय दु:ख तरण्या जरा मृत्यू हरण्या | सकळांना त्यांचे संजीवन झाले || जय देव जय देव धन्वंतरी देवा | सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || २ || शास्त्रांचे परिशिलन अनुभव कर्माचा | बुध्दिने तर्काने तत्पर ती सेवा | शुचिर्दक्ष सत्यधर्म संयत औदार्या | श्रीकांता सह सा-या आशीर्वच द्यावा || जय देव जय देव धन्वंतरी देवा | सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || ३ ||

Search

Search here.