होळी उपाय holi remedies

उपाय - तोडगे Posted at 2016-03-22 19:42:00

होळी उपाय होळीला खालील उपाय वर्षभर उत्तम फळ मिळनेसाठी करू शकतात ..

श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा 

★ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी प्रज्वलित झाल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७बत्तासे, ५विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ, पुरणाची पोळी, वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ , तूप होळीत वाहावे , होळीला नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दुर होतात.

★ तसेच होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास संकट निघून जातात.

★ ७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु द्वारा किंवा अचानक अरिष्ट मुळे माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये , माझी सर्व कार्य योजना निर्विघ्न व्यवस्थित होऊ दे अशी मनापासून प्रार्थना म्हणून ते होळीत टाकावीत.

★  होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ व राई एकत्र करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत, नजरदोष, करणीदोष आदी काही असतील तर त्याचा त्रास होत नाही. 

★ होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३ पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते व सर्व सुख सुयश प्राप्त होते .

★ होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये प्रगती उन्नती होते.

★ नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे व शिवसुक्त म्हणावे . नवग्रह स्तोत्र म्हणावे .

★ गरीबास पुरणपोळी खावू घालावी, घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. देवीकवच आदी स्तोत्र म्हणावीत यामुळे बाधा निवारण होते.

★  राहुचा दोष असेल तर - एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा. व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे  वर्षभर राहुचा त्रास, दोष निघून जातो. व सर्व अडलेली कामे होऊ लागतात. राहूच मंत्र व स्तोत्र आदी म्हणून राहुला प्रार्थना करावी ..

★ जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११  काळे उडीद टाका व सर्व त्रास कमी होऊन संपत्ती वाढावी अशी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा  होळीच्या अग्नीत टाका.

★ दुर्घटना , संकटे, फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा  ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन, होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा  व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .

★ विवाह होत नाही किंवा विवाहाला अडथळे येतात किंवा विवाह मोडत असेल , किंवा लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी २ विडयाची पाने, १ अख्खी सुपारी , १ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे व प्रार्थना करावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे. व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी. रंगपंचमी पर्यत केल्यास उत्तम ..  लवकरच विवाहयोग येईल .. शिवलिंग समोर पती प्राप्ती साठीचे पार्वती स्तोत्र म्हणावे . आपल्या साईट वर आहे.

वरील पैकी जो इच्छित कामना साठी जो उपाय शक्य असेल तो उपाय करावा. एकाच व्यक्तीने दोन तीन उपाय करू नये. वरील उपाय भक्ती श्रद्धेने मनापासून केल्यास फलप्राप्ती निश्चित होईल .. वरील सांगिलेल्या पैकी अनेक स्तोत्र मंत्र हे www.shyamjoshi.org या साईट वर आहेत .

.. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

सर्वाना होळी च्या अनेक अनेक शुभकामना .. 

Search

Search here.