कालभैरव आरती

आरती  > शिव आरती Posted at 2018-03-28 02:28:16
काळभैरव आरती (चाल - आरती सप्रेम) आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ॥ दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ॥ देवा, प्रसन्न हो मजला ॥धृ०॥ धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी । उग्र भयंकर भव्य मूर्ति परि, भक्तांसी तारी । काशीक्षेत्री वास तुझा तू, तिथला अधिकारी । तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ॥ पळती, पिशाच्चादि भारी ॥आरती०॥१॥ उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती । क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती । क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती । मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती । देवा, घडो तुझी भक्ती । आरती० ॥२॥

Search

Search here.