लक्ष्मी आरती

आरती  > देवी आरती Posted at 2018-10-17 04:14:49
लक्ष्मी आरती  आद्य स्थान तुझें करविरपुर माते । प्रसन्नवदनें वससी माये, मन रमते ॥ सुरवर किन्नर पूजिति ध्याती स्थिरचित्तें । महिमा न कळे तुझा, गाती भावार्थें ॥१॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । आरति करितां तूं हरिसी अवलक्ष्मी ॥ध्रु.॥ दक्षिणभागीं तूझ्या कालीचें स्थान । सरस्वतीचें सव्यभागीं तें ठाण ॥ तुझ्या सन्मुख शोभे गजवदन । काशीतुल्या महिमा गाती मुनिजन ॥२॥ महिषासुरनिर्दळण प्रथम केलेंसी । शुंभ रक्तबीज तेही वधिलेसी ॥ सर्वहि असुरां मर्दुनि स्वस्थ जाहलीसी । सुराधिकारीं इंद्रा तूं स्थापियलेंसी ॥३॥ भजन करितां तूझें मुक्ती पै देसी । इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥ जनार्दन वदला परमभावेंसी । वरदहस्त माथां ठेवी भक्तांसी ॥४॥  

Search

Search here.