सद्गुरू अभिषेक स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2018-12-02 04:05:18
सद्गुरु च्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद चला न्हाणुं त्या गुरुराया वेदादिक ही स्तविति ब्रम्हतें सगुण होइ जग ताराया ।। धृ ।। रत्नखचित चौरंगि बसूवुं या तैल सुवासिक शिरिं घालूं या उटणिं अत्तरें अंगिं मर्दूया करुं सेवा प्रभु सुखवाया ।। १ ।। उष्ण सुगंधित जल गंगेचें घालुनि चोळू अंग प्रभुचें निर्मळ करुनी पुसुं या साचें चरणिं पादुका लेववुं या ।। २ ।। सुवर्णसूत्रहि कटिला विलसें कौपिन छाटी भगवी नेसे भरजरि शेला पांघरलासे ध्यान ठ्सो दिनदासीं या ।। ३ ।। सद्गुरु सिंहासनारोह अथवा पादुका आसनारोहण, भस्मधारण रत्नजडित सिंहासन मृदु सुंदर वरि आसन त्यावरि देदीप्यमान स्वामी शोभला ।। १ ।। षडरींतें करुनि भस्म चर्चियलें अंगिं भस्म निर्विकार पूर्ण ब्रम्ह स्वामि शोभला ।। २ ।। संध्या संदेह-हारि यज्ञोपवितासि धरि भक्त्-जनांस्तव आचरि कर्ममार्गहा ।। ३ ।।

Search

Search here.