संक्षिप्त गुरुचरित्र सप्तशती

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2019-02-09 04:15:40
श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रं ।। श्री गणेशाय नमः ।। नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे । स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥ भूतं भव्यं भवच्चास्माज्जांयते येन जीवति । लीयते यत्र तद्‌ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम्‌ ॥२॥ भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये । संक्षेपेण स्फुंट वक्ति वासुदेवानंदसरस्वती ॥३॥ ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त । तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥ हें मानुनि जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती । तेचि भवाब्धि तरती । उद्धरति निजकुळा ॥५॥ मनावाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर । कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥ त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥ प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥ जो ऊर्ध्व खालीं भरल । आंत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥ तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम । कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥ विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥ जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी । किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥ मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥ सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥ किं मुख पसरितां । बाळपाशीं मागें माता । जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥ तूंची मम माता पिता । तूंची एक कुळदेवता । भिन्नभाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥ नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥ मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणे पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥ अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्‍नी ॥१९॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते प्रथमोऽध्यायः —————————————————————————————— ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे । तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥ सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥ ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥ विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥ तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं । कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥ एकदां तो कोपे जरी । न राखती हरहरी । येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥ म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित । गोदावरीतीर स्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥ तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत । तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥ सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी । न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥ अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाक्रष्टी । शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥ अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान । नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥ त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन । शिष्य बोले सर्व दान । देईल पूर्ण गुरु माझा ॥१२॥ निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान । दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥ हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया । भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते द्वितीयो ———————————————— ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून । पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥ कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें । अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥ दुर्वास ऋषी द्वादशीसी । आला अंबरीषापाशीं । लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥ टळे वेळा हें जाणून । राजा करी जलपान । गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥ तेव्हां दयाळु येऊन । स्वयें शाप स्वीकारुन । अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥ इति श्री०प०वा०स० अंबरीषोपाख्यानं नाम तृतियो० ———————————————————— बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥ निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुन ते साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥ ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥ ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं। जातां रानीं मुनिवर्य ॥५॥ त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥ जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥ स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चितीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥ सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥ सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥ त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥ ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनी तोषवी त्याला ॥१२॥ त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होउनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥ सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चन्द्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्म विष्णु महेश्वर ॥१४॥ चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥ तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थो० ———————————————————————— ये श्राद्धा ही विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी । श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥ दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव । झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥ विशेष विद्याभिन्न झाला । तात आरंभी विवाहाला । पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥ निश्चय हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून । त्रिमूर्तीरुप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥ करी प्रभू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा । पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥ आशीर्वाद देई तयां । काशीपुरा जाऊनिया । बर्दयाश्रम पाहुनिया । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥ विमलाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः कलौ श्रीपादरुपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥ इति श्री०प०प०वा०स० सार श्रीपादावतारकथनं नाम पंचमो० ——————————————————— कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥ शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृन्मयलिंग पूजिता । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥ तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे हीमाती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥ बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिवूनिगौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारी ॥४॥ तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करी स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥ त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥ त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥ गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥ शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देउनि त्यासी । म्हणे होसी तूंच शंभू ॥९॥ ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥ अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणें परी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥ शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥ अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥ त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥ देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥ जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥ ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्ननायकातें ॥१७॥ मुनी मनोवेगें तया । गांठुनि लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तव आला ॥१८॥ त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥ स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥ स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥ त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥ इति श्री०प०प०वा०वि० गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठो० ————————————————————— होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥ ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप । विप्रा मारी तत्स्त्री शाप । दे स्त्रीसंपर्के मरसी ॥२॥ तो भूप बारा साल । जातां प्राग्वत् हो विमल । सांगे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥ दुःखें मरुं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥ मनस्येकं वचस्येकं । असा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥ ब्रह्महत्या न जाय ती । मग भूपा वाटे भीती । मिथिलापुरीं महामती । सांगे खंती गौतमाते ॥६॥ मुनीं तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथें दोष निवारुन । तूं पावन होशील बा ॥७॥ ऐक थोडेसें आख्यान । म्यां देखिलें तें सांगेन । शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥ हर्ष पाहतां हो तयां । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥ ही बालविधवा झाली । जारकर्मी रमली । स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥ असभ्य संगें दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥ मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारुन । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥ असी नांदता ती मेली । गोवघें हो चंडाळी । अविचारें हो आंधळी । व्रणे झाली जारकर्में ॥१३॥ असी तोकपणें झाली । मायबापें रक्षियेली । लवकर तेही मेलीं । पोरी झाली निराश्रय ॥१४॥ ती जन संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी । वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशी मागे अन्न ॥१५॥ ती याचावया कर । पुढें करी, कोणी नर । करीं टाकी बिल्वपत्र । टाकी दूर हुंगोनी ती ॥१६॥ पडे दिष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥ पुनर्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं । गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥ नृप चमत्कार मानून । जातांची हो पांवन । तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥ इति श्री०प०प०वा०स०गु०गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमो० ——————————————————— सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत । कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥ मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त । जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात देखे देव ॥२॥ प्रभू तिला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती । जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥ तन्निष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान । उज्जनींत चंद्रसेन । शिवार्चन करी प्रदोषीं ॥४॥ त्याचा अमूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं । घेवोनी अक्षौहिणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥ हस्त्यश्च रथ पत्ती । पाहोनी न भी चित्तीं । शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥ अश्वत्थ संनिधानीं । अंगणी ते पाषाणीं । पूजिती, त्यां नेती जननी । पूजनीं रमे एक बाळ ॥७॥ राहे मेळा जातां एकला । पूजा लोटुनि माता त्याला । ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्ज पुढें नंदस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन । ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेष सोडून जाती राजे ॥९॥ पुढें सुत व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं । येरु म्हणे तुम्हासरी । जन्मांतरी पुत्र व्हावा ॥१०॥ जो भाविकां देई वर । तथा म्हणूनी शिरावर । मूर्खपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥ ती करुनी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा । स्वसमांन नाहीं दुजा । म्हणूनीं हो तस्तुत दत्त ॥१२॥ इति श्री०प०प०वा०स०वि०स०गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो० ————————————————————— सुरुढभक्ती एक । श्रीपादाचा सेवक । होता जातीचा रजक । नित्य एकभावें वंदी ॥१॥ तो नमूनी त्या गुरुवर्या । वस्त्रें धूतां भूपैश्वर्या । देखे इच्छी स्वयें तथा । गुरुराया तें जाणत ॥२॥ त्या बोलती तूं भक्ता । सुखें राज्य करीं आतां । पुढें देऊं कीं वद आता । तो म्हणे झालो वृद्ध ॥३॥ पुढें मला द्या यौवनीं । असो तुझी स्मृती मनीं । गुरु बोले म्लेंच्छसदनीं । राजा होसी अंती भेटूं ॥४॥ इति श्री०प०प०वा०स०वि०स० रजकवरप्रदानं नाम नवमो० —————————————————— सत्यसंकल्प दे तसें । स्वयें अवतरतसे । कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥ करी गरीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार । यात्रे जातां मार्गी चोर । तया ठार मारिती ॥२॥ श्रीश शस्त्रें मारी चोरां । जीववी द्विजवरा । राखी एका सभ्य चोरा । स्वयें गुप्त हो श्रीपाद ॥३॥ ते शस्त्रे मेले त्यांतें । द्विज जाणोनी धनांतें । घेऊनी ये कुरुपुरातें । दें नवस हो कृतार्थ ॥४॥ इति श्री०प०प०वा०स०वि०स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो० ———————————————————— ब्राह्मण स्त्री करंजपुरीं । हो अंबारव्या सुंदरी । प्राक्संस्कारें प्रदोष करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥ झाली दृढधी गर्भिणी । बोले तत्वज्ञान जनीं । शोभली ती संस्कारानीं । शुभलग्नीं प्रसवली ॥२॥ तो पढें बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार । होती सर्व हृष्टतर । अवतार हा म्हणती ॥३॥ करुन नामकर्मा । नाम घेती नृहरिशर्मा । पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥ न इच्छि शिंशु बोलाया । तया मूक मानूनियां । ते करितीं बहु उपाया । शिशु तयां दावी खुणा ॥५॥ मूकत्वा टाकी तेव्हां । बांधाल मुंजी जेव्हां । असें म्हणूनी करी तेव्हां । बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥ बोल तयाचा मानून । करिती व्रतबंधन । मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥ जैं प्रातःकाल येतां । अंधःकार जाय अस्ता । तेवीं बाळें वेद पढतां । मर्त्यताधी लोपली ॥८॥ सर्वां परम हर्ष झाला । बटू प्रार्थी मातेला । स्वीकारुं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥ माता दंभोलीपातसे । ऐकतांची पडतसे । सांवरोनी बोलतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥ वेदांत ब्रह्मचर्यादि । क्रम असे नच आधीं । अन्यथा पडे मधीं । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥ इति श्री०प०प०वा०स० नृसिंहावतारो नाम एकादशो० —————————————————— सच्चित्परब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण । वैराग्य न क्रम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥ कां वारिसी तूं मज । आयुष्य जेवीं वीज । क्षणभंगुर देह तुज । कळे सहज मृत्यू न कीं ॥२॥ येथ मानवांची काय । कथा मृत्यू देवां खाय । न ये गेलेलें आयुष्य । न कळे काय केव्हां पडे ॥३॥ सन्मार्गि न करीं विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून । मस्तकीं हस्त ठेऊन । पूर्वस्मरण तिला देई ॥४॥ म्हणे तनया श्रीपदा तूं । एक पुत्र होतां जा तूं । सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥ ज्यांचे व्यंग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ । तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥ ती माय गर्भिणी झाली । पुत्र दोन प्रसवली । त्या बाळें आज्ञा घेतली । वाढ धरिलीं काशीची ॥७॥ तो सस्मित बोले तयां । पुनः भेटें म्हणुनिया । काशीमध्यें येवोनियां । धरी धैर्या करी योग ॥८॥ महान्गतस्मय जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून । विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥ जो होता तेथें यती । वृद्ध कृष्णसरस्वती । तया वरुनी गुरु होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥ होऊन नर आपण । गुरुचे गुरु असून । रामकृष्णापरी जाण । गुरु करुन घेती गुरु ॥११॥ स्थापूनि श्रौंतधर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम । माधवा दे आश्रम । वळे जन्मभूमीकडे ॥१२॥ इति०श्री०प०प०वा०स० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादसो० ——————————————————————— बाळवर्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती । सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥ अधूर्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित । आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥ विनन्ति करुनी नर । विश्वरुपा घरोघर । न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥ तो प्रभू म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला । त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी । ते भूयः प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति । कुष्ठाची करीन शांति । स्त्रियां पति गती न अन्य । असें तये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा । घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥ शिष्य मेळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक । ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरुनें ॥७॥ गुरुवर्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती । मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनिया ॥८॥ तयाचा तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांवा शिष्यें घेवोनिया धांव । तयास जवळ आणिला । तो साद्यंत पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें । कुकर्मं केले पूर्वीं मदें । त्याचें फल दे देव हें की । नाहीं पुण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार । गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥ तूं मरु नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र । ऐसें म्हणती गुरुवर । तवं ये विप्र सायंदेव ॥१२॥ तो तोषवी श्रीरुसी । म्हणे द्विजमी कांचीवासी । गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं घालीं । हें साम्प्रत करी काज । सायंदेव म्हणे हा द्विज । अन्नवैरी झाला आज । दोष ये मज हा मरतां ॥१४॥ अपूप दे म्हणती तया । तें मानून गुरुराया । भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥ धू पाद्ये गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद । जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र । इति श्री०प०प०वा०स०वि०गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदशो० —————————————————— तो सायन्देव म्हणे । म्लेच्छराजा माझें जिणें । हरील वाटे आजी त्याणें । बोलावणें केलें आहे । मीं अतःपर न डरें। गुरु म्हणती तूं जा त्वरें । परतवील तो सत्कारें । म्हणूनी करें आश्वासिती । हाची प्रसाद म्हणून । सायंदेव जातां यवन । मृतप्राय हो भिवून । गौरवूत त्या बोळवी ॥३॥ वंशवृद्धी निजभक्ती । गुरु देवून पुनः भेटी । सायंदेवा देवूं म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥ निवृत्तिः श्रीगुरुपदैः । सर्वत्रात्र प्रकाशिता । प्रस्थाप्य तीर्थयात्रायै । स्वन्गृहीताऽप्रकाशिता ॥५॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशो० ———————————————————— शिष्यांप्रति गुरु म्हणती । तीर्थें हिंडा सर्वक्षिती । भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥ ते संसृतिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद । गुरु म्हणती निर्विवाद । चला खेद सोडूनियां ॥२॥ वाक्य तादृश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी । म्हणती जावे कोण्या स्थानीं । तें ऐकूनी गुरु बोले । सात पुरी धाम चार । बारा ज्योतिर्लिंगें थोर । आचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप । आचारावें तीर्थी क्षौर । जसा असे स्वाधिकार । तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम । जे कोणी जितुके गाव । तीर्था जाती ठेवूनि भाव । तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तयांचे । पाहुनि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम । ऋतु निवर्ततां ग्रीष्म । तीर्थधाम विटाळे ॥७॥ स्वधर्मानें आठ मास । फिरा ठरा चार मास । नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ । दोष नच तीरस्थांसी । तीन दिन महानदीसी । अहोरात्र र्‍हदकूपासी । करा ऐसी यात्रा तुम्हीं । पाप मोचन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य । श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१॥ इति श्री०प०वा०स०गु० सारे तीर्थयात्रानिरुपणं नाम पंचदशो० ———————————————————— तो महात्मा लोटुनी शिष्यां । स्वयें कोठें राहोनियां । काय करी असे तया । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥ सवें जितात्मा मी एक । वैजनाथीं गुरुनायक । असतां विप्र आला एक । सांगे दुःख गुरुनें दिल्हें ॥२॥ गुरु तया धिक्कारुन । म्हणती तूं रे जा यथोन । येरु धरुनियां चरण । गुरुसेवन सांगा म्हणे ॥३॥ गुरु संतोषें बोलती । ब्रह्माविष्णूशिवमूर्ति । गुरु ब्रह्म साक्षात्‌ म्हणती । भक्तां देती ते सर्वार्थ ज्ञ ॥४॥ सेवा गहन वाटे तरी । गुरु आपुल्या शिष्या तारी । कथा झाली हे द्वापारीं । अवधारी मी सांगतो । धौम्य दोषज्ञ गुरु भला । तिघे शिष्य होते त्याला । कठिण सेवा सांगे त्याला । न वेदांसी सांगे पूर्वी ॥ विशेषार्थ न सांगती । हृच्छुघ्यर्थ सेवा घेती । वळखूनी प्रसन्न होती । रहाटी ऐसी गुरुची हे ॥७॥ धौम्य अशा रीती शिष्या । अरुणा म्हणे शेतीं तोया । न्हेयी म्हणतां तो न्हे तोया । तें न जाय शेताकडे ॥ मनीं ध्यायी गुरुपद । जलामध्यें पडे सानंद । जळ क्षेत्रीं ये स्वच्छंद । गुरु प्रसाद करी तेव्हां ॥९॥ अध्यात्म ज्ञानी तो झाला । तया गेहा पाठविला । धौम्य सांगे बैदाला । ह्या शेताला यत्‍नें राखीं ॥१०॥ राखोनि तो मळी धान । गुरुला ते दे सांगून । गाडा रेडा एक देऊन । म्हणे आण धान्य घरीं॥११॥ गाडा त्या धान्ये भरुन । आणिता पंकी तो गढून । गेला तव गुरु येवून । त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥ सर्व विद्या आल्या त्याला । तया गेहीं पाठविला । गुरु म्हणे उपमन्यूला । तूं धेनूला वनी चारीं ॥१३॥ नेवोनि तो गुरें रानीं । चरवी तेथें भिक्षा करुनी । गुरु मागे तें जाणुनी । भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥ द्विरावृत्ती भिक्षा करी । शिश्य एक देई घरीं । तें जाणुनी गुरु दुसरी । भिक्षा घरीं देई म्हणे ॥१५॥ दुश्चित्त तो नच होई । दोनी भिक्षा घरीं देई । वस्तोच्छिष्टपय घेई । गुरुमायी वारी तया ॥१६॥ तो अर्‌काचें क्षीर पीतां । होई अंध कूपी पडतां । कृपा आली गुरुनाथा । दृष्टी देता झाला मंत्रें ॥१७॥ सत्कामाः फलंतु ते । असें म्हणुनि धाडी त्यातें । तो हो कृतार्थ कीर्तीते । तच्छिष्यें मिरविली ॥१८॥ जगद्वंद्य शिष्य झाला । सतक्षकेंद्र पाडिला । गुरुतोषाची ही कला । जा तूं गुरुला पुनः सेवीं ॥१९॥ तो तद्वैरें अनुतापाला । मग तारिती गुरु त्याला । आले भिल्लवाडीला । वास केला चार मास ॥२०॥ इति श्री०प०प०वा०गु० सारे शिष्यत्रयाख्यानं नाम षोडशो० —————————————————————— जे चर्वित चर्वणसे । विषय भोगिताति पिसे । तारावया तया असें । करीतसे गुरु कर्म ॥१॥ विप्र मुख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख । पशु म्हणती सर्व लोक । निंदिती दुःख वाटे त्यातें ॥२॥ विरक्ता परी तो येवून । भुवनेश्वरीसी प्रार्थून । न होता ती सुप्रसन्न । जिव्हा छेदून देतसे ॥३॥ शिरस्सुमन द्याया चिंती । देवी धाडी त्या गुरुप्रति । गुरु जिव्हा देती करिती । सुमती जाती गुरुपुढें ॥४॥ इति श्री०प०प०वा०स० छिन्नजिव्हादानं नाम सप्तदशो० ————————————————— सुरेख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे । तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥ तेथें दुःखि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी । घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दुःख तेव्हां ॥२॥ तद्‌दुःख हरावया । वेलातळीं देई तयां । धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हे ॥३॥ इति श्री०प०प०वा०स० सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशो० —————————————————— हो हा संन्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण । हिरण्यकशिपु दारण । करितां नखें तापलीं ॥१॥ जो विज्ञैकगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं । शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥ दे मार्ग कृष्णा तया । द्वीपीं राहे योगिनी तया । भिक्षा देती पूजूनियां । नेणूनिया विप्र म्हणती ॥३॥ न स्वछंदी गांवीं जायीं । पाहूं येथें काय खायी । ऐसें म्हणुनि ते ठायीं । राहता येयी भय त्याला ॥४॥ तत्रत्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज । दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥ तो नमूनी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे । गुरु जाऊं म्हणतसे । दुःख होतसे योगिनीसी ॥६॥ न गूढाः केपि में चेष्टा । विदुरित्येष पादुके । विन्यस्याश्र्वास्य ताः प्राप । श्रीगुरुर्गाणगापुरुम् ॥७॥ इति श्री०प०प०वा०स० योगिनीवरदानं नाम एकोनविंशो० —————————————————— ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर । लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥ एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र । तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥ त्वां ब्रह्मस्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें । त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥ दे द्रव्य दद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरुसी । येरु म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरुसी सेवीं भावें ॥४॥ अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥ सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥ ती दोन पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवें । थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेचिती ते द्रव्य ॥७॥ श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात । होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्‍नें ॥८॥ तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥ दिवस मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता । ब्रह्मचारी स्पष्टवक्ता । तेथें येतां झाला तेव्हां ॥१०॥ इति श्री०प०प०वा०स०गु० समंधपरिहारो नाम विंशो० ———————————————————— तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥ पृथ्व्यप्‌तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥ जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची । सांग कथा प्राग्‌जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥ जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें । तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥ कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥ दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे । सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी । येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥ बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥ स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥ विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें । सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥ इति श्री०प०वा०स० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो० ———————————————————— गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी । असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥ मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित । होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥ अमेय कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमीं भले । गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थीं तें ॥३॥ हो यद्गत्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन । वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥ सु सत्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन । वांझ म्हैंस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥ मानून ती दोही क्षीर । दोन धडे दोहिलें क्षीर । गुरु पिऊनीं देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशो० ——————————————————————— ही कानि वार्ता ऐकून । सर्व पुसे नृप येऊन । गुरु महात्म्य ऐकून । ससैन्य येऊन प्रार्थी ॥१॥ म्हणे वसूनी गांवात । उद्धरीं आम्हां तूं दैवत । ते मानी गुरुनाथ । पालखींत बसवी भूप ॥२॥ न वर्तंते प्रभुधियः । परतंत्रास्तथाऽपि हि । भक्तिप्रियो भक्तिगभ्यो । भक्ताधीनत्वमेत्यजः ॥३॥ भूपें तेव्हां उत्सवून । त्यां आणिलें पालखींतून । अश्वत्थातळीं येऊन । ब्रह्मराक्षसा पहाती ॥४॥ तोही तया पदीं लागे । गुरु राक्षसासी सांगे । संगमीं न्हातां तूं वेगे । होसी अंगे येथ मुक्त ॥५॥ तो तद्धा मीं पावला । ग्रामी मठ गुरुला दिल्हा । ऐकूनि गुरुची लीला । निंदी तयाला एकयति ॥६॥ इति श्री०प०प०वा०स०वि० ब्रह्मराक्षसोद्धरणं नाम त्रयोविंशो० ———————————————————————— तो कुमसीग्रामीं वसे । तेथससैन्य गुरु येतसे । त्रिविक्रमा ध्यानीं दिसें । देव येतसे नदीतीरीं ॥१॥ तेथें पळत ये यती । तया दिसे सैन्य यती । गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरुप ॥२॥ तो कर जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती । गाणगापुरी मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे विश्वरुपदर्शन नाम चतुर्विंशो० ——————————————————————— होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन । सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥ म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र । वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥ राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत । विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥ ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती । त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥ जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें । कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥ यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ । यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥ वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें । मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥ गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया । वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥ विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती । तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥ गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले । व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो० ——————————————————————— वेद केवळ म्हणावया । हो सायास ऋषिवर्या । कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आग्नायांतीं गती ॥१॥ चिरंजीव भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज । तीन राशी दावी अज । ऋषी लाजला तेधवा ॥२॥ दे देव मुष्टी तीन । न तया आले अजून । हे अनंत वेद जाण । विभागून ठेविले तूर्त ॥३॥ विष्णू भूतळीं व्यासरुपी । चौशिष्यां चार निरुपी । वेद शाखा विभागरुपी । पैला निरुपी ऋग्वेद ॥४॥ शुद्धांतः करणें पैला । ऐक सांगो ऋग्वेदाला । द्वरत्‍निमात्र रुप त्याला । व्यक्तगळा दीर्घदृष्टी ॥५॥ रवि समान कांति ज्यांची । अत्रीगोत्र देवता ज्याची । ब्रह्मा गायत्री छंदची । आयुर्वेदचि उपवेद ॥६॥ शाखा नामें भेद पांच । सहा अंगें ब्राह्मणच । अरणेंशीं हो वेदच। पैलासच व्यास सांगे ॥७॥ शिष्य तयाचा दुसरा । वैशंपायन नामें बरा । तया यजुर्वेद दुसरा । सांगे बरा विभागून ॥८॥ सुमनः प्रीती जो यजनें । करी पंचारत्‍नी मानें । भारद्वाज गोत्र जाणें । कृशपणें त्रिष्टुप्‌छंद ॥९॥ दैव महा विष्णु ज्याचें । उपवेद धनु ज्याचें । सूर्याभ जो भेद त्याचे । जाण साचे श्याऐशीच ॥१०॥ सुमनः प्रीती दे स्तवनें । सामवेद अभिधानें । षड्‌रत्‍निमितमानें । जैमिनीनें घेतला हा ॥११॥ विशेष हा शांत दांत । असे चर्मदंडहस्त । गोत्र काश्यप दैवत । रुद्र ख्यात जगतीछंद ॥१२॥ जो ओष्ठा रक्त असे । याच्या भेदा मिती नसे । ज्याचा उपवेद असे । गंधर्व असें सांगे व्यास ॥१३॥ भुवनीं सांग भेद याचे । कोण बोलेल वाचे । सांगोपांग वदतां वाचे । शेषाचेही ये शीण ॥१४॥ अतींद्रिय ज्ञाता व्यास । ऐक म्हणे सुमंतूस । सांगे अथर्ववेदास । हो देवेश देव त्याचा ॥१५॥ असे याचा उपवेद । अस्त्र वेद तिसरा छंद । गोत्र बैजान स्वछंद । नऊभेद कल्प पांच ॥१६॥ हे कोणि चारही पूर्ण । एवढे न जाणिले जाण । एक शाखा ही अपूर्ण । तुम्ही पढून सर्वज्ञ कीं ॥१७॥ जे विप्र धर्मयुक्त । विष्णु मानी त्यां दैवत । वेदबळें हस्तगत । तयां होत देवादिक ॥१८॥ जे स्वकृत्या सोडुनी देती । ग्लेच्छापुढें वेद पढती । ब्राह्मणातें जिंकिती । ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥ इति०श्री०प०वा०स०वि० सारे चतुर्वेदकथनं नाम षड्‌विंशो० ———————————————————— हूं आस्था पूर्ण करुं । असें म्हणूनी श्रीगुरु । दूर पाहती मांग नरु । शिष्यां निरुपिती आणाया ॥१॥ जाउनि शिष्यें तया । आणिती गुरुराया । सात रेखा काढूनिया । आणिती तयावरी तया ॥२॥ तो एक एक लंघितां । सांगे सप्तजन्मवार्ता । अंतीं विद्वदद्विज म्हणतां । जिंक विप्रा म्हणती गुरु ॥३॥ सामर्ष तो पुढें होतां । ये त्यां विप्रां मूढता । द्वादशाब्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥ दुर्गति त्या अनुतापानें । ये स्वल्प गुरुकृपेनें । विप्र होऊनि मांगाने । गार्‍हाणें गुरुसी केलें ॥५॥ सद्वंशजद्विज असून । केवि झालों जातिहीन । हे सांगा विस्तारुन । तें ऐकूण गुरु सांगे ॥६॥ इति०श्री०प०प०वा०स०वि० सारे द्विजगर्वपरिहारो नाम सप्तविंशो० ————————————————————— जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस । निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥ जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद । हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥ मारी यत्‍नें जीवा क्रूर । जाळी वनग्रामघर । विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥ जो निंदक श्राद्धातें । न करी फोडी कूपांतें । तोडी मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥ जो दिवापर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी । करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥ जो स्वप्नोपमसुखार्थ । मारणादि करी व्यर्थ । परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥ तो पतित होयी मांग । जो करी वृषलीसंग । करी स्नानसंध्यांत्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥ जो होय वृत्तिरत्‍नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता । मद्य पीतां ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥ जो लुच्चा जिती विप्रात । हूं तूं करी पितृगुरुंस । तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मंत्राशी ॥९॥ तो कप्युदरीं जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे । जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥ हो उत्क्रान्तीनंतर । नरकवास घोर । ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥ माशी मधुहर उंदीर । धान्यहर जळहर । चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥ दुर्गती आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान । अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन्हां ॥१३॥ कृमीश्व खर जारकर्मे । स्त्री नरां गती हे दुष्कर्में । जे वागती सत्कर्मे । स्वधर्में तरती ते ॥१४॥ हो परःस्पर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती । पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥ तरी गृहीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड । हो होता पाप उदंड । कृच्छ्रमुंडपूर्वक कीजे ॥१६॥ शक्तिहीनें गोधन द्यांवे । जप यात्रा होम करावे । शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥ स्वात्मत्वैश्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित । पितृत्यागें हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥ पतितानें ते ऐकून । म्हटलें मी झालो पावन । घ्या विप्रांत मेळवून । ते ऐकून गुरु म्हणे ॥१९॥ होऊनि नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र । तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥ तो आसंन येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारुं आला । गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥ तेतया अंगींची विभूती । लुब्धा हातीं धुवविती । ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घरा प्रति गेला सस्त्रीका ॥ प्रणति करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम । अंग धूता ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥ इति श्री०प०प०वा०स० सारे कर्मविपाककथनं नामअष्टाविंशो० ———————————————— बरवा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान । दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥ पूर्वयुगीं वामदेव । क्रौंचवनी घेयी ठाव । त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भाव तो राक्षस ॥२॥ तो दुर्गंधांगीं तेव्हां । धरी भक्षूं वामदेवा । भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वा स्मरे ॥३॥ तृटक्षुधा शांत झाली । म्हणे । पंचवीस आपुलीं । स्पष्ट जन्में म्यां स्मरलीं । भूपकुलीं मी दुर्जय ॥४॥ धरुनि मी भोगीं स्त्रिया । राज्यमदें करुनियां । चारीं वर्णांच्याही भार्यां । भोगीं वेश्या असंख्यांत ॥५॥ अविवाहितांही भोगीं । रजस्वलाही न त्यागी । पुढें दैवें झालों रोगी । शत्रू वेगीं घेती राज्य ॥६॥ दुराशयें पाप केलें । स्त्रियांनीं बहु शापिलें । क्षयरोगें ग्रासियलें । अंतीं आले यमदूत ॥७॥ अपयात्‌ क्षय आयुषः । हें कळलें निर्दोष । मी मरतां यमपुरुष । न्हेती दोष क्षाळांवया ॥८॥ भीदेश्रोत्रा यातना ती । पित्रांसह भोगुनी अंतीं । अंगीं शिश्नें हजार होती । प्रेतगती ये ती मला ॥९॥ तें गात्रही सोडून । मी चोवीस भोगीं योनी । ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदा भुका ॥१०॥ ह्या पञ्चविसाव्या जन्मीं । गजा खातांही भुका मी । स्पर्शमात्रें शांतीं तुम्हीं । दिल्ही तुम्ही साक्षा देव ॥११॥ गेले क्षुत्पिपासादि । याचा हेतू सांगा आधीं । वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला भस्में ॥१२॥ भस्म स्पर्शें एक जाण । द्राविड जार ब्राह्मण । त्यजिला शूद्रें मारुन । ये श्वान त्यावरि एक ॥१३॥ श्वस्पर्शनें तदंगस्थ । भस्म लागुनी झाला मृत । त्यांतें न्हेती यमदूत । शिवदूत सोडविती ॥१४॥ त्या सानंदें कैलासातें । न्हेता यम आला त्यातें । धर्म सांगून विप्रातें । दूत न्हेतें झाले तया ॥१५॥ शंभुच जाणें तन्महात्म्या । भस्म लावीं मी सर्वकाया । लागलें किंचित्‌ तुझ्याकाया । ज्ञान तया योगें हो हें वदे रक्ष राज्य करितां । वापी केल्या निर्जळपंथा । विप्रांवृत्ति दिधल्या आतां । आलें हातां त्याचें फळ । सांगे सविस्तर मला । भस्मधारण विधीला । वामदेव म्हणे शिवाला । प्रश्न केला हा कुमारें ॥१८॥ मग नंदीगौरीयुक्त । शिव बसे देवासहित । सनत्कुमार वंदुनी तेथ । करीतसे हा प्रश्न ॥१९॥ भो व्याघ्राजिनवास । चतुर्विध पुमर्थास । देई शीघ्र असें आम्हांस । सांगा खास स्वल्प साधन ॥२०॥ त्यां म्हणतसे ईश । धारण करीं भस्मास । चतुर्विध पुमर्थांस । दे हें खास सुसाधन ॥२१॥ नगमे ऐसें सुसाधन । गोमयें अग्निहोत्रांतून । भस्म घेई करीं धारण । भृसमान त्रिपुंड्रेसी ॥२२॥ हो नव देवादिक । एका एका पुंड्री देख । मध्यांगुष्टानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥ हो हेंच पापशमन । असें वामदेव सांगून । करवी भस्मधारण । उद्धरुन गेला राक्षस ॥२४॥ गुरु असें सांगती । सर्व आनंदीत होती । गेला त्रिविक्रमयती । कथा पुढती सांगो ऐक ॥२५॥ इति श्री०प०प०वा०स० सारे भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशो० ———————————————————— दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र । तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥ ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार । त्याचा विवाह केला थोर । हर्षे सादर मायबापें ॥२॥ त्यां होय रुप समान । साजे जोडें देवासमान । पतिसेवेवांचून । सतीमन न विसंबे ॥३॥ सून महा पतिव्रता । तयां हर्ष हो पहातां । तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥ होऊन क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आंग । जेवीना तो तसी चांग । सती हो रोग नसतांही ॥५॥ हो पश्चात्ताप द्विजांला । व्यर्थ वरिली सुभगेला । म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जांई सुखें ॥६॥ ती भयंकर वाचा । ऐकून म्हणे तुमचा । जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥ नसो वियोग म्हणून । सासुसासर्‍यां प्रार्थून । धवा घेऊन डोंळींतून । ये गाणगाभुवना ॥८॥ त्रिदोष वाढुनी जाण । द्विज झाला गतप्राण । सती उठे द्याया प्राण । निवारण करी जन ॥९॥ तीं तयाचे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून । म्हणे रुसे गौरिरमण । कोण चोरुन ने सौभाग्या ॥१०॥ जैं धेनु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण । भेटूं जातां देवा पडून । टाकीं चुरुन देऊळ कीं ॥११॥ तेणें अप्री झालें मज । देवा शरण येतां आज । न राखसी माझी लाज । देवा तुज कींव न ये कीं ॥१२॥ ती असे करी विलाप । तंव आला आपोआप । तो दीनाचा मायबाप । गुरु रुप पालटोन ॥१३॥ तीसि वदे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी । मायामय संबंधासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥ देव तेही काळाधीन । तुम्ही तरी मर्त्य जाण । पाहूं जातां विचारुन । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥ देह उत्पन्न होऊन । मरे त्याहुन विलक्षण । आत्मा निंत्य विकारहीन । संबंधी न कवणाचा तो ॥१६॥ त्या उत्क्रान्तीव्यापकाकैंची । वार्ता न त्या संबंधाची । नदीकाष्टवत्‌ हो देहांची । भेटी हेची कर्मयोगें ॥ ह्या अमंगळ देहाच्या । तादात्में भ्रम कर्मांचा । गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचाम परिणाम ॥ तूं अतंद्रित होऊन । दे हा संबंध सोडून । जेणें जासी उद्धरुन । तें साधून घेई शीघ्र ॥१९॥ रक्तास्थि मांसा न रडें । हें ऐकून ती पायां पडे । म्हणे बापा शोकीं पडे । काढा कडे सोयरे तुम्हीं ॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशो० ————————————————— म्हणे तंद्रि सोडुनि ऐक । वाढे विंध व्यापी अर्क । तेव्हां जाती वृंदारक । काशीमध्यें तद्‌गुरुपाशीं ॥ स्तवि वाक्पति अगस्त्यातें । लोपामुद्रा साध्वीतें । त्वत्सम नान्या पतिव्रते । पतिदेवते तूं धन्या ॥२॥ कदापि न स्वतंत्रता । पतिसेवननिरता । छायेपरी पतिदेवता । पतिव्रता ती पतिचित्ता ॥३॥ जेवी भुंजीता पति । पतिपूर्वीं स्नान करी ती । उठे आधीं निजे उपरांती । न बसे ती पतिपुढें ॥४॥ जी न जाय घराबाहेर । करीपत्युच्छिष्टाहार । पतिवचनीं जी सादर । निरंतर अनुकुल ॥५॥ जी आनंदे दैवलाभें । वस्त्रभूषणीं न क्षोभे । धर्म सोडिना देहलोभें । ती शोभे निजधर्मे ॥६॥ न घे वार्ता श्रीमंताची । मर्यादा धरि वडिलांची । स्वातंत्र्यें ती व्रताची । आशा साची नच करी ॥७॥ देव गुरु सर्व पती । मानुनी वाद न करिती । पतिसवें ज्या भांडती । भालु होती भुंकती त्या ॥८॥ न कोणासीं भेद कीजे । धवा वंचुनी खाइजे । वृक्षीं लोंबे वागुळी जे । खायी निज मळमूत्र ॥९॥ धर्मान्वित राहतां । दैवें पति मरतां । सवें जाय पतिव्रता । न वियुक्ता छायेपरी ॥१०॥ इति श्री०प०वा०स०वि सारे पतिव्रताधर्मनिरुपणं एकत्रिंशो० ————————————————————— परतंत्र न रहावें । धवासवें सतीनें जावें । पदोपदीं मेघफल घ्यावें । स्थान घ्यावें पतिलोकीं ॥१॥ किंवा विधवाधर्म । पाळितां ही ये शर्म । पोर असतां कीजे भर्म । राहिजे ब्रह्मचार्‍यापरी ॥२॥ स्वल्प मूलही असतां । पोटीं गर्भ असतां । पतिशव न मिळतां । सवें जाता दोष असे ॥३॥ ज्या मूढा केश राखती । धवासह त्यां हो दुर्गती । अतएव मरता पति । करो ती केशवपन ॥४॥ शयना तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी । नरकीं यास्तव भूमिवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥ भूषानु लेप तांबूल । त्यजुनी राखीजे शील । नेसावे शुभ्र चैल । मंगलस्नान वर्जावे ॥६॥ विष्णु पतिसम मानून । कीजे वैधव्य आचरण । न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्‍त्या कीजे ॥७॥ अवश्यं भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे । मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखीं हो ॥८॥ सुमति जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी । जायी घेउनी पतिसी । स्वर्गीं ऐसी गुरुक्ती हे ॥९॥ म्हणे पतिव्रता मातें । वैधव्य हें न रुचतें । तारुण्य हें विघ्नातें । देई असें माते वाटे ॥१०॥ अवश्यं कुरु ऐसे । बोलुनी तो देतसे । चार अक्ष भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥ हे भूति शिरीं लावून । पतीकर्णी अक्ष बांधून । गुरुदर्शन घेऊन । सहगमन करीं मग ॥१२॥ तो आज्ञा अशी देवुन । गेला, साध्वी दानें देऊन । पतिशवा नेववुन । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥ पाहुन नारी म्हणती । केश साडेतीन कोटी । होमुनी स्वर्गी घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४॥ सर्व चमत्कार पाहाती । स्मशानी ये मंदगती । अग्नि सिद्ध करोनी ती । आठवी चित्तीं उपदेशा ॥ स्वचक्षुनें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन । विप्रें शीघ्र ये म्हणून । वदताम मनस्विनी गेली ॥१६॥ जै उषःकाळी विजन । गजबजती तैसे जन । सवें येती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥ सती यतीशा पाहून । करी साष्टांग नमन । पंचपुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरु ॥१८॥ हें स्वतंत्र बोलतां जन । देती साद्यंत सांगून । गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥ तव तो उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला । सर्व लोकां हर्ष झाला । न मावला साध्वी देही ॥२०॥ दैवयोगे स्वर्णघट । रंका मिळतां अवचट । हर्ष हो तेवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥ प्रेमागिरा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती । गेले दोष ये सद्‌गती । लोहां गती जेवी परीसे ॥२२॥ लिहीन याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक । पुढचा शतायुष्यलेख । दिल्हा सम्यक मागून मी । मनश्वैत्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले । दंपतीनें स्नान केले । मठी आले गुरु त्यासह ॥२४॥ इति श्री०प०प०वा०स०वि० प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिशो० ————————————————————— ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि । गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥ तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे । रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥ अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥ त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥ सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती । वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥ अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण । तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥ त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्‍न । रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥ वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून । करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥ निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती । कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥ तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन । तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥ इति श्री०प०प०वा०स०वि० रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशो० —————————————————— ते होत हे अक्षप्रिय । भूप म्हणें वदा भविष्य । मुनि म्हणे सप्ताहायुष्य तुझा तनय असे तरी ॥१॥ वेदान्तो पनिषत्सारा । रुद्रा विधी दे मुनिश्वराम । करी अधर्म संहारा । यमपुरा वोस करी ॥२॥ तज्जप्यनुभवा यम । कथी तया म्हणे ब्रम्हा । अभाविका हो अधर्म । भाविका शर्म दे हा रुद्र ॥३॥ मृत्यु कृतभय जाया । रुद्रें अर्ची मृत्युंजया । मग रुद्राभिषेक राया । द्विजवर्यां करवी करी ॥४॥ त्या सुता सातवे दिनीं । मृत्यु येतां तीर्थें मुनी । प्रोक्षी शिवदूत येउनी ! मृत्युदूतां पळविले ॥५॥ धर्मात्मा जो यम त्याप्रति । ते जाउनि सांगति । यम पुसे शैवांप्रती । ते म्हनती लेख पहा ॥६॥ तें मानोनी चित्रगुप्ता । करवीं लेख पहातां । यम हो भ्रांत शिवदूतां । क्षमा मागता झाला ॥७॥ गेलें नैमित्तिकारिष्ट । नृप विप्रां करी तुष्ट । तों नारद तें अदृष्ट । सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥ महानंद सर्वां झाला । अयुतायू सुत जाहला । गुरु सांगे सतीला । ती गुरुला प्रार्थुनी म्हणे ॥९॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम चतुस्त्रिंशो० ———————————————————— मंत्रोपदेश द्या मला । तेणें नित्य स्मरुं तुम्हांला । गुरु म्हणे स्त्री मंत्राला । पात्र न तिला पतिसेवा ॥१॥ अवश्य ऐकें ही कथा । देवी दैत्यां रणीं मारितां । तयां संजीवनी जपतां । वांचवितां होय भार्गव ॥२॥ अचिन्त्य मंत्रविद्याशक्ती । इंद्र सांगे शिवाप्रती । आणवून शुक्राप्रती । उमापती भक्षीतसे ॥३॥ तो त्याचे मूत्रद्वारा । पडे वांचवी पुनः क्रूरां । बृहस्पती म्हणे इंद्रा । बुडवू मंत्र षटकर्णेशी ॥४॥ असें तया बोलून । स्वसुता कचा दे धाडून । कपटी शिष्य होवून । शुक्रा सेवून तो राहे ॥५॥ न वासः शुभदो नोऽस्य । असे मानुनी दैत्य । मारिती त्या वांचवी काव्य । द्विवार कन्यास्नेहें ॥६॥ दैत्य यत्‍नें त्या जाळून । त्याचें भस्म मद्यातून । देती शुक्र पी नेणून । मग कन्था विरहें रडे ॥७॥ शुक्रदाही दिशा देखे । शेखीं कचा पोटीं देखें । म्हणे देवयानी ऐकें । त्या आणितां मी मरेन ॥८॥ कन्यादिव्यमंत्र मागे । म्हणे कचा वांचवीं वेगें । मग मी तूतें मंत्रयोगें । बापा वेगें वांचविन ॥९॥ देहा त्यजीन मी अन्यथा । अशी कन्योक्ति ऐकितां । आश्वासुनी मोहेंपिता । मंत्र देता झाला तिला ॥ तो मग जपे वाचार्थ । तो ये त्याचें फोडुनी पोट । कन्या ताता उठवीत । कचा क्षुत झाला मंत्र ॥११॥ मंत्रतंत्र प्रगट होता । तत्काल ये निर्वीयेता । शुक्रमंत्रा ये हीनता । आशा घेता झाला कच ॥१२॥ कन्या तेव्हां वरीं म्हणे । विद्या देऊनी दिल्हें जिणें । तूं भगिनी कच म्हणे । ती म्हणे विद्या विसर तूं ॥१३॥ कच जोरानें वदे तिला । विप्रावेगळा वरो तुला । शुक्र उपदेशी स्त्रीला । भ्रष्ट झाला मंत्र त्याचा ॥१४॥ ती द्विजपुत्री असतां । शापें झाली ययातिकांता । दोघां हानी मंत्र देतां । स्त्रिये ब्रता आचरावें ॥१५॥ ती मग म्हणे नाथा । व्रत एक सांगा आतां । गुरु म्हणे सोमव्रता । करितां सर्व सिद्धी होय ॥१६॥ हें सद्भावें करीं परम । आर्यावर्ती चित्रवर्म । तयासीमंतिनीनाम । हो उत्तम कन्यारत्‍न ॥१७॥ तियेस चौदा वर्षें होतां । ये वैधव्य हें कळतां । तिनें मैत्रेयी प्रार्थितां । सोमव्रता ती सांगे ॥१८॥ निश्चय मनीं धरुन । सोमवारीं उपोषण । किंवा नक्तभोजन । करिजे अर्चून गौरीशा ॥१९॥ दुरिते ही नाशा जाती । सौभाग्य सुत राज्यासी । दे शीघ्र गौरीपती । अर्चिता त्या प्रदोषीं ॥२०॥ हो दुःखित तरी व्रता । न सोडिजे सर्वथा । सीमंतिनी तें ऐकतां । करी व्रता दृढचित्ते ॥२१॥ दैवा लंघी कैसा कोण । चित्रांगदा ती देऊन । राजा गेहीं प्रेमें करुन । घे ठेवून त्या जामाता ॥२२॥ बुडे यमुनेत जामाता । कन्या प्राण त्यजूं उठता । वारुनि घरान्हें पिता । तरी व्रता ती न सोडी ॥२३॥ महच्चक्र काळाचें हें । कोणाचेनी दूर नोहे । तीचा श्वशुर शोकीं स्नेहें । त्या बांधून घे शत्रु राज्य ॥२४॥ त्या इंद्रसेनसुता । पाताळी न्हेति राजसुता । जीववुनी वासुकी वार्ता । पुसे, सर्व सांगे तया ॥२५॥ तया मग सर्पनाथ । म्हणे तुझें कोण दैवत । येरु म्हणे गौरीनाथ । मद्दैवत जगदीश ॥२६॥ तो त्यासि राहे म्हणे । चंद्रागद पाठवा म्हणे । मद्विरहें माता शिणे । पत्‍नी जिणें वेचिलची ॥२७॥ तो हय सर्पा सवे धाडी । वेगें आला यमुनाथडी । तेथ सीमंतिनी खडी । पाहतां वेडी हो तयासी ॥२८॥ हो सच्चा कीं हा मत्पति । ऐसें जंव चिंती चित्तीं । तों येवून तो पुढती । वार्ता तिची पुसे तो ॥२९॥ संलग्नौ दासिन्यदीना । कोण ही ऐसें पुसतां खुणा । लाजुनी म्हणे सखीजनां । सर्व खुणा वदा ॥३०॥ सखी तया सर्व सांगे । तो वदे ईचा पति वेगें । भेटेल हें न वावुगें । आण घे शंकराची ॥३१॥ स्वसत्तेनें सोडवी ताता । मायबापांची हरी चिंता । सीमंतीनीसी भेटता । झाला व्रताच्या प्रभावें ॥३२॥ भला जोडा तो शोभला । येउनी राज्जीं आरुढला । असें व्रतें दे शिव भोला । फल तिला गुरु म्हणे ॥३३॥ हें सावित्री व्रत तूं करीं । तथा म्हणुनी ती स्वीकारी । निरोपें ये स्वमंदिरीं । धवासव नारी भेटे स्वका ॥३४॥ सुबुद्धि हो त्या दोघांची । जसी वाचा श्रीगुरुची । फलप्राप्‍ती तसी हो साची । तै दुःखाची कैंची वार्ता ॥ इति श्री०प०प०वा०स० सारे सीमंतिन्याख्यानकथनं नाम पंचत्रिंशो० —————————————————————— त्या ग्रामामध्यें एक । विप्र येक होता रंक । भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्स्त्री ॥१॥ तो नेम धरुनी परान्न । सोडी, दंपती भोजन । द्याया आला महाजन । स्त्री जाऊनीं प्रार्थी गुरुसी ॥२॥ होता कंठ भरुनि दीन । गुरु विप्रा बोलावून । म्हणे इला जा घेऊन । तूं परान्न जेवाया ॥३॥ तीचें गार्‍हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून । गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥ तेथें मानिनी जेवितां । श्वसूकरोच्छिष्ट देतां । उठे पतीसह दुश्चिता । गुरुनाथा भेटती दोघे ॥५॥ नारी विनवी क्षमापून । गुरु म्हणे धालें कीं मन । द्विज म्हणे नेम टाळून । भ्रष्ट होवून गेलों मीं ॥६॥ अवश्य ही वैरीण । गुरु म्हणे पुरें शीण । मी माया दावून । केलें मन शुद्ध ईचें ॥७॥ ही नच इच्छील आता । सोडील परान्नाची वार्ता । न मोडली तुझी निष्ठा । दि़ज अडतां घे परान्न ॥८॥ प्रार्थी भूसूर कोठें जावें । अन्न कोणाचें वर्जावें । गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥ वर्जी तामस कुचरान्न । विधिनिषेधरहितान्न । दुष्प्रतिग्रह दुर्भक्षान्न । कन्यान्न सुत न होता ॥१०॥ त्यजीं निन्दकादिकान्न । जेवितांही श्राद्धान्न । षट्‌ प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जी ॥११॥ अग्नाधानिभागवतान्न । पवित्र करी ब्रह्मीष्ठान । तीर्थी क्षेत्री पर्वणीं दान । हीनदान कुदान न घे ॥१२॥ स्वाचारयुक्त नर । सर्व दोष करीं दूर । द्विज म्हणे सविस्तर । नित्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥ गुरु यापरी प्रार्थित । सांगे पराशरमत । उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतांदिकां वंदा ॥१४॥ व्हायाम्य मुख निशीं ऐक । दिवा संधी उदङ्‌मुख । नैऋत्यकोणी देख । मार्गोदकवर्जितदेशीं ॥ त्यजी हरित्तृण, शिरीं । वस्त्रधरीं जलदूरीं । मलमूत्रोत्सर्ग करीं । शौचकरी मृत्तोयानें ॥१६॥ गोळ्या मोठया आंवळ्यापरी । लिंगीं एकत्रि गुदावरी । सातसात पादकरीं । निम्मीं रात्री संकटी अर्ध ॥ हा द्विजवर्याचार । वर्णी वनी यतिश्वरां । द्वित्रिचतुगुर्णाचार । स्त्रीकुमारां दुर्गंधान्त ॥१८॥ होत साचविधी शूद्रा । विप्रें किजे चूळ बारा । आठ सहा चार ईतरां । अंतीं द्विराचमनें शुद्धीं । मुदा पुण्य मध्यस्नान । प्रातःकाळीं गोमयस्नान । यति सन्यासी त्रिस्नान । सुभगे शिरःस्ना न नित्य । शीतोष्णाम्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी । तर्पणादि बहिःस्नानासी । कीजे शिरसीं मृद्धारण ॥ अनामिकीं दर्भ पवित्र । बद्धशिख सोपवस्त्र । संध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जैसा ॥२२॥ मौंजी चौलादिकीं न भस्म । तदन्यत्र तें परम । सनक्षत्रसंध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥ चाक्षुष सूर्यदर्शन । प्रातःसंध्या अधम जाण । ह्याउलट रात्रौ जाण । उपस्थान सूर्येक्षणें ॥२४॥ त्या आधी, आचमन । प्राणायाम मार्जन । मंत्राचमन मार्जन । अघमर्षण अर्ध्वदान ॥२५॥ मनस्समाधानें द्या तीन । कालात्यय चौथे जाण । सूर्योदयविघ्नकारण । रक्षोगण मरती ह्यांनीं ॥ ह्या दुर्वारास्त्रें मारितां । दोष येतो, भूमी फिरतां । असावादित्य जपतां । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥ हो स्वस्से पानभूत । कर्म कीजे सदोदित । शुभासनीं न्यासहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥ जप मोजा अक्षमालेनें किंवा स्फटिकादिकाने । निष्फळ तो मुद्राविणें । समाधानें मौनें जपा ॥२९॥ लय भूल पडूं न द्यावी । छन्नमाला न पडावी । गायत्री हजार जपावी । कमी योजावे अशक्तत्वें ॥ वृद्धंत्वादि तारत्म्यें । जपिजे न धनकाम्यें । उभ्यानें दोन संध्ये । सायंसंध्येसी बसूनी ॥३१॥ उभें रहावें उपस्थानीं । दिशा देव द्विजां नमूनी । गुरुपादातें वंदुनि । विसर्जोनी द्यावी संध्या ॥३२॥ हो असा हा संध्याविधी । सायंप्रातर्होमविधी । कीजे स्वयें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥ हा आत्मस्त्री सुतादिकें । कीजे गव्यधान्यादिकें । धर्म करितां श्रमदुःखें । नच लेखे चित्ती विप्रा ॥ भोग कः पदार्थ द्विजा । कर्मे होयी शुद्धी निजा । आनंदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुख्य ॥ होम असा झाल्यावर । ब्रह्मयज्ञ कीजे बाहेर । ब्रह्मांजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥ विद्या हंकारवर्जित । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता । दोष नसें कसें पढतां । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥ कोणी वैश्वदेवोत्तर । करिती मध्यसंध्योत्तर । तर्पा देवर्षिपितर । सव्य निवीत्य पसव्येसी ॥३८॥ होविश्वात्माऽऽब्रह्मस्तंबांत । तर्पणें तृप्तयवाक्षत । देवर्षिलाकरिती तृप्‍त । पितरातृप्‍तकरिती तिला ॥३९॥ गृहीं न हें तिलतर्पण । निंद्यदिनीं मांगल्यीं न । दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥ हें करो जीवत्पिता । दोष अनवश्य करितां । मध्यान्हीं सूर्य येतां । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम षष्‍ट्‌त्रिंशो० —————————————————————— गृह भूमी संमार्जन । कीजे नित्य लेपरंजन । शालग्रामशिला धेनू । गृहीं राखून ठेवा गव्य ॥१॥ गृह त्वादे गृहमेधीय । अग्निहोत्र किंवा गुह्य । हो संध्यावत्‌ देवपूज्य । पशुतुल्यत्व अन्यथा ॥२॥ किंवा प्रातर्विस्तरानें । दुपारी पंचोपचारानें । सायंकाळीं निरांजनें । आठ स्थानें पूजनाची ॥३॥ जे कोणी न पूजती । ते यमदंड घेती । वेदमंत्रे द्विज पूजिती । पौंराणोक्तीं स्त्रीशूद्रादि ॥४॥ विपि नां तोत्थ मध्यम । क्रीत हीन, स्वीय उत्तम । तसीं श्वेत रक्त श्याम । पुष्पें अधम शूद्रानीत ॥५॥ न द्या देवा सकृमिछिद्र । दुर्गे दुर्वा, केवडा हरा । वर्जा तुळशी गणेश्वरा । धुत्तुरार्कादि कृष्णा ॥६॥ वाम हस्ताकडे कलश । पुष्पादिका दक्षिण देश । शंख घंटा वामदक्षिणेस । कीजे न्यास देही देवी ॥७॥ कायें मानसें वाचें द्विजा । षोडशोपचारे पूजा । मिळतां पंचामृतें पूजा । स्नानापूर्वीं नंतर भूषा ॥८॥ तवाश्रित मी मला तारीं । म्हणूनी निर्माल्य घे शिरीं । भावें मंत्रजप करीं । तीर्थ पी शिरी घे उद्वासी ॥ घे अंतःकरणीं देवा । पंचसूना दोष जावा । जरी तरी वैश्वदेवा । प्रातःसायं स्वान्नशुध्यर्थ ॥१०॥ याचे प्रातःकालारंभण । होम करी तो देवयज्ञ । हो बळी तो भूतयज्ञ । पितृनृयज्ञ तत्तर्पणें ॥११॥ वीक्षणार्थ अतिथीसी । किंचित् ठरा अंगणदेशीं । येतां अन्न द्या शक्तीसी । द्या यतीसी सजलांन्न ॥१२॥ ओले पाद मुखकर । जेवा घेउनी परिवार । नेणत्यासी वाढा दूर । नच करा पंक्तिभेद ॥१३॥ घालून चित्राहुति । आपोशन घ्या मौंनस्थिति । घ्याव्या मंत्रे प्राणाहुति । पात्र हातीं धरुनिया ॥१४॥ सर्वांस प्राणाहुत्यंत । मौंन पुढें विकल्पित । पात्रीं टाका न उच्छिष्ट । जल पितां शब्द वर्ज्य ॥१५॥ दीप मावळतां न खावें । रजस्वलांत्यां न देखावें । त्यांचे शब्द न ऐकावें । न शिवावें परस्पर ॥१६॥ दुर्वायु अधो आतां । अन्न त्यजा कीटयुक्ता । न जेवावें वांती होतां । केश पडता प्रोक्षुनि घ्यावे ॥१७॥ वियुक्तः स्याद् द्विजत्वात्स । पलांडुलशुनादिभुक् । तामसाहारभुग्दुर्धीः । सात्विकाहारभुक्सुधीः ॥१८॥ आज्या पयोन्न लवण । सर्व खावें अन्य अन्न । सशेष द्यावें उच्छिष्टान्न आपोशन । अर्धे प्यावें ॥१९॥ मुखाचा शोधनासी । वर्जावें तर्जनीसी । मुख हस्ताघ्री शुचीसी । द्विराचमनें बोलीयेलें ॥२०॥ ध्यासम्यक् तांबुलादि । ऐकावें पुराणादि । कीजे सायंसध्याविधी । भोजनांदि पूर्ववत्‌ ॥२१॥ क्षीरान्न रात्रीं शस्त । दिवाकर्म प्राक्प्रहरांत । रात्रौं वर्जा सौंरपाठ । निशींथांत रात्रिकर्म ॥२२॥ जैं पञ्च यज्ञादिकचुके । कीजेप्रायश्चित्तविवेके । सुखशायिनिशां वंदा, सुखें । निजाईशाअर्पूनकर्म ॥२३॥ स्त्रीऋतु कालीं करा रति । पर्व मूल मघा रेवती । वर्जा दिवा श्राद्धव्रती । ऋतुगामी ब्रह्मचारी ॥२४॥ न गुर्विणीशीं रमांवें । रतीं कोप द्वेष त्यजावे । ऋतु चुकवूनी न जावें । जातां पावे भ्रूणहत्या ॥२५॥ घर धंदा होतांहि विप्रा । न सोडावें निजाचारा । गुरु ऐसें कथिती विप्रा । तो आचार करुनि तरे ॥२६॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम सप्तत्रिंशो० —————————————————————— गुरुंस भिक्षाद्याया आला । भास्कर विप्रसामग्रीला । तिघापुरति घेऊनी त्याला । भक्तीनेला प्रसादा ॥१॥ तो सर्व सामग्रीला । निजे घेऊनि उसेला । तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥ त्या हास्य करिती लोक । गुरु करविती पाक । म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥ ते त्याचा बोला हंसती । कण वाटयान ये म्हणती । तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती तें त्यां सर्व ॥४॥ निरहंकार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न । गुरु वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥ द्विज हृष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती । चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठा ॥६॥ अन्न दिल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला । तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरुनें विप्रा ॥७॥ अन्न संपेना तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं । झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥ हर्षुनियां वदती लोक । तिघांपुरतां होता पाक । जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशं० ————————————————— एकविप्र सोमनाथ । तत्स्त्री वृद्धा वंध्या ख्यात । सेवी भावें गुरुनाथा । गुरु पुसती वांछा काय ॥१॥ ती कष्टो नी तयां म्हणे । अपुत्रा मी व्यर्थ शिणें । अश्वथाला भजतां जिणें । गेलें भेणें पुढती वाटे ॥२॥ पुढें मला होवो सुत । गुरु म्हणे कोण जाणत । पुढचें, आतां कन्यासुत । होवो म्हणे, ती गांठ बांधी ॥३॥ गुरुत्तम म्हणे हरीं । पिंपळाची निंदा न करीं । आम्ही सर्वदेव त्यावरी । ब्रह्मा सांगे नारदातें ॥४॥ श्रुतिस्मृती ज्याला गाती । त्याला करी मंदगति । प्रदक्षिणा लक्ष मिती । करीं अंतीं उद्यापन ॥५॥ द्यावे तिलस्वर्णाश्वत्थ । विप्रां भोजन दे निश्चित । होती तुजःकन्या सुत । नारी म्हणतसे देवा ॥६॥ मी दुर्ज्ञा ना वंचूं कशी । साठ वर्षे झालीं वयासी । होत नाहीं विटाळशी । तरी तसीच मी सेवी ॥७॥ ती त्यां न मुनी सेवि तशी । शीघ्र झाली विटाळशी । गर्भधरी पांचवे दिवशीं । कन्या ती सी झाली शुभा ॥८॥ परम हर्षें त्या कन्येसी । आणी नारी गुरुपाशीं । गुरु म्हणे हो सती ईसी । दीक्षित पति लाधेल ॥९॥ तुझे पोटीं मूर्ख शतायू । किंवा यावा बुध अल्पायू । ती म्हणे हो कां अल्पायू । दीर्घायू मूढ किमर्थ ॥१०॥ व्हावे हर्षद पंचसुत । तथा म्हणे गुरुनाथ । कन्ये घेऊन गृहाप्रत । ये हंसत ब्राह्मणी ती ॥११॥ झाला नंदन शीघ्र तिला । विद्वान सर्वगुणी भला । पांच पुत्र झाले त्याला । सर्वां झाला विस्मय ॥१२॥ तशीच कन्या दीक्षिताची । पत्‍नि झाली सती साची । कीर्ति पसरली त्यांची । श्रीगुरुची असी दया ॥१३॥ इति श्री०प०प०वा०स० सारे वृद्धवंध्याप्रसवो नामेकोन्चत्वारिंशो० ————————————————————— एक वेदज्ञ ब्राह्मण । श्वेतकुष्टें व्यापून । गुरुप्रति येऊन । म्हणें दीननाथा तारीं ॥१॥ झालों दैवें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन । ह्यांचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥ पुरश्वर्यादिकें पाप । न जाता हो उलट ताप । देवा तूंची मायबाप । माझें पाप शमवीं हें ॥३॥ आश्वासन देती गुरु । तंव आला एक नर । शुष्ककाष्ठ डोईवर । घेवोनि ठरला तो तेथें ॥४॥ अपूर्वैक चमत्कार । करुं इच्छी गुरुवर । सांगे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥ अविरत सेवीं यासी । पाला येतां शुची होसी । द्विज रोवी त्या काष्टासी । सद्भावें जल शिंपी ॥६॥ लोक हसुनि वारिती । नायके तो गुरुप्रती । ते येवोनी तें सांगती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥ अप्रमेय भावफल । धनंजयवाक्यें सुशील । लिंगा चिताभस्म दे भिल्ल । एकदां लब्ध न हो भस्म ॥८॥ इच्छी वपू जाळावया । मला जाळी म्हणे भार्या । भस्म दे, तिला जाळुनियां । प्रसाद ध्याया आली तीच तयेवेळीं प्रगटे हर । तया देई इष्ट वर । असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरु जाती तेथें ॥१०॥ त्या उद्योगातें पाहून । करितीं काष्ठा प्रोक्षण । आले अंकूर फुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥ बरवे अंकुर फुटले । कुष्ठ सर्व मावळलें । द्विजें स्तवना आरंभिलें । तैं उदेले अष्टभाव ॥१२॥ शांतदांत इंदुकोटिकांदीप्त अत्रिनंदना । देंववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥१३॥ पापतप्ततापभंजना सनातना जनार्दना । मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥१४॥ दत्तकृत्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना । इष्ट देसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१५॥ राग द्वेष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना । भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥१६॥ हस्तिंदण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना । रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना ॥१७॥ तूंचि विश्वहेतु मंतु सोसि होसि मायबाप ना । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥१८॥ तूंचि देव योगि होसि नासिं दैन्यदुःखकानना । न्यासि होसि कृष्नावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१९॥ ब्रह्मवस्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना । वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥ तयाचा भाव जाणुनि विप्रा । विद्यासरस्वतीमंत्रा । देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरु ॥२१॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशो० —————————————————————— निरहंकार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज । गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥ हीतद्वार्ता परिसून । ये घालित लोटांगणा । देवा पाहतां हो तल्लिन । करी स्तवन प्रेमरसे ॥२॥ गुरु विचारिती क्षेम । येरु सांगे धरुनी प्रेम । भवत्सेवाकांम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥ घ्यावीमौजभक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची । गुरु म्हणे सेवा आमुची । कठीणसाची नेणसी तूं ॥४॥ कधीं पुरामध्यें वास । ग्रामीं वनीं नदीतीरास । तुला होती कष्ट सायास । कां तूं त्रास पतकरसी ॥५॥ तो करुनी अंगिकार । राहे गुरुच्या बरोबर । त्याला एकला बाहेर । संगमावर न्हेति गुरु ॥६॥ जो दोषौ घा स्मरणें हरी । तो संकटी त्यजि कीं हरी । हार्दे शिष्य परिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥ तेव्हां लोटुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठया धारा । द्विजें सांहुनी वृष्टी वारा । रक्षिलें वस्त्राश्रये देवा ॥८॥ गुरु केवल परीक्षार्थ । अग्नि आणावया धाडित । विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि भांडयांत घेऊन ये ॥९॥ प्रत्यक्ष पथिं सर्पां देखे । पळतां, मठीं ध्वनी ऐके । प्रकाश देखे मनीं ठके । येउनि देखे एका देवा ॥१०॥ सर्प रक्षार्थ धाडिले । तुझें मन वायां भ्यालें । कठिण सेवा हें कळलें । साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥ हो पश्चत्ताप कीं तुला । द्विज म्हणे देवा मला । जाणसी, मी काय तुला । सांगूं मला न दवडीं ॥१२॥ प्रत्यक्ष तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान । सांगा तेणें स्थिर होईन । तें ऐकून गुरु सांगे ॥१३॥ कुमार त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरुचा । भाव पहावया त्याचा । गुरु साचा वदे तया ॥१४॥ करी एक गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण । करी वृष्टयादि निवारण । तें ऐकुन तत्स्त्री बोले ॥१५॥ न शिंवली न विणली । अंगाबरोबर भली । अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥ माझ्या चरणा सुख देती । खात न लागे, मनोगती । दे पादुका जळींन बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥ हों अक्षयैकस्तंभघर । न हो पात्रीं पाक गार । काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥ कुमार तो स्विकारुन । त्यां वंदून धरी रान । तेथें अवधूत येऊन । म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥ मनस्समाधान करुन । बाळ सांगे सर्व नमून । येरु तया आश्वासून । काशीसेवन करीं म्हणे ॥२०॥ जें शर्वाचें अधिष्ठान । गंगा राहे ज्या वेष्टन । सर्वदेवतीर्थस्नान । तत्सेन करीं शीघ्र ॥२१॥ न कोणिही येथ अमुक्त । म्हणोनी हें अविमुक्ता । विरक्त किंवा विषयासक्त । तेही मुक्त होती जेथे ॥ दुजें भूमंडळीं न असें । येरु वदे मी नेणतसें । काशीक्षेत्र मिळेल कसें । प्रार्थितसें मी तुम्हांसी ॥२३॥ म्हणे तापसी मी दावीन । त्वद्योगें हो मज दर्शन । असें म्हणूनी त्या घेऊन । ये तत्क्षण मनोगती ॥ घेऊनी अला मनोगति । काशीयात्रा भावभक्तीं । करीं यथाविधि, निगुती । पूर्ण होती मनोरथ ॥२५॥ तो ऐकूनि त्याचें वचन । म्हणे नेणे यात्राचरण । येरु म्हणे स्नान करुन । मणिकर्णिकेचें येई ॥२६॥ तूं भेट विश्वेश्वरा । करीं अंतर्गृहयात्रा । मगदक्षिणमानसयात्रा । स्नानार्चनश्राद्धदानें ॥२७॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे काशीयात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशो० —————————————————— तत्र स्थोदङ्‌मानसयात्रा । करीं पंचक्रोशीयात्रा । शुक्लकृष्णपक्षयात्रा । नित्ययात्रा करी भावे ॥१॥ प्रत्यक्षचि विश्वेश्वरा । भवानी हरिधुंडीश्वरा । दंडपाणी भैरववीरा । विघ्नेश्वरा गुहा देखी ॥२॥ तूं स्थीर चित्तें करीं यात्रा । स्थापी लिंग तूं कुमारा । सुटतील येरझारा । असें म्हणोनी गुप्त झाला ॥३॥ बाळ उठोनी पहात । त्या न दिसे, झाला गुप्त । हाची माझा गुरु म्हणत । करीतसें तो यात्रा ॥४॥ अवाच्य हो शिवलीला । इष्ट वर दे तयाला । दे तो तसें गुर्वादिकांला । तो झाला विश्वकर्मा ॥५॥ द्विज तेव्हां गुरु जसें । सांगे तें ते पाहे तसे । गुरुनाथा वंदितसे । स्तवितसे सायंदेव ॥६॥ तूंची उमापती होसी । मज दाविली येथ काशी । गुरु म्हणें त्वद्वंशासी । एकविंशी घडे यात्रा ॥७॥ तूं सत्तम लोकी होसी । आतां न सेंवीं म्लेच्छासी । आणूनिया स्त्रीपुत्रांसी । आम्हापाशीं रहासेवित ॥८॥ तो नमःस्कारुनी गेला । स्वकुटुंबा घेऊनि आला । स्तवि पुनः श्रीगुरुला । कानदीस्तोत्रालापें ॥९॥ त्याचा पुत्रा नागनाथ । तया वर दे गुरुनाथ । सांगे सांयदेवा स्वस्थ । करी अनंतव्रत आजी ॥१०॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे काशीयात्रानिरुपणं नाम द्विचत्वारिंशो० ———————————————————————— दे पुरुषार्थ नरांसी । भाद्रशुक्लचतुर्दशीसी चौदा ग्रंथी रक्तसूत्रासी । बांधीं करासी पूजुनी ॥१॥ संतोष मानुनि तो पुसे । व्रत कोणीं हें केलें कसें । गुरु म्हणे द्यूतीं घेतसे । पार्थराज्यदुर्योधन ॥२॥ अभास्त्व पावुनि पांडव । वनीं श्रमतां ये माधव । त्याला द्याया स्ववैभव । सांगे देव अनंतव्रत ॥३॥ त्वदन्यः कोनंत इति । पुसतां म्हणे मीच श्रीपती । ऐकें, सुमंतुकन्या होती । सुशीला ती पूर्वस्त्रीजा ॥ तीहो पत्‍नी कौंडिण्याची । सापत्‍न माता द्वेषी तिची । अन्यत्र न्हे तिला तोची । अनंताची पूजा घेती ॥ देवरवि श्री अनंत । वशीकारभयें अग्नींत । दोरा टाकी मुनी कुपित । दुःखाब्धींत पडे तेव्हां ॥६॥ देव माझेवर रुसला । म्हणून मुनी वनीं गेला । निर्वाणें तो मूर्च्छित पडला । त्या भेटीला श्रीमदनंत ॥७॥ जीवा त्मेशा भिन्नत्वेंशी । स्तुती करितां त्या ऋषीसी । वर दे सवैंश्वरर्येंसीं । तत्पृष्टांशा देयी मोक्ष ॥८॥ त्या अत्युदार अनंत । पुनर्वस्वृक्ष करित । म्हणोनी कृष्ण हें व्रत । करवीत पार्थाकरवीं ॥९॥ दायादादिकां मारुन । सार्वभौम धर्म होऊन । देहासह स्वर्गी जाण । गेला म्हणून करी तूं व्रत ॥१०॥ विप्र हृष्टतर होऊन । गुरुक्त तें हो व्रत करुन । राहे गुरुला सेवून। बंध तोडून मुक्त झाला ॥११॥ तूं अंतःकरणीं जाण । गुरुप्रसादे हो पूर्ण । तुमच्या वंशीं म्हणून । तुझें मन रंगलें हें ॥१२॥ याग योगादिकांवीण । तुम्हां जोडे हेंचि निधान । असे घेती भक्ती करुन । देवा करुन अपुलासा ॥१३॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे अनंतव्रतकथनं नाम त्रिचत्वारिंशो० —————————————————————— सिंहा लोकनें करुन । ऐक पुढील कथन। तंतूक संसारीं असून । भजे गुरुसी याममात्र ॥१॥ तल्लोक श्रीशैलासी । जातां बोलविती त्यासी । तया वदे तो गुरुपाशीं । श्रीशैलेशमल्लिकार्जुन ॥२॥ सर्वत्र हा गुरु एक । पाषाण पाहूं जाती लोक । ते त्या निंदुनी गेले लोक । ये तंतुक गुरुपाशी ॥३॥ तो पाय वंदी त्यासी । गुरु पुसे का जासी । तो तसेंचि सांग त्यासी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥ नभो मार्गे गुरुतया । नेउनी दाविती श्रीशैल्य । देवा पाहे तो लोक तया । पुसोनी साच न मानीं ॥५॥ लिंगीविलोकी तैं गुरुसी । स्थनमहात्म्यगुरुत्यासी । सांगेपंपापुरींशिवासी । पाहुनि श्वानायेराजत्व ॥६॥ स्त्रीवश्य तो जरि कां शैव । पुसतां स्त्रीला प्राक्स्वभाव । सांगे, राणीपुसेस्वभाव । म्हणे तोकवडींतूंपूर्वी ॥ आलंबिलें मांस पाहून । श्रीशैलाग्रीं धार येऊन। तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसीं ॥८॥ तूं मी भविष्यड्‌जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामी । जावूं म्हणे, तंतुकामीं । क्षेत्रधामी आणिले तुला ॥ जैं वर्त्यग्रीं लागे आग । तैं हो शीघ्र ध्वांतभंग । तमा होतां गुरुसंग । आवृत्तिभंग हों तयाचा ॥१०॥ त्या अव्याग्रागुरुसंगमीं । आणवूनीधाडितीग्रामीं । त्याला भ्रांत म्हणतीग्रामी । मठधामीं आणि भक्तातो प्रत्यययेयात्रिक येतां । सर्वांला ये निम्रांतता । म्हणेती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्र्यमानिती ॥१२॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे श्रीपर्वतयात्रावर्णनं नाम चतुश्चत्वारिंशो० ———————————————————————— ऐकें ईश्वर प्रभाव । नंदिनाम एक भूदेव । कुष्ठें व्यापुंनि घे धांव । देवीपाशी तुळजापुरीं ॥१॥ त्या ईश्वरीजा गुरुपाशीं । म्हणें, तो बोलेकां नरापशीं । धाडिसी, मग भोपे यांसीं । सांगून त्यांसी घालविलें धी पुरःसर नावडता । तो ये भेटे गुरुनाथा । गुरु म्हणे तूं कां आतां । आलास रे नरापाशीं ॥३॥ स्वकीय खूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून । गुरु मह्णे पापें करुन । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥ अकस्मात् पाप हो दूरी । या संगमीं स्नान तूं करीं । म्हणोनी त्याबरोबरीं । सोमनाथासी धाडिती ॥५॥ तो त्याक्षणीं स्नान करी । अश्वत्था प्रदक्षिणा करीं । मठीये त्या अवसरीं । पाहें शरीरीं गुरु म्हणे ॥६॥ शरीर त्याचे दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें । पुसे कुष्ठ हें कां राहिलें । गुरुबोले विकल्पानें ॥७॥ त्वांजीमनुष्यधी धरिली । तीच तूज आड आली । माझी स्तुती करीं भली, म्हणेतोलिखितही नेणे ॥८॥ विभूती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र । करीं, मग तो होयी धीर । करी स्तोत्र श्रीगुरुचें ॥९॥ आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध बुद्ध नित्य त्रीश । तुला नेणुनि कर्मपाशें । बद्ध होती जीव अज्ञाने ॥१०॥ ते अहंकारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध । समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्तरेतें ॥११॥ गर्भी महाकष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी । उपजतां वेगीं । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥ त्वद्वीक्षणा विना कैसा । मोक्षा जाईल हा पिसा । तूंची कृपा करी ऐसा । प्रार्थीमानसां स्थिरावून ॥ गेलें राहिलेलें कुष्ठ । जहाला तो गुरुप्रेष्ठ । कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदीं ॥१४॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे ब्राह्मणकुष्ठनिवारणं नाम पंचचत्वारिंशो० ———————————————————————— विशद तत्कवितारीती । नृकेसरी तो नरस्तुती । मानुनि निंदी, त्याचे चित्तीं । गुरुमूर्ति प्रगटली ॥१॥ लिंग पिण्डिवर बैसोन । पंचकवित्व पूजन । गुरु घेती, तें पाहून । तो येऊन प्रार्थी गुरुसी ॥२॥ तूं वांचोनी कांदेवासी । मूर्खपणे नरास्तविसी । असें गुरु पुसे त्यासी । प्रार्थुनि त्यांसी तो हो शिष्य ॥३॥ हें उत्तम कवी दोन । गुरुसी गाती अनुदिन । गुरु प्रसन्न होऊन । उद्धरुन न्हेती तयां ॥४॥ जैं तमः शांती करी रवी । तैं हा भक्ताज्ञान नुरवी । येथ हो शांत दुजा रवी । कीर्ती बरवी दावी लोकीं ॥५॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे कवीश्वरउपदेशो नाम षट्‌त्वारिंशो० —————————————————————————— भक्त अतिप्रियसात । दिवाळीच्या सणानिमित्त । न्यायागुरुसीगृहाप्रत । प्रार्थितीं सप्तग्रामवासी ॥१॥ गुरु तोषवाया तयां । सातरुपें धरोनियां । जाती सातांच्या आलया । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥ तों विस्मित होऊनी पुढती । एकामेकां झगडती । माझे घरीं गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥ ग्रामलोक मिथ्या म्हणती । येथेंची होती गुरुमूर्ति । दिल्ही खूण सर्व दाविती । गुरु म्हणती सर्व सत्य ॥४॥ होसी केवळ परब्रह्म । असें स्तविंती ते सप्रेम । तयां भक्तां गुरुत्तम । देती धाम अलभ्य जें ॥५॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे दीपावल्युत्सववर्णनं नाम सप्तचत्वारिंशो० ———————————————————— जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर । तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥ गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती । पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥ लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया । कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥ तो तें प्रमाण मानून । स्वामिमागा ठरवून । कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥ ते कथिती अधिकार्‍यासी । शूद्र न जुमानीं त्यासी । दावी मध्यान्हीं गुरुसीं । म्हणे शेतासी कापिलें तूं अतःपर काय खासी । असें गुंरु पुसे त्यासी । म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥ त्याचे पुरवाया हेत । वृष्टी मूलर्क्षी पाडित । शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥ तो करुनि क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करी गुरु पूजा । स्वामीभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वाटी हर्षे ॥८॥ संतोषोनी गुरुमूर्ति । त्यांच्या वंशा गती देती । अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥ इति श्री०प०प०वा०स०वि सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो० ———————————————————— हें उत्तम असें क्षेत्र । भीमामरजायोग थोर । रणीं सुरां मारी जालंधर । अमृतें हर त्या उठवी ॥१॥ हृत्तमः प्रकाशक । शिव दे अमृत विशोक । उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२॥ ही भयोपताप वारी । भीमेशीं संगम करी । प्रयागापरी पाप वारी । भूमीवरी हे तारक ॥३॥ सर्व मान्य मनोहृत्तीर्थ । जेथ कल्पद्रू अश्वत्थ । पुढें संतोषाख्यतीर्थ । विश्वनाथ येथ आला ॥४॥ ही उमेश प्रसादाने । एका जीवन्मुक्तानें । काशी केली ती स्नानानें । कैवल्यानें निःसंशयें ॥५॥ तयावरी पापविनाश । तीर्थ दाविती यतीश । तो भेटे त्या समयास । पूर्वाश्रमस्वसा र‍त्‍ना ॥६॥ ती त्या महातीर्थी न्हाली । कुष्ठ जाउनी शुद्ध झाली । गुर्वाज्ञेनें तेथें राहिली । मुक्त झाली त्याच जन्मी । वारी संकट कोटीतीर्थ । पुढें दाविती रुदतीर्थ । गयेसम फल तेथ । चक्रतीर्थ केशवापुढें ॥८॥ हें समूळ वारी दुरित । अस्थी करी चक्रांकित । द्वारकेहुनी हें प्रशस्त । हो पतित स्नानें ज्ञानी ॥९॥ ज्या वेढोन असे माया । येथ स्नान करितां तया । ये मुक्तता सुनिश्चया । गुरुराया सांगे लोकां ॥१०॥ तो पूजावा कल्लेश्वर । प्राग्भागीं गोकर्णक्षेत्र । चक्रतीर्थ हें पवित्र । असे क्षेत्रमाहात्म्य हें ॥११॥ अज्ञानानें कली येतां । सर्वतीर्थां ये गुप्तता । गुरुनाथें तीं दावितां । लोकचित्ता हो आनंद ॥१२॥ इति श्री०प०प०वा०स०वि० सारे गाणगापुरवर्णनं नाम एकोनपंचाशतमो० ————————————————————— ज्या देति श्रीपाद वर । तो रजक जन्मांतर । करी हो म्लेंच्छ राजा शूर । धर्मावर मन ज्याचें ॥१॥ त्याचे पुरोहित म्हणती । हिंदु पाषाण पूजिती । भू गो जला देव म्हणती । ती दुर्मति न वंदावे ॥२॥ राजा रुसोनि बोलत । सत्य असे त्याचें मत । जे द्वेषिती तयांप्रत । मी प्राणान्त दंड करीन ॥३॥ द्या द्वेषोक्ति सोडुन । असे तयां कथी ज्ञान । मांडीवर फोड होवून । तो पीडून राहें दैवें ॥४॥ त्या उत्तम लेप करिती । परी त्याची नोहे शांति । राज पुसे द्विजाप्रति । तो एकांतीं सांगूं म्हणे ॥५॥ राजा मंत्र्यादिका त्यजून । एकलाची करी गमन । पापनाशतीर्थी येऊन । पुसे वंदून तया विप्रा ॥६॥ आश्वासन देवी द्विज । म्हणे सत्पुरुषासी मज । भवरोग हो निर्बीज । भय तुज कायसें ह्याचें ॥७॥ एक सर्वकर्महीन । उज्जनींत होता जाण । द्विज वेश्येसीं रमून । तद्‌गृहीं ये ऋषभयोगी ॥८॥ तत्पूर्व पुण्य उदेलें । म्हणोनि मुनि भेटले । दोघांनीं त्यां पूजिलें । सेवियलें अहोरात्र ॥९॥ त्या सेविल्या पुण्यानें । राजकुळीं जन्म घेणें । घडलें तयापरी भोगणें । आलें उणें जें स्वकर्म ॥१०॥ जो सद्भक्त हो सकाम । त्या ये श्रीमत्कुळीं जन्म । मुक्ती घेयी जो निष्काम । सत्समागम व्यर्थ नोहे ॥११॥ द्विजा जन्म दशार्णदेशीं । वज्रबाहुराजवंशीं । ज्येष्ठराणीच्या ये कुशीं । तें सवतीसी न रुचलें ॥१२॥ यत्‍नें तिणें गर्भिणीतें । सर्पगरळ दिलें होतें । भेदलें परी न प्राणातें । हरि, तीतें देव राखी ॥१३॥ तिचें मांस रक्त बिघडे । तिला बहु कष्ट घडे । पुत्रा प्रसवली पुढें । ब्रण पीडे उभयता ॥१४॥ झाले सर्वोपाय अपाय । तयां आरोग्य न होय । एके दिनीं तयां राय । विजनारण्यदेशीं टाकी ॥१५॥ ती पूर्व कर्म स्मरुन । बाळा कडेवर घेऊन । वनीं करी आक्रंदन । तो गोधन पुढे देखे ॥१६॥ राजभामिनी गोपतीतें । पुसोनी ये नगरातें । वणिक्यपती राखी तीतें । व्रणकष्टें पुत्र मेला ॥१७॥ तों दैवे ऋषभयोगी । ती रडतां आला वेगीं । तिला म्हणे राहें उगी । शोक त्यागीं विवेकानें ॥१८॥ सांगोन सदुपदेश । स्मरे पूर्वोपकारास । जीववी तो त्या सुतास । त्या दोघांस दे आरोग्य ॥१९॥ असा भाग्यें सत्पुरुष । भेटे, तरी जायी दोष । राजा पुसे सत्पुरुष । असे दोषहर कोठें ॥२०॥ भूसुर म्हणे भूपाप्रती । भीमातीरीं असे यती । नामे नृसिंहसरस्वती । तयाप्रति जा भेटाया ॥२१॥ राजा तथास्तु म्हणून । तया विप्रा सत्कारुन । चतुरंग दळ घेऊन । भाव धरुन पातला ॥२२॥ तो पाइक दूरी करुन । पायीं चालत येऊन । संगमी देवा पाहून । करी नमन एकभावें ॥२३॥ म्हणति श्रीगुरु रजका । कोठे वससी येसी न कां । भेटावया रे भाविका । ते ऐकुनी तो हो ज्ञानी ॥२४॥ निजगुज प्राग्जन्मीचें । आठवी रुप श्रीपादाचे । त्यावळखूनी मृदु वाचें । करी त्याचे तो स्तवन ॥२५॥ कां बाह्य विषयाब्धींत । लोटिसी तूं कृपावंत । आतां धरीं माझा हात । वरी त्वरीत काढी मज ॥२६॥ तूं हात माझा धरितां । मी येई हो वरता । मांडीवरी फोड होतां । त्या निमित्तानें ही भेट ॥२७॥ माझा मंगळ हो भाव । गुरु म्हणे फोडा दाखिव । येरु मांडी पाहे तंव । स्फोटकाभाव झालाचि ॥२८॥ म्हणे शाबास हे भेट । माझा गमविला स्फोट । म्हणे नेणें मी हे कूट । द्यावी भेट हा तव हेतू ॥२९॥ मी शास्त्रबाह्य जरी । गोहत्यादिक न करीं । म्हणे माझी पहा पुरी । नमस्कारी वारंवार ॥३०॥ तो अमित सेना दावी । तयां पालखींत बैसवी । स्वयें पायीं चाले पदवीं । गुरु बैसवी यानी तया ॥३१॥ पुढें दर्शन घे म्हणून । पापनाशतीर्थी येवून । राहे गुरु त्या प्रार्थून । नागनाथ घरीं नेयी ॥३२॥ गुरु मुख्य शिष्यांसहित । जेवूनियां तीर्थी येत । तो राजा त्या नगरांत । ने वाचत गाजत गात ॥३३॥ विविक्त दृष्टी भगवान । जाती पुरीं भक्ताधीन । दावी सर्वा भेटवोन । प्रीती करुन निजैश्वर्या ॥३४॥ ती गम्मत न बोलवें । महोत्सव केला रावें । आतां पाददास्य द्यावें । म्हणूनी भावें प्रार्थी भूप ॥३५॥ तनया राज्य देऊन । तूं श्रीशैलावर येऊन । घेयी माझें दर्शन । राव ज्ञान असो म्हणे ॥३६॥ पदीं नम्र झाला राव । आश्वासन गुरुराव । गाणगापुरीं पुनः ठाव । घेयी देव भक्ताधीन ॥३७॥ तें अघहारि दर्शन । होतां जनही हर्षून । सर्व करिती नीरांजन । गुरु स्तवनपूर्वक तें ॥३८॥ इति श्री०प०प०वा०स०धि० सारे यवनोद्धरणं नाम पंचाशत्तमो० —————————————————————— आतां एथें न रहावें । कलियुगीं गुप्त व्हावें । असें म्हणतां गुरुराव । अवघे दुःखित होती तें ॥१॥ गुरु तयां आश्वासून । म्हणे भजती आतां हीन । पुढें येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥ जे सद्‌बुद्धि असती लोक । दिसो तयांसी सम्यक । गाणगापुरीं राहूं भाक । घ्याहो लोक त्रिवाचेसी ॥३॥ भवाध्वा हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम । ते पुरोनि अंतीं धाम । मिळेल नाम माझे गातां ॥४॥ भवांबुधितरणार्थ । भजा मज मिळेल स्वार्थ । चरित गाता मनोरथ । पुरती, व्यर्थ चिंता नसो ॥५॥ हो सद्धित पादुकार्चनीं । विघ्नहर चिंतामणी । अर्चा प्रातःकृष्णास्नानीं । जाउनि रोज येयीन मी ॥६॥ भक्तिमान्‌ भावी जसा जसा । त्यापाशीं मी तसा तसा । गुरुचा हो बोल ऐसा । नामधारका म्हणे सिद्ध ॥७॥ रहस्यार्थ गुरुचरिताचा सिद्धनामधारकाचा । संवाद जो लोकीं साचा । सार तयाचा हा चिद्रस ॥८॥ हें सत्कृपा करुनी दत्त । वदवी प्रेरुंनियां चित्त । तया पदीं हा समस्त । समर्पित असो ग्रंथ ॥९॥ इति श्री०प०वा०स०वि० सारे वरप्रदानं नाम एकपंचाशत्तमो० ॥इति श्रीसप्तशतीगुरुचरित्रं समाप्तं॥

Search

Search here.