श्री शंकरमहाराज आरती2

आरती  > श्री सद्‌गुरु आरती Posted at 2018-12-05 18:22:21
श्री शंकरमहाराज आरती ( सिध्दयोगी डॉ. दा. ना. धनेश्वर यांनी गायीलेली ) ।। ॐ दीनानाथ गुरू माऊली ।। अज्ञानतमे गिळिले ज्ञान तेजाला । अहंकारे धर्म समूळ बुडवीला । त्राहि त्राहि एकचि आरोळा झाला । दिनोध्दारणा लागी अवतार झाला । जयदेव जयदेव सद्गुरू अवतारा, श्री दत्तावतारा । तारक तू आम्हासी, तारक तू सकलासी, शंकर दातारा ।।१।। पुराणपुरूषा सकल धर्म आचार्या । सुरवर मुनिजन सर्वां एकचि गुरूवर्या । पांडुरंगा आदिनाथा गुरू दत्तात्रेया । अपार नामे नटला चालवी निजकार्या । जयदेव ।।२।। त्रिविधा गुण कर्माचे सूत्र तव अधिन । तिन्ही लोकांवरती सत्ता पूर्ण शरणागत कैवारी भवभय संहरण नारायणा नित्य दाखवी तव चरण । जयदेव ।।३।।

Search

Search here.