शिवराजांची आरती

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-03-28 11:20:16
जय देव जय देव जय जय शिवराया ।
जय जय शिवराया ।
या या अनन्य शरणा आर्या ताराया ।।
जय देव जय देव जय जय शिवराया ।। धृ.।।
आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिव भूपाला ।
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदुनि तव हृदय न का गेला ।। १।।
श्री जगदंबाजी स्तव शुम्भादिक भक्षी ।
दशमुख मर्दुनि श्री श्री रघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळता ।
तुजवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता ।। २ ।।
त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधू परित्राणाय दुष्कृती नाशाया ।
भगवान भगवद्गीता सार्थ कार्य या ।। ३ ।।
जय देव जय देव जय जय शिवराया ।
जय जय शिवराया ।
या या अनन्य शरणा आर्या ताराया ।।
जय देव जय देव जय जय शिवराया ।। धृ.।।

Search

Search here.