टेंबे स्वामी आरती2

आरती  > श्री सद्‌गुरु आरती Posted at 2018-11-30 10:46:56
श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || टेंब्येकुळी जन्मूनी होसी बहूगुणी अत्रीगोत्री होउनी, होसी निर्गुणी ज्योतिर्ज्ञानी होउनी कीर्ती पसरीसी सार्थ वेदा जाणुनी शिष्य पढवीसी || १ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || शके सतराशे शहात्तर साली श्रावणमासी वद्य षष्ठी शुभकाली जन्मा येती वासूदेव या नामे भक्ता उद्धाराया बहुविध यत्ने || २ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || शके अठराशे छत्तीससाली आषाढातील शुद्ध प्रतिपदा दिवशी नाशिवंतदेहा सोडुनि हो जासी असंख्य भक्ता देउनि इच्छित हेतूसी || ३ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || शके अठराशे अडतीससाली वैशाखातील शुद्ध द्वादशी दिवशी सुंदरवाडीग्रामी राहाण्या इच्छूनी गुप्तरूपे घेशी स्थान निर्मूनी || ४ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || साठी वर्षामाजी केल्या बहूलीला वैदिकधर्मासाठी देह झिझविला संन्यास घेऊनि धर्म रक्षीला आत्मज्ञानमार्ग भक्ता दावीला || ५ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || जाणुनि आयुर्वेदा रोगा दवडीसी योजुनि युक्तमंत्रा भूता बांधीसी ऐशा अनन्तलीला वर्णू मी किती बुद्धप्रेरक होउनि तूचि वर्णीसी || ६ || जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

Search

Search here.