श्रीयोगेश्वरी आरती अंबेजोगा‌ई

आरती  > देवी आरती Posted at 2018-11-02 15:05:38
॥ श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती ॥ जय देवी जय देवी जय योगेश्वरी अंबे । आरती करितो भावे तुजला जगदंबे ॥धृ॥ कोकण प्रांती अंबे घे‌ऊनी अवतार भक्ती मार्गा जगती वाढविले फार जयंति नगरी मारून दंतासुर घोर भक्ता मनोप्सित देण्या वससी ते नगर ॥१॥ योगा‌ईऽ तव ख्याती ब्रह्मांडी ज्ञात शेषही गाता शिणला तव गुण अगणित ब्रह्मा विष्णू सदाशिव निशिदिन तुज ध्यात इन्द्रादिक ते सुरवर तवपद सेवीत ॥२॥ अंबानगर निवासिनी सर्वेश्वर जननी दानव दुष्ट विमर्दिनी स्वभक्त सुखकारिणी दासा रक्षण करणी पातक संहरणी दास हरी तव चरणी नत हो दिन रजनी ॥३॥

Search

Search here.