आरती ज्ञानराजा
आरती > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-12-09 08:04:28
आरती ज्ञानरायाची
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।।
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।
कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरूहो । सामगायन करी ।।
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रहचि केलें ।
राम जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ।।
Search
Search here.