अम्बा - देवी आरती
सुखसदने शशिवदने अम्बे मृगनयने ।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ।
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १॥
जय देवी जय देवी वो जय अम्बे ।
कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदम्बे ॥ धृ ॥
मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।
चिद्गगगनाचा गाभा अम्बा वेल्हाळी ॥ जय... ॥ २॥
कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें ।
पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।
पदकमळ लावण्ये अम्बा शोभतसे ॥ जय ...॥ ३॥
झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी ।
अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय... ॥ ४॥
अष्टहि भूजा सुंदर शोभतसे ।
झगझगझगझगझगति लावण्यगाभा ।
म्हगम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा ।
त्र्यम्बक मधुकर होऊनि वर्णितसे अम्बा ॥ जय... ॥ ५॥
Search
Search here.