अनंत पूजा साहित्य
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-10-14 05:27:06
श्री अनंत पूजा साहित्य सूची
१ मोठा चौरंग,
२पाट (बसण्यायोग्य) / आसन
पाटावर घालण्यास शाल
४ ताटे ,१० वाट्या /द्रोण, ४ चमचे
२ समया , २ नीरांजने तुपाची
तीळाचे तेल, वाटीभर तूप
समईच्या वाती , फुलवाती
उदबत्त्या ,काडेपेटी, कापूर डबी,ऊदबत्ती घर,
अनंत फोटोफ्रेम (घरी असल्यास),
२ कलश (तांब्याचे) ,
३ ताम्हणे , १पळी -भांडे,
गंध उगाळलेले किंवा चंदन पावडर
हळद-कुंकु-गुलाल-बुक्का -रांगोळी
२ किलो तांदूळ (निवडलेले बारीक)
५नारळ – गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य
३५ सुपाऱ्या - १ रु. ची २५ नाणी
पंचामृत (दूध-दही-तूप-मध-साखर)
४जानवीजोड ,कापसाची वस्त्रे ४
२ मोठे पंचे,३ ब्लाउज पीस,
५ फळे - ६ केळी
तुळशीची पाने १०८निवडलेली + अन्य वेळी वाहण्याकरिता
१ जुडी दुर्वा – बेल ५ /६ पाने
४ आंब्याचे डहाळे
६ गजरे , एखादी वेणी
४ केळीचे खांब – सुतळ किंवा नाडी बंडल
जास्वंद-झेंडू-निशिगंध-शेवंती-अस्टर-गुलाब-चाफा-केवडा-सोनटक्का
अशी विविध प्रकारची फुले व सजावटीकरिता गोल्डन स्टिक्स,ग्लॅडिअस,फुलांच्या माळा
३५ विड्याची पाने ,
६ केळीची पाने ,
अपूप (अनारसे,बत्तासे,म्हैसुरपक इत्यादी)प्रसाद ( पेढे,बर्फी)
जेवणाचा नैवेद्य
अनंताचा दोरा, दर्भाचा नाग,
-घंटा,
देव पुसायचे वस्त्र , लादी पुसायला डस्टर/फडके इ.
पूजा करणाऱ्या पुरुषाने सोवळे अथवा धोतर-उपरणे अथवा लेंगा झब्बा अशा वेशात
तर स्त्रीने नउवार/सहावार साडी शाल अशा सात्विक वेशात पूजा करावी.
त्रास कमी व्हावा म्हणून चौरंगाला केळीचे खांब व्यवस्थित बांधून, चौरंग सजवून ठेवावा.
तुळशी जुड्या आदल्या दिवशी आणल्यास ,तुळशीपत्र निवडून ठेवण्याचा पूजेच्या दिवशीचा वेळ वाचू शकतो.
हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, गंध, अक्षता वेगवेगळ्या वाट्यात किंवा द्रोणात काढून ठेवावे.
पूजा सांगतेच्या निमित्त दाम्पत्य (जोडपे) भोजन असल्यास त्यांचा मान ,
ब्राह्मण शिधा
गुरुजींची दक्षिणा ₹
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ...

Search
Search here.