अष्टविनायक आरती
कार्यारंभी पूजा सारे तव करिती ।
मोदक लाडू खाद्ये तुजला अर्पिती ।।
मांदार दुर्वां शमि तुजला या जगती ।
वाहुनी भक्ता होते इछ्चित फलप्राप्ति ।। १ ।।
जयदेव जयदेव जय गणपति देवा ।
संकट नाशक म्हणुनी तुझा करू धावा ।। ध्रु ।।
मोरगाव क्ष्रेत्री श्री मोरेश्वर ।
ओझर क्ष्रेत्री झाला श्री विघ्नेश्वर ।।
सिध्दीटेकी नांदे सिध्दी विनायक ।
थेऊर चा चिंतामणि पुण्य प्रदलोक ।। २ ।।
लेण्याद्री मध्ये तो श्रीगिरीजात्मक ।
देव महडीचा श्री वरदराज ।।
पालीमध्ये शोभे बल्लाळेश्वर ।
रांजणगावचा श्री गणपति थोर ।। ३ ।।
Search
Search here.