अशुन्य शयन व्रत
व्रत - पूजा - कथा Posted at 2016-07-15 16:35:17अशुन्यशयन व्रत
आषाढ कृष्ण द्वितीया ते मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया पर्यंत शेष शय्या वर लक्ष्मीसह नारायण शयन करतात म्हणून अशुन्य शयन व्रत म्हणतात . आषाढ कृष्ण द्वितीयेला ( दोन दिवस असेल तर पूर्वविद्धा व एक दिवस असेल तर परविद्धा ) प्रातःकाळी स्नानादी शुचिर्भूत होऊन शेष शय्येवरील लक्ष्मीसह नारायणाचे पूजन करावे. दिवसभर मौन व्रत पाळावे . संध्याकाळी स्नानादी करून पुन्हा शेष शय्यास्थित लक्ष्मी नारायणाचे पूजन करून चंद्रोदय होईपर्यंत नाम संकीर्तन करून चंद्रोदय वेळी लक्ष्मीनारायण स्मरण चिंतन करून खालील मंत्राने अर्घ्य द्यावे .. गगनांगण संदीप क्षिराब्धि मथनोद्भव | भाभासितदिगा भोग रमानुज नमोस्तुते || अर्घ्य दिल्यानंतर लक्ष्मी नारायण स्मरण करून भोजन करावे . असे प्रत्येक कृष्ण द्वितीयेला करावे . मार्गशीर्ष द्वितीयेला हे व्रत करून तृतीयेला ब्राह्मणाला घरी बोलावून त्याचे कडून लक्ष्मीनारायण अभिषेक पूजन करावे . व नंतर ब्राह्मण पूजन करून त्याला वस्त्र फळ दक्षिणा देणे . आंबट फळे व स्त्रीलिंगी नाव असलेले फळ देऊ नये . या व्रता मुळे सौभाग्य अखंड राहते व कुटुंबात सदैव स्नेह प्रीती अखंडित राहते . या व्रता मध्ये मौन असणे खूप मुख्य आहे .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा
Search
Search here.