दत्त रक्षा स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > श्री दत्तात्रेय स्तोत्र Posted at 2016-02-13 02:50:49
श्री दत्तगुरूंची पूर्ण कृपा आशीर्वाद संपादन साठी व सर्व दुःख चिंता नष्ट होण्या साठी मराठीतून सोप्या भाषेतील हे स्तोत्र --- दत्त रक्षा स्तोत्र ह्या दत्तरक्षास्तोत्राचा । ऋषि अव्यक्त बोलिला । अनुष्ठुप छंद हा त्याचा । देवता दत्त योगिराट् ॥१॥ बीज द्रां शक्ति हीं क्लीं हें । कीलक वज्रसें महान् । धर्मार्थकाममोक्षार्थीं । विनियोग असे तथा ॥२॥ अथ ध्यानम् माल कमंडलु लसे कर खालच्यांत । डमरुत्रिशूळ मधल्या करपद्मयुग्मीं । ऊंच द्विहस्तकमलीं शुभशंखचक्र । ऐशा नमूं विधि हरीश स्वरुप दत्ता ॥३॥ इति ध्यानम् धरुनि ध्यान ऐसें हें । भावें सात्त्विक वंदुनी । मानसपूजनीं प्रेमें । तोषवूं गुरुमूर्तिला ॥४॥ पृथ्ची तत्त्वें करुं टीळा । लंब्रीर्जे हरुषें तथा । हं-बीजें व्योमतत्त्वें त्या । अर्पू पुष्पें यथा मति ॥५॥ यं-बीजें धूपवातात्मा । अग्न्यात्मा दीप रं तथा । नैवेद्यार्थी अमृतात्मा । कं-बीजें अर्पिला पुनः ॥६॥ सं-बीजें कल्पिलें शेष । नत्यादि सूपचार जें । सर्वार्पण बली तैसा । दास्यें देह दमूं मुदा ॥७॥ रक्षो दत्तात्रेय डोकें । भाल अत्रिसुतर्षभ । नासिका योगिराड् रक्षो । रक्षो नेत्र अनंतदृक् ॥८॥ रक्षो तोंड सर्वभक्षी । रक्षो ओठ जनार्दन । रक्षो जिह्वा शारदात्मा । रक्षो दंत दयानिधि ॥९॥ वनस्पतीश केसांना । वाताश्वारुढ कर्ण हे । रक्षो हनुवटी शूली । रक्षो कंठ कलानिधि ॥१०॥ स्कंध खं ब्रह्मरुपीं जे । रक्षो कांडीं कृपांबुधी । हात हारी अंगुलींना । रक्षो आरण्य वासी जो ॥११॥ रक्षो छाती सोमभ्राता । काळीज कर्मसाक्षी तो । हरि हृदय रक्षो हा । हृदयस्थ करो सदा ॥१२॥ विश्वंभर विश्वरुपी । रक्षो पोट सनातन । रक्षो कटि कामरुपी । जंघा आजानुबाहु जो ॥१३॥ जानु अत्रितनूत्पन्न । घोटे हे धनकांतिधृक् । नखें नानारुपधारी । वामनात्मा तथा पद ॥१४॥ यमरुपी गुदा रक्षो । रक्षो लिंग प्रजापति । कमेंद्रियें कर्मशून्य । ज्ञानी ज्ञानेंद्रियें तथा ॥१५॥ रक्षो मज्जा महामायी । मेद त्रैलोक्य मोहन । मांस मेधानिधी रक्षो । रक्तलोहित लोचन ॥१६॥ अस्थी आनंदमूर्ती हा । त्वचा तारुण्यमूर्तिमान् । रक्षो वीर्य चिरंजीवी । लाळ लावण्यसागर ॥१७॥ षड्‌भुजा चक्रषड्‌ रक्षो । सहस्त्रारनिवासी जो । आपदशीर्ष अद्वैत । नाऽयादि नररुपधृक् ॥१८॥ दुर्विकारांतून कामादि । रक्षो नृसिंह नाटकी । वासुदेव आधिव्याधि । उपाधींतून संयमी ॥१९॥ भूतप्रेतादिपासून । रक्षो श्रीपादवल्लभ । कालकाल दुर्ग्रहीतो । जन्ममृत्यूहूनी हर ॥२०॥ पूर्वेकडे वायुभक्षी । पश्चिमीं पावकोपम । उत्तरीं व्योमकेशी हा । रक्षा दैत्यारि दक्षिणीं ॥२१॥ चार कोणीं कामचारी । ऊंचीं अव्यक्त अतिथि । खालीं सश्चित्सुखात्मा जो । शेषछत्र स्थळीं स्थळीं ।।२२॥ मृत्यूचा मृत्यु मध्यें जो । मृत्युंजय चहूंकडे । जनीं जात्यनवच्छिन्न । सहवासीं वनीं तधा ॥२३॥ जलशायीं जळीं रक्षो । स्थाणुरुप स्थळीं स्थळी । अग्नीमध्यें अनंतात्मा । शस्त्रास्त्राहून तो बळी ।।२४॥ रक्षो दुष्टाहून दाता । खेचरीं तो खलांतक । व्यालादीं जो जगन्नाथ । भूचरीं हा भयानक ॥२५॥ जळीं जळचराहूनी । रक्षो पन्नगभूषण । सर्वस्थळीं जटाधारी । संकटी विषमस्थळीं ॥२६॥ जागतां स्मर्तृगामी तो । सूत्रात्मा स्वप्‍नदर्शनीं । मूर्छाकाळीं अमेयात्मा । निद्रेंत अनधाप्रिय ॥२७॥ रक्षो रोगी रोगशून्य । भोगी भोगद सर्वदा । स्वास्थ्यीं शर्मद शांतात्मा । सदा ब्रह्म दिगंबर ॥२८॥ दुर्भक्षीं अन्न्पूर्णेंश । सुभिक्षीं सकलार्तिहा । सूतकीं शरणत्राता । मंगलीं मोददायका ॥२९॥ रक्षो सदा सिद्वराज । सर्वत्र सर्वदा सुधी । क्षमापून दोष सर्व । यथा माता स्तनंधय ॥३०॥ दत्तरक्षा स्तोत्र हें जो । पठे भोगापर्वद । त्रिकाळीं एककाळीं वा । भय त्याला नडे कुठें ॥३१॥ औदुंबरतळीं कोणी । प्रातःकाळीं पढे नर । गृहांगणीं सांजकाळीं । अथवा शयनस्थळीं ॥३२॥ दुपारीं देवमंदिरीं । शुचिर्भूतपणें सदा । रक्षो भावें पढें त्याला । अत्रिवरप्रद तथा ॥३३॥ श्रीदत्त दत्त कुलतारक दत्त दत्त । श्रीदत्त दत्त रिपुमारक दत्त दत्त । श्रीदत्त दत्त भयहारक दत्त दत्त । श्रीदत्त दत्त मुददायक दत्त दत्त ॥३४॥ स्मरतां रे दत्त दत्त । निर्जनीं देह हा पडो । पावो तृप्‍ति पशूपक्षी । मिष्टदेहान्नसेवनें ॥३५॥ ज्या ज्या स्थळीं हे मन जाय माझें । त्या त्या स्थळीं सद‌गुरु रुप तूझें । मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणीं । तेथें तुझें सद्‌गुरु पाय दोन्हीं ॥३६॥ श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.