श्रीगुरू दत्तात्रय प्रार्थना

स्तोत्र - मंत्र  > श्री दत्तात्रेय स्तोत्र Posted at 2019-02-09 03:02:08
|| श्रीगुरू दत्तात्रय प्रार्थना || गुरुराया नरहरी दत्तात्रया येई येई बा |करुणासागरा | पुरूषोतमा ||नरहरी कल्पद्रुमा | अठरा पुराणा |तव महिमान कळे निगमागमा ||पतितपावना करुणालया ||नरहरी दत्तात्रया येई येई बा|गुरुराया, स्वामी दत्तात्रया |येई येई बा|||१ || तापत्रयाने ,। तापविले देह माझे कष्टविले || कोठे विश्रांती |नाढळे चरण तुझे सापडले ||आता कृपेची करी छाया || येई येई बा ||२ || कामक्रोधादी, । अहंकार उठती वारंवार ||अंगी मातला ,अविचार पडला अंधकार ||स्त्रिया पुत्रांसी बहुमया ।।येई येई बा ||३|| वर्णू तुझी कीर्ती । लवलाही रजकाला पाछाई ||दिधली क्षणात बा | तू काही तूची बापमाई||अघटीत घटना तुझी |बा सखया ||स्वामी दत्तात्रया |येई येई बा ||४ || नवसा करुनी तुला । निघाला |धनिक उदिमा गेला |लाभ चौगुणी त्या झाला || चोरांनी मारिला | तस्कर वधूनिया |उठविसी तया ।।येई येई बा||५ || अन्न भक्षिता उठे शूळ | विप्र करी तळमळ प्राण त्यागिता |तात्काळ | आणविसी आपणाजवळ || अन्नची औषध दे |भक्षाया ।।येई येई बा||६ || करवीर क्षेत्रीचा द्विजपुत्र |विद्येवीण अपवित्र |जिव्हा छेदुनिया |अहोरात्र |करी भुवनेश्वरीस्तोत्र ||देशी चौदाही |विद्या तया ।।येई येई बा||७ || अन्नपूर्णा तुज करजोडी ||पक्वान्ने बहु वाढी |घेवड्या शेंगाची तुज गोडी ||भला दिनाचा गडी ||देशी घागर भरून |पुतळया तया ।।येई येई बा||८ || शिरोळ ग्रामीची द्विजनारी |पुत्र समंध मारी |ठेवी कलेवर |औदुंबरी | म्हणे पाव श्रीहरी | उठविसी तात्काळ ||पुत्र तया ।।येई येई बा||९ || वांझ महिशीचे दुग्ध पिसी || विप्रस्त्री सुखविसी ||पतिता मुखी वेद बोलविसी |द्विजगर्वा छेदिसी नकळे कवणाला |तव चर्चा ।।येई येई बा||१० || त्रिविक्रम भारती |करी निंदा |म्हणे हा दांभिक धंदा |विश्वरूप तया |मुकुंद ||दाखविसी गोविंदा |नरसिंहसरस्वती |गुरुराया ।।येई येई बा||११ || माहूर पुरीचा रोगी पती ||घेउनी निघाली सती |मार्गी मरण आले ||तयाप्रती | करी बहू काकुळती ||देशी अभय तया |सौभाग्या ।।येई येई बा ||१२ || सत्कर्माचरणी बहुश्रुत |नेमे वरिले चित्त ||परान्न भक्षाया उदुक्त ||स्त्री बहु तळमळीत |आज्ञा देऊनिया ||दांपत्या विपरीत देखे जाया |आली बा भेटाया |तव पाया ।।येई येई बा||१३ || तीन पात्रांची सामुग्री |ब्राह्मण भिक्षा करी |छाटी झाकुनिया|अन्नावरी ||जेविले सह्स्त्रचारी |कीर्ती झाली बा ||जगत्रया ।।येई येई बा||१४ || साठ वर्षांची म्हातारी |वंध्या पदर पसरी ||करुणा येऊ दे |तुज नरहरी |देशी पुत्रकुमारी ||समर्थ दुखःचि तू |हराया।।येई येई बा ||१५ || श्वेतकुष्टाने व्यापिला |ब्राह्मण धावत आला ||रक्षी रक्षी म्हणे |दयाळा ||शुष्ककाष्ट द्रुम केला |निर्मल झालिबा|| तत्काया ।।येई येई बा||१६ || तंतुक भक्त तुझी | करी सेवा |म्हणे पावगा देवा |दर्शन श्रीशैल्या ||महादेवा |करविसी केशवा ||माता पिता तू गुरुराया ।।येई येई बा||१७ || देवा दिपवाळीचे दिवशी |अष्टरूप झालासी |आठ गृही भिक्षा | तू घेसी |दीनबंधू म्हणविसी |करीशी भक्तासी | बहु माया ।।येई येई बा||१८ || गाणगग्रामीचा कुलवाडी |मार्गी उभा कर जोडी || आडवा पुढे पडे |घडो घडी |पीक हजारो खंडी |देसी शूद्राला |स्वामीया ।।येई येई बा||१९ || सायंदेव पंत |निजभक्त |तव भजनी आसक्त ||दिधले तयासी बा || नीज तक्त |अशा कथा अनंत | शेषादिक थकले |गुणगाया ।।येई येई बा||२० || केवळ मतिमंद पातकी |बहु जन्माचा दुःखी |महादेवात्म्जा |करा सुखी |कृपादृष्टी अवलोकी |ठेवा हात शिरी |करा दया ||२१ || नरहरी दत्तात्रया येई येई बा||

Search

Search here.