दिप अमावस्या दिपपूजन

सण व उत्सव Posted at 2018-08-09 16:55:22

दिप अमावस्या दिपपूजन

*दिप अमावस्या* आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरूद तिला प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना,  गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची  करूणा भक्तात. या देवताना  नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात.  भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे  प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे. अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे 'गटारी अमावस्या ' आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद व अश्विन या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मग या सर्वाचे शोकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे सर्व मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद झाल्याने गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. अंधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच. दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे... मुळात गटारी फिटारी असा काही सण आपल्या धर्मात नाहीये... हे नामकरण दारुड्या टवाळ अधार्मिकानी केले आहे. या सणाला घरातले सर्व दिवे धुवून - स्वच्छ साफ करून - उजळून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण... त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुन्याची) अमावस्या च म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...वेळी च सावध व्हा , उद्या हे हरामखोर दारुडे म्हणतील की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो, सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे... तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती... तसेच आपल्या हिंदू धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या सणांचा व संस्कृतीचा मान राखावा .. सौजन्य - आंतरजाल , व्हाट्सअप , मुखपुस्तिका

Search

Search here.