धुप दिप झाला आता

भजन - स्तुती Posted at 2018-10-11 18:09:19

धूप दिप झाला आता

धुप दिप झाला आता धुप दिप झाला आता कापुर आरती । रत्न जडित सिहासनी मंगलमय मुर्ति ॥ध्रु॥ कापुरा सम निर्मळ माझे मानस राहु दे । कापुरा / कुसुमा सम भाव भक्ति चा सुगंध वाहु दे ॥1॥ ध्यान कळेना ज्ञान कळेना न कळे काही । शब्द रुपी गुंफुनी माळा वाहतसे पायी ॥2॥ नेत्री ध्यान मुखी नाम ह्रुदयी तव मुर्ती । भाव भक्तीने केली देवा / देवी कापुर आरती ॥3॥

Search

Search here.