दृष्ट काढणे नजर उतरवणे
उपाय - तोडगे Posted at 2019-09-30 00:44:09दृष्ट काढण्याच्या , नजर उतरवण्याचा वेगवेगळ्या पद्धती
जन्मल्यापासून सहा महिन्यांपर्यंत रोज किंवा एक दिवस आड , संध्याकाळी दिवेलागणीला फूल आणि पाणि यांनी दृष्ट काढावी. उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलाच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावेत. ते करत असतांना खालील मंत्र म्हणावा;-
"दृष्ट मिष्ट, आल्यागेल्याची, नात्या-गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ-काताळाची, काळ्या माणसाची, गोर्या माणसाची, स्त्री पुरूषाची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची... दृष्ट दूर होवो.. "
असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घराबाहेर नेऊन टाकून द्यावे. आणि खालील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा.
वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरि: | रक्षतु त्वरितोबालं मुंच मुंच कुमारकम् ||
सहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी आणि अष्टमी, पौर्णिमा व अमावास्येला मीठ मोहरीने दृष्ट काढावी. त्यासाठी मंत्र वरीलप्रमाणेच आहे. फक्त दोन्ही हातात मीठ मोहरी घेऊन सात वेळा मुलावरून उतरवून जमीनीवर बोटे मोडावीत. तसेच दृष्ट काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव जी फोडणीसाठी वापरतात, ती गॅसवर गरम करत ठेवावी. दृष्ट काढेपर्यंत ती पूर्ण तापेल या हिशोबाने. दृष्ट काढल्यावर मीठ मोहरी त्या तापलेल्या लोखंडाच्या डावेत टाकावी. ते टाकल्यावर गॅसजवळ उभे राहू नये. मोहोरी तडतडते. डोळ्यात जायची शक्यता असते. त्यामुळे ते टाकून लगेच गॅस पासून दूर व्हावे. पाच मिनिटांनी ते जळल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्याचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा.
दृष्ट काढण्याच्या विविध पद्धती
१. मीठ आणि मोहरी यांच्या साहाय्याने दृष्ट काढण्याची पद्धत
मीठ आणि मोहरी एकत्र करावी. मिठाचे प्रमाण जास्त आणि मोहरीचे प्रमाण अल्प असावे. पाच बोटे जुळवून त्यात मावेल एवढी मीठ-मोहरी दोन्ही हातांत घेऊन हातांच्या मुठी कराव्यात. वळलेल्या मुठी खालच्या म्हणजेच भूमीच्या दिशेने करून हातांची स्थिती ‘फुली’च्या आकारासारखी करून उभे रहावे. त्यानंतर दृष्ट काढणार्या व्यक्तीने तिचे हात खालून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने फिरवावेत. दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्यांवर जाळावी.
सूचना : वरील सूत्रात (मुद्यात) दिल्याप्रमाणे दृष्ट लागलेलीच नसेल, तर मीठ आणि मोहरी जाळल्यावर दुर्गंध येणार नाही. याचा अर्थ ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नाही’, असा होतो; परंतु यानंतरही व्यक्तीला स्थुलातून त्रासाची लक्षणे जाणवतच राहिली, तर ‘दृष्ट निघालीच नाही’, असे समजावे आणि एक-एक तासाने दृष्ट काढत रहावी. तरीही दृष्ट निघत नसेल, तर दृष्ट काढण्यासाठी पुढच्या टप्प्याचे घटक उदा. नारळ वापरून पहावे. एवढे करूनही त्रास गेला नाही, तर त्याविषयी अध्यात्मातील जाणकार व्यक्तीला किंवा उन्नतांना विचारावे. ते सांगतील त्यानुसार आध्यात्मिक उपाय करावेत.
दृष्ट कशी काढावी व त्यावरील उपाय -----
१) सर्वांसाठी -- खडेमीठ व मोहरी हातात घेऊन व्यक्तिवरुन ७ वेळा ओवाळावे व मीठ मोहरी विस्तवावर टाकून द्याव्यात नंतर विस्तवातला अंगारा व्यक्तिच्या कपाळी लावावा .
मंत्र : "द्रिष्ट मिष्ट पापे चांडाळाची, भुताखेताची, आल्यागेलाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो "
२) लहान बालकांसाठी --
हातात विभुती घेऊन पुढील मंत्र १ वेळा म्हणुन मुलाला लावावा .
वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरि:
रक्षतु त्वरितोबालं मुंच मुंच कुमारंक
कृष्णरक्षशिशुं शंख मधु कैटभ मर्दन
प्रात: संगव मध्याला साया हेषुच संध्ययो :
महानिशि सदा रक्ष कंसारिष्ट निजुदन
यग्दोरज: पिशाचांश्च ग्रहान मातृग्रहानपि
बालग्रहान विशेषेण छिंधि छिधि महाभयान
त्राहित्राहि हरे नित्यं त्वद्रक्षांभूषितं शिशुं
3) सर्वांसाठी --- बुधवारी मारुतीच्या देवळांत जाऊन खाद्यावरील शेंदूर आणावा व दृष्ट लागलेल्या माणसाच्या कपाळाला लावावा .
४) वास्तु / जागा साठी --- शेणाची लहानशी पणती तयार करावी व तीत गुळचा खडा, खोबरेल तेल, व वात घालून ती पणती पेटवून घराच्या उंबऱ्यावर ठेऊन द्यावी .
५) सर्वांसाठी --- साधारण तिन्ही सांजा थोंडे मीठ सुकी लाल मिरची देठाची थोडी मोहरी केरसुणीचा लहानसा तुकडा ( शेवटचा झाडू काढतो तो भाग त्यांतील ) हे एकत्र मुठीत घेऊन पुढील मंत्र म्हनट ७ वेळा वरुन् खाली उतरून स्टोव्हवर पत्रा ठेऊन त्यावर टाकावे विस्तव अथवा गोवऱ्याच्या विस्तवावर असल्यास उत्तम याने दृष्ट ताबडतोड उतरते असे ३ शनिवार करावेत .
मंत्र -- दृष्ट मिष्ट, आल्यागेल्याची, नाती गोत्याची घरच्या बाहेरच्यांची काळ्या पांढऱ्याची स्त्री पुरुषांची, भुताखेताची वेताळ काताळची दृष्ट जळून जावो .
Search
Search here.