महिषासुर मर्दिनी आरती
महिषासुरमथीनी देवि त्रिपुरसुंदरी ।
ओवाळीन पंचारती घेऊनि करी ।। ध्रु॰ ।।
रत्नजडित सिंहासनी नित्य बैससी ।
दीप्तीने लाजविले भास्कर शशी ।
अष्टभुजा देवी तुज पुजू भक्तीसी ।
देई येई पाही , सुखसदने , मृगनयने ।
शशिवदने , पाव झडकरी ।। १ ।।
महिषासुरमथीनी ...
मारूनिया चंड मुंड देव रक्षिसी ।
अवतरुनी भूमीवरी भक्त तारिसी ।
ओवाळीत वासुदेव प्रार्थितो तमी ।
शक्ते , माते , ललिते , भयहरणे ।
सुखकरणे शिवरमणे , मुक्त मज करी ।। २ ।।
महिषासुरमथीनी ...Search
Search here.