सिद्ध गजगौरी कवच

स्तोत्र - मंत्र  > देवी स्तोत्र Posted at 2019-02-20 06:13:38
सिद्ध गजगौरी कवच विधी - संकटग्रस्ताने आपत्तीं विमोचनार्थ इतर प्रयत्न चालू ठेवून या महाकवचाचे अनुष्ठान करावे . पूजाविधी - शुद्धपाण्याने ( पाण्यांत तूळशीचे पान आवश्यक ) जमिनीवर उजवीकडे दोन व डाविकडे दोन स्वस्तिके काढून उजवीकडे दोन व डाविकढे 1 सुपारी स्थापन कराव्या नंतर सेंदूर हींगुळ , गोरोचन यांचे समभान सहाणेवर घेवून त्यात गायीचे दूध चार पळ्या घालून चंदनाने उगाळावे . व ते गंध सुपाऱ्यांना लावावे . ध्यान - श्री गजगौरीचा फोटो समोर ठेवावा व एका ताम्हणांत संस्कारीत प्रवाळ गणपती ठेवावा . ( श्री गजगौरी फोटो व गणपती आमचे दुकानात मिळेल . ) प्रसादासाठी पिठीसाखर व खारीक असावी . तुमच्या पूजेतील देवतांसमोर कींवा श्री गजगौरी देवीच्या फोटोसमोर या प्रमाणे विधिवत शुभ मंगळवारी सकाळी देवीच्या फोटोपुढे आपल्या उजव्या तळहातावर पाणी घेऊन संकल्प ( आपली इच्छा) करावा व ते पाणी तम्हणात सोडवे . पूजापाठ झाल्यावर ते पाणी झाडाला वाहावे . ( तूळस , औदुंबर इ . ) संकल्प फक्त एकवेळा करावा . नंतर दिवसभरात कोणत्याही रिकाम्या वेळात वाचावे . संध्याकाळी , व रात्री झोपण्यापूर्वी वाचावे . ह्याला खाण्यापिण्याचे बंधन नाही . अनुभविक श्रीसीद्ध गजगौरी कवच पारायण - या कवचाची सुरुवात मंगळवारी ९ ते १ या वेळेत तळहातावर पाणी घेऊन देवीच्या फोटो पुढे संगल्प ( इंच्छा ) बोलून करावी . संगल्प फक्त एकदांच करावा . ॐ ऐ ऱ्हीं क्लिं श्री सुता । अज्ञान तिमिरासी विध्वंसिता । संकष्ट घुत्कारी तू सविता । धन्य धन्य गजगौरी ॥ १ ॥ सुपुत्र पराक्रमी नरहरिचा । आपलिया बळें रिघे ऋचा । महाज्वर क्षय या भक्तिचा । निवारय निवारय ॥ २ ॥ वित्त , ज्ञान यशोबल् लाभें । दिनरात्री चौताल गाभे । यशराम हनुमंतापरी उभे । नैवैद्य प्राशने केवळ ॥ ३ ॥ भूत प्रेत पिशाच्च पीड़ा । या जपे तीन दिनांचा तेरडा । कवच किर्तीचा या चौघडा । दुमे दुमे पुरी पुरितून ॥ ४ ॥ जादूटोणा शमन करी हे हो । महाविघ्ने दमन करीन करी हे हो । व्यसन विषकलषांचा ही दाहो । या कवच भावे खंडित ॥ ५ ॥ पळे पळे घटके घटके निवारे । नैमित्तिक संकटांचे गा फवारे । हरी: ॐ भुर्भव : चंद्र तारे । नवग्रह पीडा शांत दाते ॥ ६ ॥ भय असो पाताळेश्वरी गा । धाक असो भूवनेश्वरी गा । गौरी महासती दिव्यगंगा । संकट संहारिणी केवला ॥ ७ ॥ सर्वरिष्ट हे निवारणारे । गोरी गणपती कवच पहा हे । सर्व सौख्याचे लाभवी धुपारे । मनोवांछित पुत्रप्राती ॥ ८ ॥ गौरी गणपतीच्या लोचनी । शंकर पार्वती सुर सद्गुणी । राम सीता ही त्या निशाणी । कृष्ण विष्णुचेही ठसे ॥ ९ ॥ सर्वारिष्ट हन हन हन उपाय । ॐ ऐं ऱ्हीं क्लिं शंभूसुताय । दुर्वांकुर दिव्य सेंदुरली ही काय । नानाविधभोग प्रदायी हे ॥ १० ॥ व्यवहार घडो दोही लाभ ही । रणी शत्रु पराभूत पावतही । स्त्री प्राप्ती प्रिती प्राप्ती करितही । दिव्य कवच माला सुंदरा ॥११ ॥ संग्रामी करिते भाक्तगणां विजयी । द्यूतीं भक्तां कारितसे निर्भयी । विद्यालाभ घडवितसे अक्षयी । सोभाग्यदायी अक्षर ॥ १२ ॥ अनेन विधिना भक्त्या कवचसिद्धिश्च जायते । अक्षरावर्तयेद्यस्त मुच्यते नात्र संशयः । अनेन यथा शक्तिपाठेन गजगौरीकवचं प्रीयतां न मम । संशय : । अनेन यथा शक्तीपाठेन गजगौरीकवचं प्रियतां न मम | हे कवच आपण दिवसांतून अनेक वेळा बोलत राहिलांत किंवा पाठ करून सतत आठवत राहिलात तर आपणांस कधीही न आलेले असे शुभ अनुभव येतील .

Search

Search here.