श्रीमत् सद्गुरूस्वामी जयजय गणराया

आरती  > श्री गजानन महाराज आरती Posted at 2018-10-27 13:20:04
श्री गजानन महाराज आरती १ श्रीमत् सद्गुरू स्वामी जय जय गणराया । आपण अवतरला जगि जडजिव ताराया ॥ धृ०॥ ब्रह्म सनातन जे का ते तू साक्षात स्थावरजंगम भरला तुम्हि ओतप्रोत । तव लीलेचा लागे कवणा नच अंत तुज वानाया नुरले शब्दहि भाषेत ॥ १॥ वरिवरि वेडेपण ते धारण जरि केले परि सत्स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले । निर्जल गदडिसी जल ते आणविले विग नभीचे काननि आज्ञेत वागविले ॥ २॥ दाम्भिक गोसाव्याते प्रत्यय दावून ज्ञानिपणाचा त्याचा हरिला अभिमान । ओङ्कारेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन नर्मदेचे भक्ता करवियले आपण ॥ ३॥ अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा दुस्तरशा भवसागरि तरण्या दे हाता । वारी सदैव अमुची गुरूवर्या चिंता दासगणूच्या ठेवा वरदं करा माथा ॥ ४॥

Search

Search here.