जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया

आरती  > श्री गजानन महाराज आरती Posted at 2018-10-27 13:28:30
गजानन महाराज आरती २ जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जडमूढ ताराया ॥ जय०॥ धृ० ॥ निर्गुणब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी । ते तू तत्त्व खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥ जय०॥ १॥ होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा । करूनी ``गणी गण गणात बोते'' या भजना । धाता हरिहर गुरुवर तूचि सुखसदना । जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना ॥ २॥ लीला अनंत केल्या बंकटसदनास । पेटविले त्या अग्नीवाचूनि चिलमेस । क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ जय०॥ ३॥ व्याधी वारून केले कैकां सम्पन्न । करविले भक्तांलागी विठ्ठल दर्शन । भवसिन्धू हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ जय०॥ ४॥

Search

Search here.