गजानन महाराज आरती

आरती  > श्री गजानन महाराज आरती Posted at 2018-11-22 07:12:28
श्री गजानन महाराज आरती आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था । आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।। दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा । पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।। कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।

Search

Search here.