गणेश स्तोत्र संस्कृत

स्तोत्र - मंत्र  > गणेश स्तोत्र Posted at 2016-03-26 04:21:00
गणपती स्तोत्र संस्कृत आज चतुर्थी .. आज गणपती बाप्पाचे विशेष पूजन अर्चन करावे. ज्यांना उपवास शक्य असेल , इच्छा असेल त्यांनी उपवास करावा . उपवास म्हणजे देवाजवळ वास असे अपेक्षित आहे . किंवा आपल्या मनात देवाचा सदैव वास .. म्हणजे त्याचे सतत मनन चिंतन  करणे .. उपवासामध्ये फळ , रस असे खावे , शिजवलेले अन्न शक्यतो टाळावे . बटाटा रताळे हे कंदमुळ खाऊ शकतात .. तेल वर्ज्य , तूप चालेल . आपले मन शरीर सात्त्विक प्रसन्न राहील असे अन्न उपवासाच्या वेळेस घ्यावे .  त्या त्या देवतेच्या संबंधित उपवासाच्या दिवशी त्या त्या देवतेचे जास्तीत जास्त चिंतन मनन करणे म्हणजे तो उपवास खऱ्या अर्थाने सार्थकी होईल . या चिंतना मध्ये देवतेचा मंत्र जप सतत मनात असावा .. गणपती बाप्पा आपणा सर्वाना सद्बुद्धी प्रदान करून सर्व अरिष्ट - संकट - दुःख निवारण करेल अशी प्रार्थना श्री गणेशाचरणी करूया . गणपती बाप्पा मोरया , मंगल मूर्ती मोरया खालील स्तोत्र हे नारद मुनींनी रचलेले सोपे संस्कृत भाषेत असून याच्या पठणाने सर्व इच्छा पूर्ण होतात . विशेष कृपा प्राप्ती साठी रोज आठ वेळेला म्हणावे . ( ज्यांना हे स्तोत्र म्हणणे जमणार नाही त्यांना याचेच प्राकृत रूपातील स्तोत्र खाली देत आहे ) ©श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा   ।। ॐ गं गणपतये नमः ।। || श्री गणेशाय: नमः || प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्। भक्तावासं स्मरैनित्यं अायु:कामार्थसिद्धये।।1।। प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम। तृतीयं कृष्णं पिगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।। लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।। नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।। द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:। न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।। जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्। संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।। ॥ इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥ ।। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया ।। लिखाण टंकणात काही चूक असेल तर क्षमा करुन सांगावी .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.