विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना
आरती मी करितो तुज पुरवि कामना ।। ध्रु॰ ।।
भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी
मूर्ती करुनी सर्व लोक पूजिती घरी
महिमा तव वर्णवे न पापगिरी हरी
येई , धाई , पाही , करुनि त्वरा ,
विघ्नहरा , दे सुगिरा , हे कृपाघना ।। १ ।। विघ्नांतक...
संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला
मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला
जाणुनि हे तव भजनी ध्यास लागला
गातो , ध्यातो , नमितो , तारि आतां ,
या भक्ता , दयावंता , गौरीनंदना ।। २ ।। विघ्नांतक...
Search
Search here.