गणेश स्थापना यादी
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-09-12 07:49:39
--- श्रीमहागणपती स्थापना पूजा सामान लिस्ट ---
( ही यादी डाउनलोड / शेअर करण्यासाठी खाली लिंक दिली आहे .. यादी तपासून जेव्हा पाहिजे तेव्हा डाउनलोड करावी .. जशी पाहिजे तशी एडिट करून आपल्याला पाठवावी .. )
हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती - कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे - फुलपात्र
शंख , घंटी
पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर सर्व एकत्र ) ..
सुपाऱ्या 10 , लाल / पिवळे / हिरवे वस्त्र किंवा ब्लाउजपिस पाटावर मूर्ती खाली
एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र -- सर्व घरात आधीच शिंपडने ..
विड्याची पाने 15
5 हळकुंड , 5 अक्रोड , 5 खारीक , 5 लवंग , 5 वेलची
11 कॉइन्स - सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 - 3 ,
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी - देव पुसण्यासाठी - देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा - धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
चौरंग वैगेरे मखर सजावट सर्व तयार ठेवणे , गणपती ची मूर्ती आणून मखरामध्ये पाटावर किंवा चौरंगावर व्यवस्थित आधीच ठेवणे , मूर्तीखाली पाटावर किंवा चौरंगावर एक वस्त्र असावे..
देवासाठी ---> एक पंचा किंवा उपरणे किंवा एक नॅपकिन ( नवीन ) देवाच्या अंगावर
5 फळे , 3 नारळ , 2 खोबरेवाट्या , थोडा गूळ , थोडी खडीसाखर
2 तांब्या / पितळेचे कलश पाण्याने भरून ठेवणे , कलशामध्ये आंब्याची पाने किंवा डहाळी ,
2 ताम्हण
थोडे गहू / तांदूळ
दान म्हणून 21 किंवा 11 किंवा निदान 09 तरी धान्ये प्रत्येकी 125 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( --> तूर - मूग - मटकी - वाटाणा - चवळी - हरभरा - चणा डाळ - ज्वारी - बाजरी - पांढरे तीळ - शेंगदाणे - रवा - साबुदाणा - साखर ) ऐच्छिक , इच्छा असल्यास , कंपल्सरी नाही...
घर - जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ..
मखर सजावट वैगेरे सर्व तयार ठेवणे व त्यात चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र ठेवून मूर्ती ठेवणे .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळस दुर्वा बेल वैगेरे थोडेसेच निवडून ठेवावीत.
अपेक्षित माणसांचा प्रसाद मोदक वैगेरे तयार करून ठेवावे किंवा विकत आणावे ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल - उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी - लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल ..
काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ...
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा - लाल - हिरवा आदी भडक रंग नसावा )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ... गणेश स्थापना यादी
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ... गणेश स्थापना यादी
Search
Search here.