श्रीगणेश स्थापना पूजा

व्रत - पूजा - कथा Posted at 2016-08-31 17:19:58

श्रीगणेश स्थापना पूजा

पार्थिव गणपती स्थापना पूजा शहरांमध्ये किंवा अनेक ठिकाणी पूजा स्थापना करायला पुरोहित गुरुजी न मिळाल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते , त्यासाठीच स्थापणापूजा चा संपूर्ण शास्त्रोक्त विधी दिला आहे . या विधीद्वारे घरच्या घरी स्थापना पूजा करू शकतात. घरच्याघरी जरी स्थापना केली तरी नंतर गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून सत्यविनायक पूजा किंवा सत्यनारायण पूजा किंवा गणेशसहस्त्रावर्तन किंवा निदान 21 वेळा अभिषेक असे काही ना काही कर्म करून घ्यावे . याने तुमचे घर शुद्ध होते व विधिवत् अरिष्ट निरसन होते . कारण जो गुरुजी नेहमी सात्विक भोजन आचरण करून सदैव वेद पुराण आदी मंत्र म्हणत असतो तो घरी आल्याने व त्याचे कडून शास्त्रशुद्ध पूजन केल्याने अनेक अरिष्टांचे निरसन होते . स्थापना च्या दिवशी गडबड असते म्हणून स्थापना पूजा स्वतः करायला हरकत नाही , पण इतर कर्म शक्यतो गुरुजींकडूनच करून घ्यावे .. स्वतः श्रीकृष्णाने म्हंटले आहे -- " दैवाधिनम् जगत सर्वम् मंत्राधिनम् च दैवतम् । ते मंत्र ब्राह्मणाधिनम् ब्राहमणो मम दैवतम् ।। मंत्र हि देवता शक्ती आहे व पुरोहित मंत्रांचा विशिष्ट योग्य उच्चारात सदैव जप करत असल्याने ती शक्ती त्याच्या आजूबाजूला असते व त्या शक्तीमुळे वाईट होत नाही .. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना पूजा करावी. प्रातःकाळी अंगाला तीळ लावून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल , गोमूत्र टाकून गरम पाण्याने स्नान करावे. पूजेचे साहित्य - 2 कलश, 2 ताम्हण, संध्यापळी, फुलपात्र, हळद-कुंकू, चंदन / अष्टगंध, गुलाल, रांगोळी, फुले, दूर्वा, तुळशी, बेल, 15 विडयाची पाने, गूळ, खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), शेंदूर, गंध, जानवे, कापूर, उदबत्ती, 2 - 3 नारळ, खारीक, बदाम, 2 - 3 फळे आणि दक्षिणा. फुले पुढीलप्रमाणे - लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक इत्यादि. ( देवाला तेरडा फुल कधीच वापरू नये ) २१ प्रकारची पत्री पुढीलप्रमाणे: ( १ ) मोगरी, ( २ ) माका, ( ३ ) बेलाचे पान, ( ४ ) पांढर्या दूर्वा, ( ५ ) बोरीचे पान, ( ६ ) धोत्र्याचे पान, ( ७ ) तुळस, ( ८ ) शमी, ( ९ ) आघाडा, ( १० ) डोरली, ( ११ ) कण्हेर, ( १२ ) रुई, ( १३ ) अर्जुनसादडा, ( १४ ) विष्णुक्रांता, ( १५ ) डाळिंब, ( १६ ) देवदार, ( १७ ) पांढरा मरवा, ( १८ ) पिंपळ, ( १९ ) जाई, ( २० ) केवडा, ( २१ ) अगस्तिपत्र. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी किंवा आदल्या दिवशी सर्व घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावे, तसेच घरातील सर्वांनी ते प्राशनसुद्धा करावे. दरवाजाला हार, तोरण असावे व दारासमोर रांगोळी काढलेली असावी. मखरामध्ये एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ आणि दूर्वा ठेवून मग त्यावर महागणपतीची पार्थिव मूर्ती एका वस्त्राने झाकून ठेवावी. देवासमोर पाच विड्याची जोड-पाने ( कमीत कमी 3 जोड-पाने तरी ) ठेवावीत व त्यावर रुपया, सुपारी आणि सुकामेवा हे सर्व ठेवावे. देवासमोर कमीत कमी 2 - 3 फळं व नारळ ठेवावेत. देवाच्या डावीकडे शंख व उजवीकडे घंटी असावी. देवाच्या डावीकडे तेलाचा व देवाच्या उजवीकडे तुपाचा दिवा असावा. आपण स्वतः पाटावर किंवा सुती वस्त्रावर ( किंवा आसनावर ) बसावे. पूजेच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकावे. स्थापन आणि पूजनाला लागणाऱ्या सर्व वस्तू ( हळद, कुंकू, चंदन, दिवा, पंचामृत, नेवैद्य इत्यादि ) आपल्या जवळ तयार ठेवावे. गणपतीची मूर्ती ही आसनस्थ गणेशरूपातच एक ते दीड फुटांपर्यंत असावी. विठ्ठल, साईबाबा, बालाजी या रुपांत नसावी. मूर्ती शेंदरी / तांबूस / श्वेत चंदेरी रंगाची असावी. काळसर / चॉकलेटी / हिरवा व इतर कोणत्याच रंगाची नसावी. ॥ अथ गणेशपूजाप्रारंभः ॥ प्रथम आपल्या इष्ट देवतांना, घरातील देवांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ( विडयाची दोन पाने एकत्र, त्यावर एक रुपया व एक सुपारी ) ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना म्हणजे आपल्या उपाध्यायांना नमस्कार करुन घरातील वडील मंडळींना नमस्कार करावा व नंतर आसनावर पूजेसाठी बसावे व पूजेला आरंभ करावा. द्विराचम्य - पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे ( प्यावे ). चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे. १ ) ऊँ केशवाय नमः - डाव्या हाताने पळीने उजव्या हातात पाणी घेऊन पिणे २ ) ऊँ नारायणाय नमः - - " - ३ ) ऊँ माधवाय नमः - - " - ४ ) ऊँ गोविंदाय नमः - असे म्हणत ताम्हणात पाणी सोडावे येथून पुढे हात जोडावे - ५ ) ॐ विष्णवे नमः, ६ ) ॐ मधुसूदनाय नमः, ७ ) ॐ त्रिविक्रमाय नमः, ८ ) ॐ वामनाय नमः, ९ ) ॐ श्रीधराय नमः, १० ) ॐ हृषीकेशाय नमः, ११ ) ॐ पद्मनाभाय नमः, १२ ) ॐ दामोदराय नमः, १३ ) ॐ सङ्कर्षणाय नमः, १४ ) ॐ वासुदेवाय नमः, १५ ) ॐ प्रद्युम्नाय नमः, १६ ) ॐ अनिरुद्धाय नमः, १७ ) ॐ पुरुषोत्तमाय नमः, १८ ) ॐ अधोक्षजाय नमः, १९ ) ॐ नारसिंहाय नमः, २० ) ॐ अच्युताय नमः, २१ ) ॐ जनार्दनाय नमः, २२ ) ॐ उपेन्द्राय नमः, २३ ) ॐ हरये नमः, २४ ) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः ॥ प्राणायामं कृत्वा - उजव्या हातात पाणी घ्यावे. प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्रीच्छन्दः । प्राणायामे विनियोगः । उजव्या हातातील पाणी ताम्हणात सोडावे व गायत्री मंत्र किंवा आपल्या कुलदेवतेचा / इष्ट देवतेचा मंत्र म्हणावा किंवा श्रीविष्णूचे स्मरण करावे. ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् । ॐ आपो ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्॥ गायत्री मंत्र --- । यो देवः सविताऽस्माकं धियो धर्माधिगोचरे । प्रेरयेत्तस्य तद्‌भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे ॥ यानंतर आपला उजवा हात उजव्या कानाला व डावा हात डाव्या कानाला लावावा. येथून पुढे हात जोडावे व आपली दृष्टी देवाकडे लावावी. खालील प्रत्येक नाममंत्र म्हणत असताना त्या त्या दैवताचे स्मरण करून भक्तीभावाने नमस्कार करत राहावे. ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । श्रीलक्ष्मी-नारायणाभ्यां नमः । उमा-महेश्वराभ्यां नमः । श्रीशची-पुरंदराभ्यां नमः । माता-पितृभ्यां नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । सर्वेभ्यो गुरूभ्यो नमो नम: । एतत्कर्मप्रधान-श्री-सिद्धिविनायक-देवताभ्यो नमो नमः । निर्विघ्नमस्तु । हात जोडावे. श्रीगणपती व कुलदेवता यांचे स्मरण करावे. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि ॥ विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॥ अभीप्सितार्थ-सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्व-विघ्न-हरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् । येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥ सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥ विनायकं गुरुं भानुं ब्रह्म-विष्णु-महेश्वरान् । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ-सिद्धये ॥ आता उजव्या हातामध्ये पाणी, अक्षता, फूल, दुर्वा, तुळशीपत्र एकत्र घेऊन संकल्प करावा - श्रीविष्णुर्विष्णुर्विष्णु: श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे _____ ग्रामे / नगरे शालिवाहनशके _____ नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ ____ वासरे ____ दिवसनक्षत्रे _____ राशीस्थिते वर्तमाने चन्द्रे ____ राशीस्थिते श्रीसूर्ये _____ राशीस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु गृहेषु यथायथं राशिस्थान-स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुण-विशेषण-विशिष्टायां शुभ-पुण्यतिथौ अहम् ___ गोत्रोत्पन्नः _____ कुलोत्पन्नः ____ मम आत्मन: शास्त्रोक्त - पुराणोक्त पुण्य-फल-प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर-प्रीत्यर्थं अस्माकं सकल-कुटुंबानां सपरिवाराणां द्विपद-चतुष्पद-सहितानां क्षेम-स्थैर्य-आयु:-आरोग्य-ऐश्वर्य-अभिवृद्ध्यर्थं समस्त-मङ्गल-अभ्युदयार्थं अभीष्ट-कामना-सिद्ध्यर्थं च प्रतिवार्षिक-विहितं पार्थिव-सिद्धि-विनायक-देवता-प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित-उपचार-द्रव्यै: पुरुषसूक्तेन / पुराणोक्तमन्त्रै: प्राण-प्रतिष्ठापन-पूर्वक-ध्यान-आवाहनादि पञ्च / षोडश-उपचार-पूजनं करिष्ये । असे म्हणून आपल्या समोरील ताम्हणात हातातील सर्व द्रव्य, पाणी सोडावे ( रिकाम्या जागी त्या त्या दिवसा प्रमाणे वार - राशी - नक्षत्र माहिती म्हणावी . दिनदर्शिका / पंचांग / कालनिर्णय वैगेरे मध्ये दिले असते ) उजव्या हातामध्ये पुन्हा पाणी घ्यावे. आदौ निर्विघ्नता-सिद्ध्यर्थं महागणपति-स्मरणं तथा च कलश-शङ्ख-घण्टा-दीप-पूजनं च करिष्ये । असे म्हणून हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडावे. हात जोडावेत व खालील श्लोक म्हणून गणपतीचे स्मरण करावे व नमस्कार करावा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ महागणपतये नमः । प्रार्थनां समर्पयामि । नंतर आपल्या समोर ठेवलेला पूजेचा कलश, भूमी, अग्नी म्हणजे दीप ( समई ), शंख, घंटी यांचे गंध व पुष्प अर्पण करून पूजन करावे. शंखाला अक्षता, हळद, कुंकू वाहू नये. कलशाची पूजा - ( खालील मंत्र म्हणत आपल्या डाव्या बाजूला पूजेकरिता पाणी घेतलेल्या तांब्याला गंध, अक्षता व फूल वाहावे. कलशामध्ये एक तुळशीपत्र, दूर्वा व पुष्प टाकावे.) कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः । मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥ कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः ॥ अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ॥ अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा ॥ आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः ॥ गङ्गे च यमुने चैव गौदावरि सरस्वति ॥ नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः । सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि । नमस्करोमि । पृथ्वी / आसन पूजा - पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता । त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम् ॥ ( या मंत्राने भूमीची प्रार्थना करावी. नमस्कार करावा. गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले वाहावीत. आपल्या आसनाखाली एक फूल वाहावे. ) दीपपूजन ( अग्निपूजन )– भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय । यावत्पूजासमाप्ति: स्यात्तावत्त्वं सुस्थिरो भव ॥ ( दिव्याला ( समई ) नमस्कार करावा व गंध, फूल, हळद-कुंकू वाहावे.) दीपदेवताभ्यो नमः ॥ गन्धाक्षतपुष्पाणि सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि ॥ सूर्य पूजन --- सूर्याला / पूर्वदिशेला खालील मंत्र म्हणत नमस्कार करावा – ॐ जपा-कुसुम-संकाशं काश्यपेयं महद्युतिम् । तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं ॥ शंखपूजन - ( आपल्या उजव्या बाजूस ठेवलेल्या शंखाला स्नान घालून त्यात पाणी भरुन गंध, फूल व तुळशीपत्र वाहावे. शंखाला हळद, कुंकू व अक्षता वाहू नयेत. ) शङ्खादौ चन्द्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गङ्गासरस्वती ॥ त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया । शङ्खे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शङ्खं प्रपूजयेत् ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नः विष्णुना विधृतः करे ॥ नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते ॥ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि । तन्नो शङ्खः प्रचोदयात् ॥ शङ्खाय नमः ॥ गन्धपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि ॥ घंटीपूजन – आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् । कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ॥ घण्टायै नमः ॥ गन्धाक्षतपुष्पं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ॥ घण्टानादं कुर्यात् ॥ ( या श्लोकाने घंटेला स्नान घालून गंध, अक्षता, फूल आणि हळद-कुंकू वाहावे. घंटा वाजवून डाव्या बाजूला ठेवावी. ) आत्म-स्थलशुद्धी / पूजाद्रव्य शुद्धी - अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥ पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत् ॥ ( या मंत्राने कलशातील पाणी तुळशीपत्राने घेऊन पूजेच्या साहित्यावर शिंपडून नंतर आपल्या अंगावर शिंपडावे. ) सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. ॥ प्राणप्रतिष्ठा ॥ अस्य श्रीप्राणप्रतिष्ठा-मन्त्रस्य ब्रह्म-विष्णु-महेश्वरा ऋषयः ॥ ऋग्-यजु- साम-अथर्वाणिच्छंदांसि । परा-प्राण-शक्तिर्देवता आं बीजम् ॥ ह्रीं शक्तिः ॥ क्रों कीलकम् ॥ अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ॥ ( पुढील मंत्र म्हणताना देवावरती पालथी ओंजळ करून छाया करावी. ) ॐ आं ह्रीं क्रों । अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः ॥ क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ प्राणा इह प्राणाः ॥ ॐ आं ह्रीं क्रोम् ॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः ॥ क्रों ह्रीं आम् ॥ हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॥ ॐ आं ह्रीं क्रोम् ॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः ॥ क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् । अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्-मनस्त्वक्-चक्षु-श्रोत्र-जिव्हा-घ्राण-पाणि-पाद-पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॥ गर्भाधानादि- पञ्चदश-संस्कार-सिद्ध्यर्थं पंच-दश-प्रणवावृत्तिं करिष्ये ॥ ( वरील वाक्य म्हटल्यानंतर ताम्हणात पाणी सोडून देवाच्या हृदयाला उजवा हात लावून ठेवावा व पंधरा वेळा ॐ / ह्रीम् म्हणावे. नंतर ध्यान करावे. ) ( वरील बीज मंत्र उच्चारण जमत नसल्यास खालील सोपा मंत्र सुद्धा म्हणू शकतात . --- अस्यै प्राणाः प्रतिष्ठंतु अस्यै प्राणाः क्षरंतु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन् । रक्ताम्भोधिस्थ पोतोल्लसदरुणसरोजाधिरुढाकराब्जैः । पाशं कोदण्डमिक्षूद्भवमथ गुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् ॥ बिभ्राणसृक्कपालं त्रिनयनलसितापीनवक्षोरुहाढ्या । देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॥ ( वरील मंत्राने देवाच्या डोळयांना तूप लावावे व खालील वक्रतुंड -- श्लोक म्हणून देवाला अक्षता वाहाव्यात. ) वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ महागणपतये नमः । आवाहयामि स्थापयामि प्रार्थनां समर्पयामि । अथ ध्यानम् – एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ॥ पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि । आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ॥ अनाथनाथसर्वज्ञ पूजार्थं गणनायक ॥१॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि । ( वरील मंत्राने देवाला अक्षता वाहाव्यात. ) नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् ॥ आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥२॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि । ( वरील मंत्राने देवाच्या आसनासाठी दूर्वा किंवा अक्षता वाहाव्यात. ) पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भोः ॥ भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोऽस्तु ते ॥३॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि । ( या मंत्राने देवाच्या पायांवर फुलाने किंवा दुर्वांनी पाणी प्रोक्षण करावे. ) नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर ॥ नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम् ॥४॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि । ( या मंत्राने गुलाब जल किंवा गंध, अक्षत, फूलमिश्रित पाणी देवाच्या अंगावर शिंपडावे. ) कर्पूरवासितं वारि मंदाकिन्याः समाहृतम् । आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः ॥५॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि । ( या मंत्राने देवावर दुर्वांनी पाणी शिंपडावे. ) गंगादिसर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनयाऽहृतम् ॥ तोयमेतत्सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥६॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः ॥ स्नानं समर्पयामि ( या मंत्राने देवावर फुलाने पाणी शिंपडावे.) पञ्चामृतैः स्नपयिष्ये ॥ एकत्रित पंचामृत - पयोदधिघृतं चैव मधु च शर्करायुतम् । पञ्चामृतं मया दत्तं गृहाण परमेश्वर ।। पंचामृत एकत्र असेल तर या मंत्राने ते तीन किंवा पाच वेळा देवावर दुर्वांनी शिंपडावे; आणि जर वेगवेगळे असेल तर खालील मंत्रांनी ते ते द्रव्य देवावर शिंपडावे. दूध - कामधेनोः समुदभूतं देवर्षिपितृतृप्तिदम् । पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । पयस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने देवावर दूध शिंपडून नंतर दोन वेळा शुद्ध पाणी शिंपडावे. ) दही – चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेवप्रियं दधि । स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गणनायक ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । दधिस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने देवाला फुलाने दही लावून दोन वेळा शुद्ध पाणी शिंपडावे. ) तूप – आज्यं सुराणामाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् । आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । घृतस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने देवाला फुलाने तूप लावून नंतर दोन वेळा शुद्ध पाणी शिंपडावे. ) मध – सर्वोषधिसमुत्पन्नं पीयूषमधुरं मधु । स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । मधुस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने देवाला फुलाने मध लावावा. नंतर दोन वेळा शुद्ध पाणी शिंपडावे. ) साखर ( खडीसाखर ) – इक्षुदण्डसमद्भूतदिव्यशर्करया ह्यहम् । स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव शिवात्मज ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । शर्करास्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने देवाला साखरेचे पाणी शिंपडावे. ) ( सध्याच्या युगामध्ये मूर्ती जागा इत्यादी चा विचार करता एकत्रित पंचामृताचाच अभिषेक करावा . ) गंध / चंदन – कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धि-द्रव्य-संयुतम् । गन्धोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । गन्धोदकस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( या मंत्राने गंधमिश्रित पाणी शिंपडून नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. ) श्रीसिद्धिविनायकाय नमः । गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि । ( गणपतीला गंध, अक्षता व फूल वाहावे.) श्रीसिद्धिविनायकाय नमः । श्रीरिद्धीसिद्धिभ्यांं नमः । हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि । ( गणपतीला हळद-कुंकू समर्पण करावे. ) श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपदीपौ दर्शयामि, समर्पयामि । ( देवाला उदबती व नीराजन ओवाळावे. ) श्रीसिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यार्थे पञ्चामृतनैवेद्यं निवेदयामि । ( देवापुढे चौकोनी मंडळ करुन त्यावर पंचामृताचा नैवेद्य खालील मंत्रांनी अर्पण करावा. नंतर ताम्हणात पळीभर पाणी सोडून पुन्हा त्याच मंत्रांनी नैवेद्य दाखवावा. ) ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा । उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं च समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( नंतर ताम्हणात तीन वेळा उदक सोडून देवाला गंध-पुष्प वाहावे. ) श्रीसिद्धिविनायकाय नमः । मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णनिष्क्रयदक्षिणां समर्पयामि ॥ ( देवापुढे विडा ठेवून त्यावर पाणी सोडावे. ) एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् । श्रीसिद्धिविनायकाय नमः । मन्त्रपुष्पं समर्पयामि ॥ ( या मंत्राने देवाला फूल वाहून नमस्कार करावा. ) नंतर हातात पाणी घ्यावे व म्हणावे - अनेन पूर्वाराधनेन तेन श्रीसिद्धिविनायकायः प्रीयताम् । व हातातील पाणी ताम्हणात सोडावे. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् । ( देवावरील निर्माल्याचा सुगंध घेऊन ते उत्तरेकडे एका भांड्यात टाकून हात धुवून पुढील अथर्वशीर्षाने गणपतीवर दूर्वांनी अभिषेक करावा. ) ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ॥ तेजस्विनावधीतमस्तु ॥ मा विद्विषावहै ॥ ॐ शान्तिः । शान्तिः । शान्ति । ऊँ गँ गणपतये नमः । ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्ताऽसि । त्वमेव केवलं धर्ताऽसि । त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि । त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥१॥ ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥ अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमवशिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् ‍। अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् ‍। अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ‍ ॥३॥ त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्माऽसि । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥ सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति । सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति । त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः । त्वं चत्वारि वाक्पदानि ॥५॥ त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा । त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ‍ ॥६॥ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ‍ । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ‍ । तारेण रुद्धम् । एतत्तव मनुस्वरुपम् ‍। गकारः पूर्वरुपम् ‍। अकारो मध्यमरुपम् ‍। अनुस्वारश्चान्त्यरुपम् ‍। बिंदुरुत्तररुपम् ‍ । नादः संधानम् ‍। संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः । निचृद्‍गायत्रीच्छंदः । गणपतिर्देवता । ॐ गँ गणपतये नमः ॥७॥ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् ‍। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ‍ । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ‍। भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ‍। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥८॥ नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॥९॥ फलश्रुती – एतदथर्वशीर्षं योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स सर्वतः सुखमेधते । स पञ्चमहापापात्प्रमुच्चते । सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायंप्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षं च विन्दति । इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ‍ । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् ‍ भवति । सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ‍ । अनेन गणपतीमभिषिञ्चति स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् ‍ जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् ‍ । ब्रह्माद्याचरणं विद्यात् ‍न विभेति कदाचनेति । यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति । यो मोदकसहस्त्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते । अष्टौ ब्राह्मणान् ‍ सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति । महाविघ्नात्प्रमुच्यते । महादोषात्प्रमुच्यते । महापापात्प्रमुच्यते । स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद । इत्युपनिषद् ‍ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शांतिः । शांतिः । शांतिः । ( येथे अभिषेक संपन्न झाला . फलश्रुती नाही म्हंटले तरी चालेल ) ॐ अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । महाभिषेकस्नानं समर्पयामि । उष्णोदकस्नानं समर्पयामि । ( थोडेसे कोमट पाणी गणपतीवर प्रोक्षण करावे. नंतर गणपतीचे अंग एका स्वच्छ शुद्ध वस्त्राने पुसल्यासारखे करावे / एका स्वच्छ शुद्ध वस्त्राने मूर्तीवरील पाणी थेंब टिपून घ्यावे. ) श्रीसिद्धिविनायकाय नमः । सुप्रतिष्ठितमस्तु । सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे । मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि । ( या मंत्राने वस्त्र वाहावे. ) देवदेव नमस्तेऽस्तु त्राहि मां भवसागरात् । ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि । यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि ॥ ( या मंत्राने देवाला जानवे घालावे व नंतर ताम्हणात उदक सोडावे. ) जानवे देवाच्या डाव्या खांद्यावर व उजव्या हाताखाली असे असावे. श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ‍। विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ॥ ( या मंत्राने गणपतीला अनामिकेने गंध लावावे. ) अक्षतास्तण्डुलाः शुभ्राः कुङ्कुमेन विराजिताः । मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ ( गणपतीला अक्षता वाहाव्यात. ) हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी । सर्वालङ्कारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ‍ ॥ हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकम् । वस्त्रालङ्करणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । रिद्धिसिद्धीभ्यां नमः । हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि । उदितारुणसङ्काशं जपाकुसुमसन्निभम् ‍। सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यताम् ‍॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि । ( या मंत्राने गणपतीला शेंदूर लावावा. ) ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरुपिणे । नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । नानापरिमलद्रव्यं समर्पयामि । ( या मंत्राने गणपतीला बुक्का - शेंदूर लावावा. ) माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो । मयाऽहृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ‍ ॥ करवीरैर्जातिकुसुमैश्चम्पकैर्बकुलैः शुभैः ॥ शतपत्रैश्च कल्हारैरर्चयेत् ‍ परमेश्वरः ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । यथाकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि । ( या मंत्राने गणपतीला फुले वाहावी. नंतर पुढील नाममंत्रांनी गणपतीला अक्षता किंवा फुले वाहावी. ) अथाङ्गपूजा । गणेश्वराय नमः । पादौ पूजयामि । विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि । आखुवाहनाय नमः । ऊरु पूजयामि । हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि । लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि । गौरीसुताय नमः । स्तनौ पूजयामि । गणपायकाय नमः । हृदयं पूजयामि । स्थूलकर्णाय नमः । कण्ठं पूजयामि । स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि । पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि । गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि । विघ्नहर्त्रे नमः । ललाटं पूजयामि । सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि । गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि । अथ पत्रपूजा - यानंतर प्रत्येक नावाला खाली सांगितल्याप्रमाणे निरनिराळी पत्री वाहावी. सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि । ( मधुमालती ) गणाधिपाय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि । ( बेलाचे पान ) गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि । ( पांढर्या दूर्वा ) लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि । ( बोरीचे पान ) हरसूनवे समः । धत्तूरपत्रं समर्पयामि । ( धोत्रा ) गजकर्णकाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि । ( तुलसीचे पान ) वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि । ( शमीचे पान ) गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि । ( आघाडा ) एकदन्ताय नमः । बृहतीपत्रं समर्पयामि । ( डोरलीचे पान ) विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि । ( कण्हेरीचे पान ) कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि । ( रुईचे पान ) गजदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि । ( अर्जुनसादडा ) विघ्नराजाय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि । ( विष्णुक्रांता ) बटवे नमः । दाडिमपत्रं समर्पयामि । ( डाळिंबाचे पान ) सुराग्रजाय नमः । देवदारुपत्रं समर्पयामि । ( देवदाराचे पान ) भालचन्द्राय नमः । मरुपत्रं समर्पयामि । ( पांढरा मरवा ) हेरम्बाय नमः । अश्वत्थपत्रं समर्पयामि । ( पिंपळाचे पान ) चतुर्भुजाय नमः । जातीपत्रं समर्पयामि । ( जाईचे पान ) विनायकाय नमः । केतकीपत्रं समर्पयामि । ( केवडयाचे पान ) सर्वेश्वराय नमः ॥ अगस्तिपत्रं समर्पयामि । ( अगस्त्याचे पान ) धूप / अगरबत्ती – वनस्पतिरसोद्भूतो गंधाढयो गंध उत्तमः । आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ‍॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।( या मंत्राने धूप उदबत्ती ओवाळणे.) दीप – आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया । दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भोः ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि । ( या मंत्राने तुपाचा दिवा ओवाळावा. ) नैवेद्य – नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परां गतिम् ॥ शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यार्थे नानाखाद्यनैवेद्यं समर्पयामि । ( वरील मंत्राने गणपतीसमोर चौकोनी मंडळ करुन त्यावर पंचखाद्य किंवा दूध-साखर किंवा मोदक / पेढे / लाडू इत्यादि ठेवून त्याचा पुढील मंत्रांनी नैवेद्य दाखवावा. ) ॐ प्राणाय स्वाहा ॥ ॐ अपानाय स्वाहा ॥ ॐ व्यानाय स्वाहा ॥ ॐ उदानाय स्वाहा ॥ ॐ समानाय स्वाहा ॥ ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥ नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि ॥ ( नंतर ताम्हणात एक पळी पाणी सोडून याच मंत्रांनी पुन्हा नैवेद्य दाखवावा. ) उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं च समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( नैवेद्य दाखविल्यानंतर ताम्हणात तीन वेळा पाणी सोडून देवाला गंध व पुष्प वाहावे. ) विडा – पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम् । कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम् ॥ हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंतपुण्यफलदमतः शान्तिं प्रयच्छ मे ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णनिष्क्रयदक्षिणां समर्पयामि । ( या मंत्राने देवापुढे विडा ठेवून त्यावर खारीक, बदाम व दक्षिणा ठेवून पाणी सोडावे. ) फळ – इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव । तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि ॥ फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ‍। तस्मात्फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । फलार्थे नारीकेलफलं समर्पयामि । ( या मंत्राने देवापुढे नारळ व इतर फळ ठेवून त्यावर पाणी सोडावे. ) ( यानंतर गंध, अक्षतायुक्त दोन दूर्वा पुढील प्रत्येक नावाने गणपतीला वाहाव्यात; नंतर एक दूर्वा सर्व नावांनी वाहावी. ) गणाधिपाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । उमापुत्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । अघनाशनाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । विनायकाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । ईशपुत्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । एकदन्ताय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । इभवक्त्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । आखुवाहनाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । कुमारगुरवे नमः दूर्वायुग्मं समर्पयामि । ( याप्रमाणे वीस दूर्वा वाहिल्यानंतर पुढील दोन मंत्रांनी एकविसावी दूर्वा वाहावी. ) गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ॥ विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे नित्यं पूजनीयः प्रयत्नतः ॥ दूर्वामेकां समर्पयामि ॥ यानंतर फुले वाहावीत, आरती करावी व शेवटी कापूर लावावा. चंद्रादित्यौ च धरणी विद्युदग्निस्तथैव च । त्वमेव सर्वज्योतींषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम् ‍ ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि । प्रदक्षिणा – यानि कानि च पापानि जन्मान्तकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि । ( या श्लोकाने गणपतीला घड्याळाच्या दिशेप्रमाणे उजव्या हाताकडून प्रदक्षिणा करावी. ) साष्टांग नमस्कार – नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद । नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । नमस्कारं समर्पयामि । ( या मंत्राने गणपतीला साष्टांग नमस्कार घालावा. ) मंत्रपुष्पांजली – ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ‍। ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः । ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान्कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः । ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तदर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषान्तादापरार्धात् ‍ । पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति । तदप्येषः श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन् ‍ गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति । एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ॥ तन्नो दन्तिः प्रचोदयात् । श्रीसिद्धिविनायकाय नमः । मन्त्रपुष्पं समर्पयामि ॥ ( वरील मंत्रानी देवाला फुले वाहावी. ) गुडघ्यावर बसून आपले कान पकडावे व म्हणावे – विनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय ॥ आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥ मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥ अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर ॥ रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि । पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ हातात पाणी घ्यावे व म्हणावे - अनेन मया यथाज्ञानेन प्राणप्रतिष्ठासहित कृतषोडशोपचारपूजनेन तेन श्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् । हातातील पाणी ताम्हणात सोडावे. देवाला भक्तिभावाने पुन्हा नमस्कार करावा. अनेक ठिकाणी गणपती स्थापना बरोबर गणपती च्या बाजूला एक कलश स्थापन करतात. तो देवाच्या उजवीकडे असावा . त्यात पाणी भरून आंब्याची डहाळी ठेवावी. एक रुपया , सुपारी , एक कॉईन , दुर्वा , चंदन , अष्टगंध , हळद , अक्षता इत्यादि वस्तू त्याकलशमध्ये वाहणे . व त्यावर नारळ ठेवून त्याचे गंध, पुष्प , हळद , कुंकू , हार वाहून पूजन करणे. खालील मंत्र म्हणून कलशाची स्थापना पूजा करणे . श्री वरुणाय नमः आवाहयामी - स्थापयामी .. गंधाक्षतपुष्पम् समर्पयामि ... सौभाग्यद्रव्यं समर्पयामि , नेवैद्यम् समर्पयामि .. विसर्जनाच्या दिवशी या कलशावर सुद्धा विसर्जन मंत्र म्हणुन अक्षता वाहने व गणपतीबरोबर विसर्जनाच्या ठिकाणी नेऊन कलशातील पाणी मूर्ती जेथे विसर्जन करतो त्या नदीत / तलावात / समुद्रात अर्पण करणे . कलशावरील नारळ फोडून प्रसाद म्हणून खाणे. आपण स्वतः जरी प्राणप्रतिष्ठा केली असली तरी आपल्या गुरुजीं साठी विडासुपारी नारळ फळ शिधा व दक्षिणा बाजूला काढून ठेवावी. ते नंतर आपल्या गुरुजींना द्यावे व त्यांचे आशीर्वाद घ्यावे किंवा एका गणपती मंदिरात अर्पण करावे . ( तसेच स्थापना पूजा झाल्यावर वायन देणे असल्यास एकवीस तळलेले मोदक घेऊन त्यातील एक मोदक गणपतीच्या हातावर ठेवून दहा आपल्याकरिता ठेवावे आणि उरलेले दहा मोदक ब्राह्मणाला वायन म्हणून द्यावे. ) वायन संकल्पः - अद्य पूर्वोच्चरित-वर्तमान-एवं-गुण-विशेषण-विशिष्टायां शुभ-पुण्य-तिथौ मम आत्मनः श्रुति-स्मृति-पुराणोक्त फल-प्राप्त्यर्थं सिद्धिविनायक-प्रीत्यर्थं ब्राह्मणाय दशमोदकात्म-वायन-प्रदानं करिष्ये । तदङ्ग-ब्राह्मण-पूजनं करिष्ये । ( या मंत्राने ताम्हणात उदक सोडून ब्राह्मणपूजन करावे. ) महाविष्णुस्वरुपिणे ब्राह्मणाय इदमासनम् । स्वासनम् । इदं पाद्यम् । सुपाद्यम् । इदमर्घ्यम् । अस्त्वर्घ्यम् । इदमाचमनीयम् । अस्त्वाचमनीयम् । गन्धःपातु । सौमङ्गल्यं चास्तु । अक्षताः पान्तु । आयुष्यमस्तु । पुष्पं पातु सौश्रेयसमस्तु । ताम्बूलं पातु । ऐश्वर्यमस्तु । दक्षिणाः पान्तु । बहुदेयं चास्तु । दीर्घमायुः-श्रेयः-शान्तिः-पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । नमोस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः । ( वरील मंत्रांनी ब्राह्मणाला गंध, अक्षत, फूल, विडा, दक्षिणा देऊन त्यावर पाणी सोडावे. नंतर ब्राह्मणाच्या मस्तकावर अक्षता वाहून नमस्कार करावा. नंतर पुढील मंत्राने वायन द्यावे. ) सघृतान् गुडसम्मिश्रान् मोदकान् घृतपाचितान् । वायनं मे गृहाणेदं वरं देहि विनायक ॥ दशानां मोदकानां च फलदक्षिणया युतम् । विप्राय फलसिद्धयर्थं वायनं ते ददाम्यहम् ॥ इदं वायनप्रदानं सदक्षिणाकं सताम्बूलं अमुकशर्मणे ब्राह्मणाय तुभ्यमहं संप्रददे ॥ प्रतिगृह्यताम् । प्रतिगृहणामि । अनेन वायनप्रदानेन श्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् । ( वरील मंत्रांनी वायन दिल्यावर उदक सोडावे. ) कर्मान्ते द्विराचमेत् । ( नंतर दोनदा आचमन करावे म्हणजे पाणी प्यावे. ) श्रीगणपतीची उत्तरपूजा - ( उत्तरपूजेचा काल - ऋषिपंचमीच्या दिवशी अथवा गौरीविसर्जनाच्या दिवशी किंवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जन करावे. ) आचम्य - श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गन्धादिपञ्चोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि । अक्षतां हरिद्रां कुङ्कुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । सिन्दूरं दूर्वाङ्कुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि । वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध, फुले, अक्षता, हळद - कुंकू, दूर्वा, शेंदूर हे उपचार वाहावेत. श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि । वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप, दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा. कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत. आरती, मंत्रपुष्प व प्रार्थना करुन झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी. ( वरील गोष्टी गणपतीबरोबर विसर्जनास द्याव्यात. ) अनेन कृत-उत्तराराधनेन तेन श्रीभगवान् सिद्धिविनायकः साङ्गः सपरिवारः प्रीयताम् । ॐ तत्सत् ॥ एवढया वरील सर्व गोष्टी करुन झाल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा व नंतर खाली दिलेला मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा व लगेच विसर्जनास न्यावा. ) यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥ ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ॥ * * * * * * * श्रीगणपतीच्या या स्थापना काळात जास्तीत जास्त गणेश मंत्र , गणेश स्तोत्र याचे पठण करावे . भजन - कीर्तन - पुराण वाचन असे कार्यक्रम व्हायला हवे , यामुळे जनजागृती होऊन समाजाला एक अध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल . पिक्चर चे गाणे जोरजोरात वाजवूंन , ऑर्केस्ट्रा डान्स ठेवून , गणपती समोर पत्ते खेळून आदी काय साध्य होणार? त्यापेक्षा गरिबांना - विद्यार्थाना मदत व्हायला हवी. त्यांच्या कलागुणांना वाव मिळायला हवा. डेकोरेशन किंवा इतर अनावश्यक खर्च टाळून , पवित्रता पाळून व गरिबांची मदत करून श्रीगणेश नक्कीच प्रसन्न होतील .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.