गणेश स्तोत्र प्राकृत मराठी
स्तोत्र - मंत्र > गणेश स्तोत्र Posted at 2018-10-07 06:47:40
मराठी भाषेतील प्राकृत गणपती स्तोत्र --
।। ॐ गं गणपतये नमः ।।
|| अथ श्री गणपती स्तोत्र प्रारंभ ||
|| श्री गणेशाय: नमः ||
जय जयाजी गणपती | मज द्यावी विपुल मती |
कारवाया तुमची स्तुती | स्पुर्ती द्यावी मज अपार || ०१ ||
तुझे नाम मंगलमूर्ती | तुज इंद्र चंद्रा ध्याती |
विष्णू शंकर तुज पूजिती | अव्यया ध्याती नित्य काळी || ०२ ||
तुझे नाव विनायक | गजवदना तू मंगल दायक |
सकल नाम कलिमलदाहक | नाम-स्मरणे भस्म होती || ०३ ||
मी तव चरणांचा अंकित | तव चरणा माझे प्रणिपात |
देवाधी-देवा तू एकदंत | परिसे विज्ञापना माझी || ०४ ||
माझा लडिवाळ तुज करणे | सर्वापरी तू मज सांभाळणे |
संकटामाझारी रक्षिणे | सर्व करणे तुज स्वामी || ०५ ||
गौरी पुत्र तू गणपती | परिसावी सेवकाची विनंती |
मी तुमचा अनन्यार्थी | रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया || ०६ ||
तूच माझा माय बाप | तूच माझा देवराय |
तूच माझी करिशी सोय | अनाथ नाथा गणपती || ०७ ||
गजवदना श्री लम्बोदरा | सिद्धीविनायका भालचंद्रा |
हेरंभा शिव पुत्रा | विघ्नेश्वरा अनाथ बंधू || ०८ ||
भक्त पालका करि करुणा | वरद मूर्ती गजानना |
परशुहस्ता सिंदुरवर्णा | विघ्ननाशना मंगलमूर्ती || ०९ ||
विश्ववदना विघ्नेश्वरा | मंगलाधीषा परशुधरा |
पाप मोचन सर्वेश्वरा | दिन बंधो नाम तुझे ||१० ||
नमन माझे श्री गणनाथा | नमन माझे विघ्नहरता |
नमन माझे एकदंता | दीनबंधू नमन माझे || ११ ||
नमन माझे शंभूतनया | नमन माझे करुणांलया |
नमन माझे गणराया | तुज स्वामिया नमन माझे || १२ ||
नमन माझे देवराया | नमन माझे गौरीतनया |
भालचंद्रा मोरया | तुझे चरणी नमन माझे || १३ ||
नाही आशा स्तुतीची | नाही आशा तव भक्तीची |
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची | आशा मनी उपजली || १४ ||
मी मूढ केवल अज्ञान | ध्यानी सदा तुझे चरण |
लंबोदरा मज देई दर्शन | कृपा करि जगदीशा || १५ ||
माती मंद मी बालक | तूच सर्वांचा चालक |
भक्तजनांचा पालक | गजमुखा तू होशी || १६ ||
मी दरिद्री अभागी स्वामी | चित्त जडावे तुझिया नामी |
अनन्य शरण तुजला मी | दर्शन देई कृपाळुवा || १७ ||
हे गणपती स्तोत्र जो करि पठाण | त्यासी स्वामी देईल अपार धन |
विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान | सिंदूरवदन देईल पै || १८ ||
त्यासी पिशाच भूत प्रेत | न बाधिती कदा काळात |
स्वामीची पूजा करोनी यथास्थित | स्तुती स्तोत्र हे जपावे || १९ ||
होईल सिद्धी षड्मास हे जपता | नव्हे कदा असत्य वार्ता |
गणपती चरणी माथा | दिवाकरे ठेविला || २० ||
|| इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण ||
लिखाण टंकणात काही चूक असेल तर क्षमा करुन सांगावी ..
श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
Search
Search here.