घोरकष्टोद्धरण स्तोत्र
स्तोत्र - मंत्र > श्री सद्गुरु स्तोत्र Posted at 2018-10-12 09:39:00
।। घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ।। अर्था सहित
अत्यंत खडतर परिस्थिती असताना , सर्व त्रास संकटे कमी होऊन मनाला जीवनाला शांतता समाधान प्राप्त व्हावे व सुयश मिळावे यासाठी हे अत्यंत फलदायी स्तोत्र असून सर्व शुचिर्भूतता पाळून श्रद्धा विश्वास ठेवून याचे पाठ आरंभ केले तर निश्चितच फलप्राप्ती होते.. गुरुवारी किंवा पौर्णिमेला आरंभ करावा.
श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।१।।
त्वं नो माता, त्वं पिताप्तो धिपस्त्वं , त्राता योगक्षेमकृत , सदगुरुस्त्वम् ।
त्वं सर्वस्वं , नः प्रभो विश्र्वमूर्ते , घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।२।।
पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।४।।
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।५।।
श्र्लोक पंचक मेतद्यो लोकमंगल वर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।
इति श्रीमद वासुदेवानंद सरस्वती कृतं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।
अर्थ ---
हे देवाधिदेवा श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा, भावग्राह्या – क्लेशहारका सुकिर्ते, तुं सर्वदा आमचे रक्षण कर. आमचा या घोर कष्टातून उध्दार कर. तुला नमस्कार असो. ।।१।।
हे अप्रभो (नाहि प्रभु ज्याला, तो अप्रभु म्हणजे सर्वप्रभु) सर्वप्रभो विश्र्वमुर्ते तू आमची माता, पिता, मालक, योगक्षेम चालविणारा सद्गुरु व सर्वस्व आहेस; म्हणुन आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।२।।
हे ईश्वरा, तू आमचे पाप, ताप, शारीरिक व्याधी, मानसिक आधी, दारिद्य्र, भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर. हे पीडा नाशका, तुझ्यावाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही. याकरिता आमचा या घोर संकटातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।३।।
हे देवा, आम्हास तुझ्याहून दुसरा त्राता नाही. दाता नाही. भर्ताही नाही. तू शरणागत-रक्षक व दु:खहर्ता आहेस. हे अत्रेया, आमच्यावर अनुग्रह कर. हे पुर्णकामा, घोर संकटापासून आमचा उद्दार कर. तुला नमस्कार असो. ।।४।।
हे अखिलानंदकारकमुर्ते देवा, आम्हाला धर्माचे ठिकाणी प्रीती, भुक्ति, मुक्ति व भक्तिचे ठिकाणी आसक्ती दे. सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुझे चरणारविंदी आमचे शतश: प्रणाम असो. ।।५।।
श्री सद्गुरुमहाराज म्हणतात, “सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकपंचक नियमपुर्वक नित्यश: भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य, श्रीदत्ताला अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्तही उत्तरोत्तर या भक्ताला प्रिय होईल”, असा माझा आशीर्वाद आहे ।।
----- ------ --------- ------ ------ -------- ------ -----
“श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र”
निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळं पाठीशी रे |
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी || १||
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ||२||
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळूदे |
जगी जन्म म्रुत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा || ३||
खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||
विभूती नमननाम ध्यानांदी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामॄतात |
हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||५||
◆ श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे , तो पेला हाती धरावा व स्तोत्र म्हणावे. आणि स्तोत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून प्यावे.थोडे घरी सर्वत्र शिंपडावे.
.... श्री स्वामी समर्थ ....
Search
Search here.