घरच्या घरी गृहप्रवेश पुजन

व्रत - पूजा - कथा Posted at 2018-10-19 02:41:04

घरच्या घरी गृहप्रवेश पुजन

जर गुरुजी मिळत नसतील तर घरच्या घरी साधे गृहप्रवेश पूजन कसे करावे.. कधी कधी घाई गडबडीत जागेचे पजेशन कोणत्याही दिवशी घ्यावे लागते व या धावपळीत चांगल्या मुहूर्तावर गुरुजी मिळत नाहीत व गृहप्रवेशचे काय करायचे हा प्रश्न पडतो. अशा प्रसंगासाठी घरातल्या घरात साध्या पध्दतीने गृहप्रवेश कसा करायचा हे येथे देत आहे .. अर्थातच नंतर तज्ञ जाणकार गुरुजींकडून पुन्हा हे पूजन करूनच घ्यावे .. फक्त चांगला मुहूर्त हातचा जाऊ नये यासाठी हा प्रयत्न.. रविवार व मंगळवार यादिवशी शक्यतो शुभारंभ / गृहप्रवेश / वास्तुशान्ति वैगेरे कर्म करू नये.. सर्वप्रथम आदल्या दिवशी किंवा दोन तीन दिवस आधी  वैगेरे सर्व जागा स्वच्छ साफ करून घ्यावी .. जागे मध्ये सर्वत्र गोमूत्र - गंगाजल शिंपडावे.. जमल्यास पाण्यामध्ये गोमूत्र - मीठ वैगेरे टाकून त्या पाण्याने फरशी  वैगेरे पुसून घ्यावी.. ज्या दिवशी गृहप्रवेश करायचा आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी वैगेरे जागेमध्ये पुन्हा गोमूत्र गंगाजल शिंपडावे.. सर्वात प्रथम देवाच्या वस्तु अशा जागेत न्याव्यात . उदा.- कलश / दिवा / समई / देवांचे फोटो / इत्यादी इत्यादी .. दरवाजाला हार तोरण लावणे.. रांगोळी काढणे.. किचन मध्ये पूर्व दिशेच्या भिंतीकडे पाट ठेवून त्यावर देवाचा फोटो ठेवणे.. त्या समोर धूप दिप लावणे.. वाटीत साखर ठेवणे. असल्यास पेढे ठेवणे..  जमल्यास कलश मध्ये पाणी भरून त्यात रुपया हळदकुंकू दुर्वा तुळस इत्यादी टाकून त्यावर नारळ ठेवून तो कलश स्थापन करू शकतात.. फोटोला कलशाला हार फुले हळदकुंकू वैगेरे वाहणे.. दरवाजावर हळद + कुंकू + चंदन + अष्टगंध + गंगाजल + गोमूत्र इत्यादी पैकी जे जे असेल ते एका वाटीत / द्रोणात घेऊन एकत्र करून शुभ - लाभ - ऊँ - स्वस्तिक - श्री आदि काढणे. तसेच घरामध्ये सुद्धा भिंतीवर जिथे शक्य असेल तिथे काढणे.. किचन मध्ये टाईल्स वर तसेच जिथे देवाचा फोटो ठेवून पूजा करणार असाल तिथे सुद्धा काढणे.. सर्व खोल्यांमध्ये धूप लावणे.. प्रत्येक खोली मध्ये एका कोपऱ्यात चिमूटभर साखर ठेवणे.. किचन ओट्यावर गॅस / स्टोव्ह / इंडक्शन वर एका भांड्यात दूध उकळवायला घेणे , ते उकळून आपोआप ओतू जाऊ देणे.. त्या दुधात थोडी साखर टाकलेली असावी. किचन ओट्यावर दूध ओतू गेल्यावर ते लगेच पुसू नये. थोड्या वेळानंतर पुसावे.. उरलेले दूध सर्वांनी घ्यावे , त्याचा चहा केला तरी चालेल .. आजूबाजूच्या व्यक्तींना वैगेरे दिला तरी चालेल.. सोमवार सोडून इतर दिवशी नारळ वाढवून त्याचा प्रसाद वाटावा.. हे सर्व करत असताना कुलदेवताचे , वास्तुपुरुषाचे नामस्मरण करणे.. येत असलेले कोणतेही स्तोत्र मंत्र जप म्हणणे.. किंवा स्तोत्र ऑडिओ लावणे.. कोणतेही काम हे त्या त्या कामातील अनुभवी तज्ज्ञांकडून केलेले योग्य असते.. आपण स्वतः जरी गृहप्रवेश केला असला तरी आपल्या जाणकार तज्ञ गुरुजींकडून योग्य दिवशी विधिवत् शास्त्रशुद्ध रीतीने गणेशपूजन वैगेरे करून घेणे.. कारण सतत वेद - पुराण मंत्र म्हणून म्हणून व अनेक व्रत उपासना करून सात्विक  ब्राह्मणाच्या भोवती एक वेगळेच वलय तयार झालेले असते ट्युले त्याच्या कडून म्हंटले गेलेल्या मंत्राघोषामुळे आपले घर - वातावरण पवित्र होते व आपले इच्छित साध्य होण्यास जास्त शक्यता असते .. कधीही मांसाहार करू नये , कारण मांसाहाराने त्या प्राण्यांचा तळतळाट लागून भले आपल्याला व आपल्या पुढील पिढ्याना सुद्धा जीवनात त्रास होतोच होतो .. सध्याच्या युगातील जवळपास 75 टक्के त्रास / दोष हे मांसाहार केल्यामुळे होतात हे खात्री व अनुभवपूर्वक सांगू शकतो..

Search

Search here.