नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2019-02-09 02:48:19
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति महारुद्र जे मारूती रामदास । कलीमाजिं जे जाहले रामदास ।| जनां उद्धराया पुन्हा प्राप्त होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १॥ महाराष्ट्री या माणगंगातीरातें । असे पुण्य गोंदवले क्षेत्र तेथें ।| यजुर्वेदी विप्रगृहीं जन्म घेती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २॥ न लिंपे कदा बालक्रीडाउपाधी । विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी ।। जया सद्गुरुभेटिची होय स्फूर्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३॥ समर्थानुयायी तुकाराम सिद्ध । जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ॥ तया प्रार्थुनी राममंत्रासी घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४॥ तपें तोषिला सद्गुरू ज्ञानियांचा । वदे वाढवीं पंथ या राघवाचा ।। कलीमाजी मंदावली धर्मभक्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५॥ विदेहापरी चालवोनी प्रपंचा । मुमुक्षूजनांलागीं अध्यात्मचर्चा ।। करोनी बहु लोक ते मेळवीती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६॥ जशी माऊली ग्रास देते मुलाला । तसे बोधुनि ज्ञान पाजी जनांला ।। धरेसारिखी ज्यां वसे नित्य शांति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७॥ किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हावया । किती भाविती देहव्याधी हराया ।। कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥ जयें गोधना संकटीं रक्षियेलें । किती जीव अन्नोदकें तृप्त केलें ।। बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९॥ बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें । तसे नास्तिकां सत्पथा लावियेलें ।। समस्तामुखें नाम हे बोलवीती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १०॥ तनू जीर्ण झाली, बहू कार्य केलें । रघूनायके शीघ्र पाचारियेलें ।। तदा रामरूपीं समाधिस्थ होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११॥ समाधी पहातां समाधान होते । तनू कष्टवी त्यासि आनंद देते ।। मनी भाविता कामना पूर्ण होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२॥ मुखें बोलवी सद्गुरू बुद्धीदाता । अहंभार हा वागवी कोणा माथा ।। जडो भावना रामदासी सदा ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३॥

Search

Search here.