गुरुचरित्र माहिती व संकल्प
ग्रंथ - पोथी > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 16:03:55
गुरुचरित्र माहिती , संकल्प व पारायण नियम
गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत।
ग्रंथाची भाषा म्हणजे साधारणतः चौदाव्या शतकातील मराठी असावी. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत.
गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्या पौर्णिमेच्या आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती मानली जाते.
ह्या ग्रंथाला दत्त संप्रदायातील लोक पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. गुरुचरित्रात एकूण ५२ अध्याय आहेत. शेवटचा अध्याय 'अवतरणिका' म्हणजे पहिल्या ५१ अध्यायांचे सार.
सात दिवस पारायण पद्धत ७-१८-२८-३४-३७-४३-५१
तीन दिवस पारायण पद्धत २४-३७-५१
गुरुचरित्र - पारायण कसे करावे ?
श्रीनृसिंह सरस्वतींचे अलौकिक चमत्कार सांगणारा हा विलक्षण प्रभावी ग्रंथ आहे. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.
१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्या अर्थाकडे असावे.
२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.
३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.
५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्यांचा अनुभव आहे.
७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्याशी बोलू नये.
८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.
९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
प्रथम दोन वेळा आचमन करावे.
ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो, ब्राह्मणेभ्यो नमो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः । निर्विघ्नमस्तु ।
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।
धूम्रकेतुर्गणाध्यक्शो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये ।
सर्वमङ्लमाङ्गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनार्दनः ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतो अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ
(खालील ऋचा पारायण करणार्याने स्वतः म्हणावी, अमुक या ठिकाणी योग्य शब्द वापरावेत.)
मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्यर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थम् । अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यंन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्द्ध्यर्थम् । महागणपतिस्मरणचं करिष्ये ।
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।
अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलहरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।
धूपदीपनैवेद्यं समर्पयामि ।
नंतर उजव्या हाताने उदक सोडून श्रीगुरुदत्तात्रेयांचे ध्यान करावे आणि पारायणास प्रारंभ करावा.
श्री गुरु दत्तात्रेयांचे ध्यान करावे.
मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे ।
मध्यस्थपाणियुगले डमरू-त्रिशूले ।
यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।
वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ॥१॥
औदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः ।
चिंतामणीः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये ।
कृत जनार्दनो देवस्त्रेत्रायां रघुनन्दनः ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद-श्रीवल्लभः ॥२॥
त्रैमूर्ति राजा गुरु तोचि माझा ।
कृष्णातिरी वास करून वोजा ।
सुभक्त तेथे करिता आनंदा ।
ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ॥३॥
ध्यानमंत्र
ब्रह्मानंद्म परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतम् ।
भावातीतं त्रिगुनरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
काषायवस्त्रं करदंदधारिणं ।
कमंडलुं पद्मकरेण शंखम् ॥
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं ।
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
Search
Search here.