श्रीदत्ताची आरती
आरती > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-12-05 14:11:07
श्रीदत्ताची आरती
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
जयदेव जयदेव श्रीदत्तगुरुदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
वास तुझा ब्रह्मांडीं चालक तूं देवा ।
अससी तूं सर्वांचा आनंदठेवा ।
वदती वेद सरस्वति न होय हा ठावा ।
कामति माझी नमितों पदिं देईं ठावा ॥१॥
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
सद्दाता तव महिमा वर्णितसे वेद ।
मोक्षाची सत्रें हीं ठेविलिं बहुसुखद ।
अतिदु:खें शक्ति नसे हरि माझा खेद ।
ज्ञानामृत पाजुनि दे अखंड तव पद ॥२॥
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
लीला अनंत तूझ्या वदता आनंत ।
चारी साही आठरा पाहता नच अंत ।
नारदव्यासमुनींद्र ध्याता नच येत ।
तो तूं देहा धरुनी देसि करीं स्वार्थ ॥३॥
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
पदिं गंगा कटिं शोभे शाटी कौपीन ।
हृदयीं लक्ष्मीकौस्तुभभृगुपदलांछन ।
दंडकमंडलु हातीं रवींसुदम वदन ।
राहो माझे हृदयीं हेंचि सदा ध्यान ॥४॥
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
आलिंगो त्वड्मूर्ती दिसोच हे नयना ।
ऐको कर्ण गुणांतें नामामृत रसना ।
त्वत्पदसुमगंध सदा लागो हा घ्राणा ।
दे परभक्ति श्रद्धा सतत करूं नमना ॥५॥
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा ।
पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥
Search
Search here.