गुरुपादुकाष्टक
स्तोत्र - मंत्र > श्री सद्गुरु स्तोत्र Posted at 2019-02-21 15:07:34
गुरुपादुकाष्टक
दयावंत कृपावंत सद्गुरुराया ।
अनन्यभावे शरण आलो मी पाया ।
भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।१।
अनंत अपराधी मी सत्य आहे ।
म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे ।
तुजविण हे दुःख सांगू कुणासी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।२।
मतिहीन परदेशी मी एक आहे ।
तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे ।
जननी जनक इष्ट बंधु तू मजसी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।३।
जगतपसारा दिसो सर्व वाव।
अखंडीत तव पायी मज देई ठाव ।
विषापरि विषय वाटो मनासी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।४।
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे ।
तयासीच तू भेट देसी स्वभावे ।
म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।५।
किती दिवस गाऊ हे संसारगाणे ।
तुजविण कोण हे चुकविल पेणे ।
नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।६।
सुवार्णासी सोडुनी कांति न राही ।
सुमनासी न सोडी सुवास पाही ।
तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।७।
कलावंत भगवंत अनंत देवा ।
मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा ।
कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी ।
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।८।
श्री सद्गुरूर्पणमस्तू ..
Search
Search here.