जयजय श्रीबलभीमा आरती

आरती  > हनुमान आरती Posted at 2018-03-28 01:38:12
जयजय श्रीबलभीमा , मारुति अंजनिच्या नंदना हो । राक्षसकुळ हानना, अनाथनाथा करुणाघना हो ॥धृ०॥ सीता विरहें दुःखित, सीता सीता आक्रंदत हो । पंपातीर्थ तटाकिं, रघुविर पाहिला अवचित हो । तो प्रभु सद्‌गुरु केला, भावें होऊनि शरणांगत हो । निश्‍चय पण आदरिला, सीता शुद्धीचा संकेत हो । दक्षिणपंथें उडाला, टाकुनि मागें प्रभंजना हो ॥जय जय ॥१॥ शोध सितेचा केला, क्रोधें जाळुनि लंकापुर हो । रामेश्‍वर लिंगापुढें, जाणों लाविला कापूर हो । राक्षस वधितां वहाती, तद्रक्‍ताचे तुंबळ पुर हो । नादें अंबर गर्जे, बहु भय वाटे दिग्गज मना हो ॥जय जय ॥२॥ क्षणमात्रें शतकोटी, पर्वत उपडी बाहूबळें हो । फाटे धरणी तटाटे, हालवी ब्रह्मांड लांगुलें हो । राक्षस म्हणती भक्षक शिक्षक झाली गोलांगुलें हो । आत्मा कुलक्षय पाहुनि, रावण मोडित शत अंगुलें हो । प्राणमित्र म्हणे टाकुनि, अहिमहि गेले यमसदना हो ॥जय जय ३॥ पडतां रणिं लक्षूमण, वेगें द्रोणागिरी आणिला हो । चार वेळ रात्रींतून, गेला आला गेला अला हो । सीता हरतां मरतां, भरतां सरतां जय पावला हो । राम सिता सौमित्रा मारुति सप्राण भावला हो । भवबाधेची तोडी, विष्णूदासाची कल्पना हो ॥ जय जय ४॥

Search

Search here.