अघटित भीमपराक्रम आरती

आरती  > हनुमान आरती Posted at 2018-03-28 02:22:03
हनुमंताची आरती अघटित भीमपराक्रम जय जय हनुमंता । अंजनिबालक म्हणविसी अपणा बलवंता ॥ उपजत किलाणमात्रें आक्रमिसी सविता । रावण गर्वनिकंद कपिबलयदातां ॥ १ ॥ जय देव जय देव जय मारूतीराया ब्रह्मसुखामृतसागर वंदित मी सदया ॥ धृ. ॥ दुर्घटसागर उडोनी सीतेची शुद्धी । मर्दुनी जंबूमाळी करिसी सद्‌बुद्धी ॥ भवलंकापुर जाळुनि नावरसी युद्धीं । रघुपतिनिजकार्याची करिसी तूं शुद्धी ॥ जय. ॥ २ ॥ जिंकिसी विषयसमुद्रा पवनात्मज रुद्रा । निजजनदु:खदरिद्रा पळविसी तूं भद्रा ॥ कपिकुलमंडणचंद्रा हरिं हे जडचंद्रा । सुखकर यतिवर वंदित मौनी पदमुद्रा ॥ जय. ॥ ३ ॥

Search

Search here.