अभ्यंगस्नान केल्याने होणारे लाभ

सण व उत्सव Posted at 2014-10-10 08:36:30

अभ्यंगस्नान केल्याने होणारे लाभ

अभ्यंगस्नान म्हणजे सुर्योदयापुर्वी शरीराला औषधीय तेल व विविध औषधि वनस्पतिंचे चूर्ण तयार करुन शरीराला मर्दन करुन काही वेळानंतर स्नान करणे होय ..

१. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते, म्हणून तेल लावतात. २. ऊन पाणी हे मंगल आणि शरीराला सुखदायक आहे; म्हणून ऊन पाण्याने स्नान करतात. तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला आणि केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही. ४ आ. अभ्यंगस्नानामुळे होणारे आध्यात्मिक लाभ १. स्नानामुळे रज-तम गुण एक लक्षांश इतके कमी होऊन सत्त्वगुण त्याच प्रमाणात वाढतात आणि त्यांचा प्रभाव नेहमीच्या स्नानामुळे सुमारे तीन तास टिकतो, तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो.् २. ‘तेलाच्या त्वचेवरील घर्षणात्मक मर्दनाने देहाची सूर्यनाडी जागृत होऊन पिंडातील चेतनेलाही सतेज बनवते. ही सतेजता देहातील रज-तमात्मक लहरींचे विघटन करते. ही एकप्रकारची शुद्धीकरणप्रक्रियाच आहे. चैतन्याच्या स्तरावर घडलेल्या शुद्धीकरणप्रक्रियेने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व प्राप्त झाल्याने जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून घडते. ३. या कर्मामुळे जिवाच्या देहात सत्त्वगुणाचे संवर्धन होण्यास साहाय्य झाल्याने जिवाचा अभ्युदय साधतो. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष. जिवाचा सत्त्वगुणसंवर्धनाकडे होत असलेला नित्य प्रवास, म्हणजेच त्याचा अभ्युदय होय. यासाठी अभ्यंगस्नानाला अत्यंत महत्त्व आहे. ४. अभ्यंगस्नानातून निर्माण झालेल्या चैतन्याच्या स्तरावर घडणारी प्रत्येक कृती जिवाच्या हातून साधना म्हणून झाल्याने या कृतीमुळे वायूमंडलाचीही शुद्धी होते.

???? श्री श्याम जोशी गुरूजी टिटवाळा  ????

Search

Search here.