सप्तश्रुंग देवी आरती
जय देवी सप्तश्रुंगा , अंबा गौतमी गंगा ,नटली ही बहुरंगा ,उटी शेंदूर अंगा ,जय देवी ॥
पूर्वामुख अंबे ध्यान , जरा वाकडी मान ,मार्कंडेय देई कान ,सप्तशतीचे पान , ऐके अंबा गिरी श्रुंगा ,अंबा गौतमी गंगा , नटली ही .... जय देवी ॥ 1 ॥
माये तुझा बहु थाट , देई सगुण भेट , प्रेमे पान्हा एक घोट , भावे भरले हे पोट , करु नको मन भंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही ... जय देवी ॥ 2 ॥
महिशीपुत्र महीषासुर , दृष्ट कामे असुर , करी ढाल समशेर , क्रोधे उडवीले शीर , शिवशक्ति शिवगंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही ... जय देवी ॥ 3 ॥
निवृत्ती हा राधासुत , अंबे आरती गात , अठराही तुझे हात , भक्ता अभय देत , चरणी कमल ही भुंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही ... जय देवी ॥ 4 ॥
Search
Search here.