जय जय भवानी
भजन - स्तुती Posted at 2018-10-11 18:19:44जय जय भवानी
जय जय भवानी जय जय भवानी , मनरमनी , माता पुर वासिनी , चवदा भुवनांची स्वामिनी , महिषासुर मर्दिनि । जय जय भवानी ॥धृ॥ नेसुनि पाटाव , पिवळा , हार शोभतो गळा , हाती घेऊनिया त्रिशूळा , भाळी कुंकुम टिळा ॥1॥ जय जय भवानी ... अंगी लेवुनिया , काचोळी , वर मोत्याची जाळी , हृदयी शोभतसे , पदकमळी , कंठी हे गरसोळी ॥2॥ जय जय भवानी ... पायीं घागरीया , घुळघुळ , नाकी मुक्ताफळ , माथा कुंतल , हे कुरळ , नयनीहि काजळ ॥3॥ जय जय भवानी ... सिंहावरी तू , बैसुन , मारिसी दानव गण , तुजला विनवितो निशिदिन , गोसावी नंदन ॥4॥ जय जय भवानी मनरमनी ..
Search
Search here.