जय जय जगदंबे , श्री अंंबे , रेणुके कल्प कदंबे , जय जय जगदंबे ॥
अनुपम स्वरुपाची , तुझी घाटी , अन्य नसे या सृष्टी , तुजसम रुप दुसरे , परमेष्टी ,
करिता झाला कष्टी , शशीरस रसरसला , वदनपुटी , दिव्य सुलोचन दृष्टी ,
सुवर्ण रत्नांच्या शिरी मुगुटी , लोपती रवि शशिकोटी , गजमुख तुझ स्तविले ,
हेरम्बे मंगल सकलारंभे , जय जय जगदंबे , श्री अंबे , रेणुके कल्प कदंबे , जय जय जगदंबे ॥
कूंकूम शिरी शोभे मळवटी , कस्तुरी तिलक ललाटी , नासिक अति सरल हनुवटी ,
रुचिरामृत रस ओठी , समान जणु लवल्या धनुकोटी , आकर्ण लोचन भृकुटी ,
शिरी निट भांग वळी उफराटी , कर्नाटकाची घाटी , भुजंग निलरंग परीशोभे ,
वेणी पाठीवर लोंबे , जय जय जगदंबे श्री अंबे , रेणुके कल्प कदंबे , जय जय जगदंबे ॥ ॥
कंकणे कणकाची , मनगटी दिव्य मुदा दश बोटी , बाजूबंद नगे बहूवटी , चर्चूनी केशर ऊटी , सुगंध पुषांचे हारकंठी , बहुमोत्याची दाटी , अंगी नवी चोळी जरिकाठी , पीत पितांबर तगटी ,
पैंजण पदकमळी , अतिशोभे भ्रमर धावती लोभे , जय जय जगदंबे ॥
साक्षप तु क्षितीच्या , तळवटी , तुची स्वये जगजेठी , ओवाळीन आरती , दिपताटी , घेउनी कर संपूष्टी , करुणामृत ह्रदये , संकष्टी धावसी भक्तांसाठी , विष्णुदास सदा , बहूकष्टी , देशिल जरी निज भेटी , तरि मग काय उणे , या लाभे धाव पाव अविलंबे , जय जय जगदंबे॥...
Search
Search here.