जोतिबा आरती
भागिरथी मूळशीतल हिमाचलवासी ।
न लगत पल खल-दुर्जन संहारी त्यासी ।
तो हा हिमकेदार करवीरापाशी |
रत्नागिरीवर शोभे कैवल्यराशी ।।१।।
जय देव जय देव जयजय केदारा ।
दासा संकटी तारा भवभय निवारा ।।धृ।।
उत्तरेचा देव दक्षिणी आला ।
दक्षिण-केदार नामे पावला ।
रत्नासूर मर्दोन भक्त पावला ।
दास म्हणे थोर भाग्ये लाभला ।।२।।
जय देव जय देव जयजय केदारा ।
दासा संकटी तारा भवभय निवारा ।।धृ।।
Search
Search here.