काळभैरवाची आरती

आरती  > शिव आरती Posted at 2018-03-28 02:34:06
काळभैरवाची आरती उभा दक्षिणेसी काळाचा काळ । खड्‍गडमरू हस्तीं शोभे त्रिशूळ ॥ गळा घालुनिया पुष्पांची माळ । आपुलिया भक्ताचा करितो सांभाळ ॥१॥ जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा । आरती ओवाळू तुमच्या मुखकमळा ॥ जयदेव जयदेव ॥ सिंदूरगिरीं अवतार तुझा । काशीपुरीमध्ये तू योगीराजा । चरणी देशी जागा तू स्वामी माझा । आर्ता भक्तांचा पावशिल काजा ॥२॥ जयदेव०॥ उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाव पावला । काठ्या कावड्या येती देवाला । चांग भले बोला शीण हरला ॥३॥ जयदेव०॥ पाताल भुवनीं थोर तुमची ख्याती । पर्णूनी योगेश्वरी स्वभुवना नेहती ॥ कानाचा मुद्रिका देती सल्लाळा । तू माय माऊली शेषाचा माळा ॥जयदेव०॥ पाची तत्त्वांची करुनिया आरती ॥ ओवाळू या काळभैरवाची मूर्ती ॥ अनन्यभावे चरणी करुनीया प्रीती ॥ नारायण म्हणे मुक्ति या निजभक्ताप्रती ॥जयदेव जयदेव०॥

Search

Search here.