करुणात्रिपदी

स्तोत्र - मंत्र  > श्री दत्तात्रेय स्तोत्र Posted at 2019-02-12 15:49:12
।। करुणात्रिपदी ।। (श्रीमद्वासुदेवानन्‍दसरस्वतीस्वामीविरचित) १ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।धृ।। तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता || तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता || भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता || तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।१।। अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।। तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ।। तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा || सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।२।। तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी || पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ।। गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी || निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ।। शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।३।। तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां || सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता || निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता || वळे आतां आम्हांवरता | करुणाघन तू गुरुनाथा || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।४।। सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार || तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार || परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्‍धो || आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव-प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।५।। ******************************************************* २ श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।धृ।। चोरे द्विजासी मारीता मन जे । कळवळले ते कळवळो आता ।।१।। पोटशूळाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळो आता ।।२।। द्विजसुत मरता वळले ते मन । हो की उदासीन न वळे आता।।३।। सतिपति मरता काकुळती येता । वळले ते मन न वळे की आता।।४।। श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।५।। ******************************************************* ३ जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।धृ।। निज-अपराधे उफराटी दृष्टी । होऊनि पोटी भय धरू पावन ।।१।। तू करुणाकर कधी आम्हांवर । रुसशी न किंकर-वरद-कृपाघन।।२।। वारी अपराध तू मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ।।३।। बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।५।। ******************************************************* ४ उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||धृ|| जो अनसूयेच्या, भावाला, भुलूनिया सुत झाला, दत्तात्रेय अशा, नामाला, मीरवी वंद्य सुरांला, तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१|| जो माहुरपूरी, शयन करी, सह्याद्रीचे शिखरी, निवासे गंगेचे, स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी, स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमेया उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||२|| तो तू वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी, मरता प्रेतासी, जीववीसी, सत्वर-दाना देसी, यास्तव वासुदेव, तव पाया, धरी त्या तारी सदया, उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||३|| ******************************************************* ५ सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे | कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ|| या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१|| या रानी, माझी करुणावाणी, कायाकष्टी प्राणी, ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी, संकट येऊनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२|| त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा, लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३|| ******************************************************* ६ आठविं चित्ता तूं गुरुदत्ता । जो भवसागर पतितां त्रातां ||धृ|| आहे जयाचें कोमल हृदय । सदयिचा हा भव हरि वरदाता ॥ १ ॥ पाप पदोपदिं होई जरी तरी । स्मरतां तारीं भाविकपाता ॥ २ ॥ संकट येतां जो निज अंतरी । चित्ती तया शिरी कर धरीं त्राता ॥३॥ जो निज जिवींचे हितगूज साचें । ध्यान योगियाचे तो हा ध्याता ॥४॥ सज्जन जीवन अनसुयानंदन । वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥५॥

Search

Search here.