खंडोबा आरती3

आरती  > शिव आरती Posted at 2018-11-30 09:36:24
मल्हारी मार्तंड खंडेराय आरती मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।। कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म । त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।। ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म । त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।। मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

Search

Search here.