विवाह साहित्य यादी
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-12-15 10:48:34
विवाह साहित्य यादी
कलश 3 ते 4 , ताम्हण 3 , पळी फुलपात्र ,
हळद , कुंकू , रांगोळी , अष्टगंध / चंदन ,
समई , निरांजन , तेलवाती , तुपवाती , तेल व तूप
अगरबत्ती , माचीस , कापूर ,
चौरंग 1 / 2 , पाट 6 , पाटावर शाल / बेडशीट
तांदूळ दीड - दोन किलो , थोडे गहू ,
द्रोण / वाट्या 12 - 15 , पत्रावळी / ताटे - 5 ,
हळकुंड 7 - 8 , सुपाऱ्या - 25 ते 30 ,
गूळ - खोबरे , नारळ - 15 ते 20 ,
फुले , तुळशीपत्र , बेल , दुर्वा , हार , गजरे
विड्याची पाने 30 ते 40 , आंबा डहाळी 2 - 3 ,
सुटे पैसे कॉईन्स 25 , जाणवे जोड 2 - 3 ,
सुतगुंडी , पांढरे / पिवळे वस्त्र 1 मीटर ,
हाताला बांधायचा धागा - नाडा
तीन चार ब्लाउज पीस ,
हात पुसायला - भांडी वैगेरे पुसायला डस्टर नॅपकिन वैगेरे ,
शाल , टोप्या , पंचा उपरणे , नॅपकिन ,
तूप 250 ग्राम , समिधा 50 ( 6 बंडल ) , होमकुंड
काही विशेष साहित्य --- ( प्रांत स्थळ - शाखा भेद नुसार / आपापल्या रीती रिवाज परंपरेनुसार )
वधु - वर हार - पुष्पगुच्छ - मुंडावळ्या ,
कुळाची परडी , कुळाची फांदी , एरवन ( रवळी ) ,
निमाच्या काठ्या 5 ,
मुसळ , सहान , उखळ , जाते , गौरीहर ,
आंतरपाट , शाल वगैरे ,
मानाचे साहित्य ( मानपान ) आहेर वगैरे ,
अक्षता ( रंगीत ) , साळीच्या लाह्या ,
वरपक्षा कडून साहित्य ( किंवा जसे ठरले तसे ) --
मुहूर्त मणी , मंगळसूत्र , वधूची ओटी , फळे 5 , वेणीसेट , बाशिंग , वधुसाठीचा आहेर वगैरे , कानपिळी चा मान ,
वधुपक्षाकडून साहित्य ( किंवा जसे ठरले तसे ) --
वरासाठी वस्त्र ( आहेर वगैरे ) , कन्यादान साहित्य , रुखवताचे साहित्य , करवलीचा मान ,
वरील साहित्य सोडून इतर काही जे बोली प्रमाणे ठरले असेल ते लक्षात ठेवावे.. तसेच आपापल्या रीती रिवाज पद्धती परंपरे प्रमाणे जे विधी असतील त्या विधीप्रमामे जे साहित्य लागेल ते घ्यावे.. वरील यादीतील काही साहित्य काहीजणांना लागेलच असे नाही तर काहीजणांना या यादी शिवाय इतरही विशेष साहित्य लागण्याची शक्यता आहे.. ही यादी एक अंदाज येण्यासाठी सहाय्यक आहे..
------------ ----------- ----------- --------- ---------
----------- विशेष सूचना ---------
या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
या याद्या सिलेक्ट करून कॉपी पेस्ट / शेअर होतात .. हवा तो बदल करून फॉरवर्ड करू शकतात.
धन्यवाद ...
Search
Search here.