श्रीलक्ष्मी पल्लीनाथ
आरती > विष्णु आरती Posted at 2018-10-09 15:00:42
-- श्रीलक्ष्मी पल्लीनाथ --
श्रावणमासी रविदिनी जे दर्शन घेती |
त्यांची सर्वही पापे नाशाप्रती जाती |
प्रेमानंदे त्याची करिता ही स्तुती |
अंती निजपद पावुनी मुक्तिसी जाती ll१ll
जय देव जय देव जय पल्लीनाथा |
भावे तुझिया चरणी ठेविला माथा llध्रु.ll
कोकणप्रांती नांदे दक्षिण केदार |
करावया पापीयांचा उद्धार |
ब्रह्मा, विष्णू, शंकर हे एकाकार |
भक्तालागी येथे धरिला अवतार ll२ll जय...
भक्तजनांचा हा हो देव भुकेला |
यास्तव येतो नित्य यात्रेचा मेळा |
दर्शन घेऊनि जाती आपुल्या हो स्थळा |
भावे हृदयी जपती नामाची माळा ll३ll जय...
पल्लीक्षेत्री नांदे अमुचा कुलस्वामी |
सेवेसी तत्पर आहे ती लक्ष्मी |
अज्ञान मूढ जन हे सर्वस्वे आम्ही |
यास्तव जडो प्रीती तुझिया नामी ll४ll जय...
त्रिमूर्ती देव हा आहे पै जाण |
कराया भक्तांचे प्रेमे पाळण |
धरिले अवनीवरी रूप हे सगुण |
ह्मणऊनी सखाराम वंदित चरण ll५ll जय...
Search
Search here.