मंगेशाची आरती , शिव शंकर आरती
जय देव जय देव जय श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥ धृ. ॥
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंबर विरुदे हें नम संकट धारिं ॥ १ ॥
भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ॥
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनय कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा ॥ जय. ॥ २ ॥
शिव शिव जपतां शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करिं शत्रुविनाशा ॥
कुळवृद्धीते पाववि हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा । जय देव जय देव. ॥ ३ ॥
Search
Search here.